Gold Jewelry Cleaning: कोणत्याही भारतीय महिलेला अलंकार Ornaments घालणं आवडतं. त्यातही खास करून सोन्याच्या दागिन्यांवर महिला वर्गाचं विशेष प्रेम असतं. तर काही पुरुषांनादेखील सोन्याचे दागिने Gold Ornaments घालण्याची आवड असते. Marathi Tips How to give shine to your Gold Silver Ornaments
अनेक सोन्याचे दागिने हे पिढ्यान् पिढ्या वापरले जातात. काहीवेळा तर ते पुढील पिढीकडे सोपवले जातात. सोनं हा अत्यंत चमकणारा धातू Metal असला तरी सोन्याचे दागिने मात्र सतत अंगावर घातल्याने तसंच त्यातील नक्षीकामामध्ये Design घाण साचल्याने काही वेळेस त्याची चमक कमी होते.
खरं तर सोन्याची चमक Gold Shine ही तशी कमी होत नसते तर दागिन्यांचा घामाशी Sweat तसचं आपण वापरत असलेल्या काही सौदर्य प्रधानांशी Beauty Products संपर्क आल्याने तसंच त्यात तेलकट आणि चिकट थर झाल्याने ते फिके दिसू लागतात.
यासाठीच दागिने स्वच्छ करणं गरजेचं आहे. सोन्याचे दागिने देखील तुम्ही घरच्या घरी स्वच्छ करू शकता. जेणे करून ते पुन्हा चमकतील.
चांदी Silver किंवा इतर धातू चमकवण्यासाठी तुम्ही अनेक घरगुती उपाय करू शकता. मात्र सोन्याचे दागिने तसंच सोनं हे अत्यंत नाजूक धातू असल्याने ते साफ करताना खास काळजी घेणं गरजेचं आहे. सोनं स्वच्छ करण्यासाठी सर्वच केमिकल किंवा क्लिनिंग एजंट वापरणं शक्य नसतं यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते.
हे देखिल वाचा-
लिक्विड डिटर्जंटने चमकेल सोनं (how to clean gold jewelry with detergent powder)
सोन्याचे दागिने स्वच्छ करण्यासाठी एका बाऊलमध्ये गरम पाणी घ्या. पाणी अगदी उकळतं नसेल याची काळजी घ्या.
त्यानंतर यात लिक्विड डिटर्जंटचे काही थेंब टाका.
साबणाच्या या पाण्यामध्ये दागिने १०-१५ मिनिटांसाठी बुडवून ठेवा.
यानंतर एखाद्या सॉफ्ट टूथब्रथने दागिन्यांवरील नक्षी स्वच्छ करा.
साबणाच्या पाण्यातच दागिने स्क्रब केल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवा.
यानंतर तुमचे दागिने अगदी नव्याप्रमाणे चमकू लागतील.
टूथपेस्टने स्वच्छ करा दागिन्यांवरील घाण
सोन्याचे दागिने स्वच्छ करण्यासाठी तुम्ही टूथपेस्टचा देखील वापर करू शकता. यासाठी एक चमचा टूथपेस्टमध्ये २-३ चमचे पाणी टाकून एक पातळ पेस्ट तयार करा.
सॉफ्ट ब्रश किंवा एखाद्या नॅपकिनच्या मदतीने देखील ही पेस्ट दागिन्यांवर लावून दागिने हलक्या हाताने स्क्रब करा. त्यानंतर स्वच्छ पाण्याने दागिने धुवा. यामुळे दागिन्यांमध्ये साचलेली घाण निघून जाईल आणि ते पुन्हा नव्या सारखे चमकू लागतील.
हे देखिल वाचा-
https://youtu.be/lSrBsRCaIbQ
लिंबाच्या रसाने सोन्याचे दागिने चमकतील
सोन्याचे फिके पडलेले दागिने पुन्हा नव्या प्रमाणे चमकवण्यासाठी लिंबाचा वापर करू शकता. यासाठी गरम पाण्यात एक चमचा लिंबाचा रस टाका. या पाण्यामध्ये २० मिनिटांसाठी दागिने ठेवा. यामुळे देखील दागिंन्यांमध्ये घाम आणि धुळीमुळे साचलेली घाण निघून जाण्यास मदत होईल.
दागिने स्वच्छ करताना ही खबरदारी बाळगा
दागिने स्वच्छ करण्यासाठी जास्त स्ट्राँग डिटर्जंट वापरू नका.
तसंच सोन्याचे दागिने स्वच्छ करण्यासाठी ब्लीचचा वापर करू नका.
सोन्याचे दागिने स्वच्छ करताना सॉफ्ट ब्रशचाच वापर करावा आणि हलक्या हाताने दागिने स्वच्छ करावे.
एकाच डब्यात सर्व सोन्याचे दागिने एकत्र ठेवू नका.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.