अंगाला घामाचा वास येतोय? Body Odour दूर करण्यासाठी १० रामबाण उपाय

काही लोकांना तर परफ्यूम किंवा बॉ़डी स्प्रेची ऍलर्जी असते. अशा वेळी उन्हाळ्यात त्यांची मोठी अडचण होते. त्यामुळेच जर नैसर्गिकरित्या शरीराची दुर्गंधी दूर करता आली तर. होय हे शक्य आहे
शरीराची दुर्गंधी कमी करण्याचा उपाय
शरीराची दुर्गंधी कमी करण्याचा उपायEsakal
Updated on

उन्हाळ्यात वाढत्या उन्हामुळे घराबाहेर प़डणं नकोसं वाटतं. उन्हाच्या झळांनी अंगाची लाही लाही होते. तर दुसरीकडे शरीरातून निघणाऱ्या घामामुळे Sweat कपडे ओलिचंब होतात. अनेकदा या घामामुळे शरीरातून दुर्गंधी येऊ लागते. Marathi Lifestyle hacks get rid from sweat and body odour

शरीराची दुर्गंधी Body Odour दूर करण्यासाठी अनेक जण कपड्यांवर परफ्यूम Perfume किंवा बॉडी स्प्रेचा वापर करतात. मात्र अनेकदा हे शक्य होत नाही. तर काही वेळा बॉ़डी स्प्रे वापरूनही शरीराची दुर्गंधी जात नाही. 

काही लोकांना तर परफ्यूम किंवा बॉ़डी स्प्रेची ऍलर्जी असते. अशा वेळी उन्हाळ्यात त्यांची मोठी अडचण होते. त्यामुळेच जर नैसर्गिकरित्या शरीराची दुर्गंधी दूर करता आली तर. होय हे शक्य आहे. काही घरगुती उपायांनी शरीराची दुर्गंधी दूर करणं शक्य आहे. (Home Remedies for Body Odor)

बटाटा- बटाटा हे एक नैसर्गिक क्लिंजर म्हणून काम करतं. यामुळे त्वचेतील घाण काढून टाकून त्वचा स्वच्छ होण्यास मदत होते. यासाठी तुम्हाला त्वचेच्या ज्या भागात जास्त घाम येतो तिथे बटाट्याची एक स्लाइस घेऊन स्क्रब करा. यामुळे घामासा वास दूर होईल त्वचेवरील काळसरपणा देखील कमी होण्यास मदत होईल.

खास करून काखेत आणि गळ्याभोवती अनेकांना जास्त घाम येतो. शिवाय इथली त्वचा काळवंडलेली असते. यासाठीच बटाट्याचा वापर फायदेशीर ठरू शकतो. 

लिंबाचा रस- लिंबाचा रस देखील घामाचा दुर्गंध दूर करण्यासाठी एक उपयुक्त पर्याय आहे. यासाठी रोज आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडा लिंबाचा रस आणि गुलाबजलचे काही थेंब टाका.  यामुळे घामाच्या दुर्गंधीपासून तुमची सुटका होईल. शिवया एलर्जीपासूनही त्वचेचं रक्षण होईल. 

हे देखिल वाचा-

शरीराची दुर्गंधी कमी करण्याचा उपाय
Perfume Wear Tips : कितीबी चांगला Perfume घ्या लगेचच होतोय फुस्स्स? या टिप्सनी मिळवा लाँग लास्टींग fragrance!

बर्फ- जर तुम्हाला काखेत आणि गळ्याभोवती जास्त प्रमाणात घाम येत असेल तर तुम्ही बर्फाचा वापर करू शकता. यासाठी एका सुती कापडा बर्फाचा तुकडा गुंडाळा आणि घाम येणाऱ्या भागावर रब करा. असं केल्याने घाम कमी येऊ शकतो आणि त्याचा वासही येणार नाही. 

तेजपत्ता- जेवणाचा स्वाद वाढवण्यासाठी तेजपत्ता वापरला जातो. मात्र याच तेजपत्ताच्या मदतीने तुम्ही उन्हाळ्यामध्ये येणाऱ्या घामाचा दुर्गंध दूर करू शकता. यासाठी तेजपत्त्याची पावडर तयार करून ठेवा. ही पावडर दररोज आंघोळीच्या पाण्यात टाका. यामुळे घाम येण्याचं प्रमाण कमी होईल शिवाय शरीराची दुर्गंधी देखील कमी होण्यास मदत होईल.

काकडी- दररोज आंघोळीनंतर काकडीच्या स्लाइसने अंडर आर्म तसचं गळा आणि घाम येणाऱ्या ठिकाणी स्क्रब करा. यामुळे दूर्गंध दूर होईल आणि तुम्हाला फ्रेशही वाटेल. 

टोमॅटो- टोमॅटोमध्ये ऍसिडिक गुणधर्म असल्याने त्वचेवरील बॅक्टिरिया नष्ट करण्यासाठी मदत होते. तसचं यामुळे जास्त घाम येणं कमी होत. तुम्ही आंघोळ करताना किंवा आंघोळीपूर्वी अर्धा तास टोमॅटोचे काही काप घेऊन शरीराला स्क्रब करावं. त्यानंतर आंघोळ करावी. 

आठवड्यात किमान २-३ वेळा हा उपाय करावा. यामुळे घाम कमी येईल आणि दुर्गंधी दूर होईल. 

कडूलिंब- कडूलिंबात अनेक औषधी गुणधर्म असताता. त्वचेसाठी ते अत्यंत फायदेशीर आहे. यामुळे शरीराची दुर्गंधी दूर होण्यासोबतच बॅक्टेरिया नष्ट होण्यास मदत होते. त्यामुळे त्वचेच्या आजारांपासून आपलं संरक्षण होतं. यासाठी कडूलिंबाची काही पानं आंघोळीच्या पाण्यात टाकून स्नान करावं. 

कडूलिंबाची काही पानं गरम पाण्यामध्ये अकळून हा अर्क तुम्ही एका बाटलीत भरून ठेवू शकता. आंघोळीच्या पाण्यात हा अर्क टाकूनही तुम्ही त्वचा निरोगी ठेवू शकता. 

हे देखिल वाचा-

शरीराची दुर्गंधी कमी करण्याचा उपाय
Hair Care : केसांमध्ये घाम येण्याची कारणे आणि उपाय

तुरटी- तुरटीमध्ये अँटीसेप्टिक गुणधर्म असतात. आंघोळीपूर्वी ३-४ मिनिटांसाठी तुरटी अंडरआर्म म्हणजेच काखेमध्ये स्क्रब करावी. त्यानंतर आंघोळ करावी. यामुळे काखेतून येणारी दुर्गंधी कमी होईल. 

गुलाबजल – घामाचा वास दूर करण्यासाठी तुम्ही काखेत किंवा गळ्याभोवती गुलाब जल स्प्रे करू शकता. त्याचसोबत तुम्ही आंघोळीच्या पाण्यातही गुलाबजल टाकून आंघोळ करू शकता. यामुळे शरीराची दुर्गंधी दूर होईल. 

एलोवेरा जेल- रात्री झोपण्यापूर्वी काखेमध्ये एलोवेला जेलने मसाज करावं. संपूर्ण रात्रभर ते जेल राहू द्यावं. त्यानंतर सकाळी स्वच्छ पाण्याने धुवावं. यामुळे घामाचा दुर्गंध कमी होईल.

अशा प्रकारे तुम्ही नैसर्गिंकरित्या घामाचं प्रमाण कमी करू शकता तसचं शरीराच्या दुर्गंधीला दूर करू शकता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.