Reduce Belly Fat: पोटाची चरबी करायचीय दूर, मग या Drinksच्या सेवनाने पोटाचे फॅट्स मेणासारखे वितळतील

बऱ्याचदा वर्कआउट किंवा योगामुळे Yoga वजन तर कमी होतं मात्र पोटाची चरबी काही कमी होत नाही. शरीराच्या तुलनेत पोटाची चरबी Belly Fat कमी करण्यासाठी फारच मोठी मेहनत घ्यावी लागते
पोटाची चरबी करा दूर
पोटाची चरबी करा दूरEsakal
Updated on

वाढतं वजन ही अलिकडे वाढत जाणारी एक मोठी समस्या आहे. प्रत्येकालाच फिट राहायला आवडत. यासाठी अनेकजण योगा, जीम, रनिंग किंवा विविध प्रकारे वजन घटवण्यासाठी Weight Loss प्रयत्न देखील करतात. Marathi Health Tips Reduce belly fat by having healthy drinks

बऱ्याचदा वर्कआउट किंवा योगामुळे Yoga वजन तर कमी होतं मात्र पोटाची चरबी काही कमी होत नाही. शरीराच्या तुलनेत पोटाची चरबी Belly Fat कमी करण्यासाठी फारच मोठी मेहनत घ्यावी लागते.

मात्र काही ड्रिंक्सच्या मदतीने तुम्ही पोटावरील फॅट्स जलदगतीने कमी करू शकता. व्यायामासोबतच Exercise जर तुम्ही या ड्रिंक्सचं नियमित सेवन केलं तर काही दिवसांमध्येच तुमच्या पोटाची चरबी वितळून तुमचं पोट सपाट दिसू लागेल.

असे काही ड्रिंक्स आहेत जे तुम्ही घरच्या घरी सहज तयार करू शकता. ज्यामुळे तुमची चयापचय क्रिया जलद होवून फॅटस् कमी होण्यास मदत होईल. जाणून घेऊयात या खास ड्रिक्सं बद्दल

जीऱ्याचं पाणी- जीऱ्याच्या पाण्याचं सेवन केल्याने शरीर डिटॉक्स Detox होण्यास मदत होते. यामुळे पचन सुधारतं आणि चयापचय क्रिया जलद होते परिणामी वजन कमी होण्यास तर मदत होतेच शिवाय यामुळे पोटाची चरबी झपाट्याने कमी होते.

जीऱ्याचं पाणी तयार करण्यासाठी एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा जीरं रात्रभर भिजतं ठेवावं. सकाळी हे पाणी उकळून थोडं गार झालं की या पाण्याचं सेवन करावं.

बडीशेपेचं पाणी- अनेकदा गरोदरपणानंतर महिलांचं वजन अधिक वाढलेलं असतं. हे वजन कमी करण्यासाठी त्याचसोबत प्रेग्नेंसीनंतर वाढलेलं पोट कमी करण्यासाठी बडीशेपेचं पाणी उपयुक्त ठरू शकतं. शरीरातील चरबीचं प्रमाण कमी करण्यासाठी बडीशेप उपयुक्त ठरते.

बडीशेपेमुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. तसंच बडीशेपेच्या पाण्यात कमी कॅलरीज असतात. या पाण्याच्या सेवनामुळे फूड क्रेव्हिंग म्हणजेच वारंवार खाण्याची इच्छा होत नाही. यामुळे वजन कमी होवून पोटाची चरबी देखील कमी होते.

सकाळी उपाशीपोटी बडीशेपेच्या पाण्याचं सेवन करावं यासाठी. पाण्यामध्ये बडीशेप ५ मिनिटांसाठी उकळावी. हे पाणी कोमट झालं की गाळून प्यावं.

हे देखिल वाचा-

पोटाची चरबी करा दूर
Weight Loss Journey : चक्क 115 किलो वजनाच्या महिलेने डाएट न करता केलं 50 किलो कमी

लिंबू पाणी- लिंबू पाण्याच्या सेवनामुळे शरीराची अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. यातील व्हिटॅमिन सी मुळे चयापचय क्रिया जलद होते. नियमितपणे लिंबू पाण्याचं सेवन केल्यास पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते.

तसंच लिंबामध्ये असलेल्या पोटॅशियममुळे वजन कमी करण्यास मदत होते. सकाळी कोमटपाण्यामध्ये लिंबाचा रस मिसळून या पाण्याचं सेवन केल्यास शरीर हायड्रेट राहून डिटॉक्स होण्यास मदत होते. त्यामुळे वजन झपाट्याने कमी होतं.

दालचिनीचं पाणी- वजन कमी करण्यासाठी दालचिनीचं पाणी उपयुक्त ठरतं. दालचिनीच्या पाण्याने मेटाबॉलिजम बूस्ट होण्यास मदत होते. दालचिनीच्या पाण्यामुळे कमी भूक लागते तसंच साखरेची पातळी देखील नियंत्रणात राहते.

दालचिनिच्या पाण्याचं नियमितपणे सेवन केल्यास वजन कमी होवून पोटाची चरबी कमी होण्यास मदत होईल. कोमट पाण्यामध्ये थोडी दालचिनी पावडर टाकून सकाळी या पाण्याचं नियमितपणे सेवन करावं.

हे देखिल वाचा-

पोटाची चरबी करा दूर
Weight Loss : वजन कमी करण्यासाठी संध्याकाळी ७नंतर टाळा ही कामे

ओव्याचं पाणी- वजन कमी करण्यासोबतच पोटाची चरबी कमी करण्यासाठी ओव्याचं पाणी उपयुक्त ठरतं. यामुळे पचन क्रिया सुधारुन गॅस, पोट फुगणे या समस्या देखील दूर होतात.

ओव्याचं पाणी तयार करण्यासाठी पाण्यामध्ये रात्री ओवा भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी हे पाणी उकळून त्याचं सेवन करावं.

अशा प्रकारे काही सोप्या ड्रिंक्सच्या मदतीने तुम्ही वजन कमी करण्यासोबतच पोटाची चरबी देखील झटपट कमी करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.