Electric Carच्या कमी रेंजची आहे चिंता, मग या टिप्स वापरून इलेक्ट्रिक कारची वाढेल रेंज

Electric Car काही समस्यांमुळे जर तुम्ही इलेक्ट्रीक कारला कंटाळला असाल किंवा अशी कार घेणं टाळत असाल तरी आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे इलेक्ट्रिक कारची रेंज वाढवणं शक्य आहे. तसंच बॅटरी लाइफ वाढवणं शक्य आहे
Electric Carची वाढवा रेंज
Electric Carची वाढवा रेंजEsakal
Updated on

गेल्या काही वर्षातील पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती पाहता इलेक्ट्रिक कारच्या Electric Car विक्रीवर भर देण्यासाठी सरकारकडूनही विशेष पावलं उचलली जात आहेत. यामुळे इलेक्ट्रीक कारची बाजारामध्ये देखील उपलब्धता वाढली असून अनेकांचा कल हा अशा इलेक्ट्रीक कारच्या खरेदीकडे वाढताना दिसत आहे. Marathi Tips Know how to extend battery life of your Electric Car

सिडान असो किंवा हॅचबॅक विविध मॉडेलमध्ये कंपन्या इलेक्ट्रिक कार E-Car बाजारामध्ये आणत आहेत. या कारच्या किंमती साधारण कारच्या किंमतीहून काहीशा जास्त असल्या तरी इलेक्ट्रिक कारच्या खरेदीवर सरकारकडून सबसिडी म्हणजेच अनुदान दिल जातं.

शिवाय या कारच्या खरेदीनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या खर्चात मोठी बचत होते. तसंच इलेक्ट्रिक कार या लो मेंटेनंन्स Car maintenance असल्याने तिथेही बचत होते.

इलेक्ट्रिक कारचे अनेक फायदे असले तरी या कारची एक अडचण म्हणजे या कारची रेंज आणि चार्जिंगसाठी Charging लागणारा वेळ. इलेक्ट्रिक कारची रेंज ही साधारण ३०० ते ३५० किलोमीटर इतकी असते. तर चार्जिंगसाठी लागणारा वेळ हा साधारण५ ते ८ तास इतका असतो. या काळात तुम्ही कार वापरू शकत नाही.

या काही समस्यांमुळे जर तुम्ही इलेक्ट्रीक कारला कंटाळला असाल किंवा अशी कार घेणं टाळत असाल तरी आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे इलेक्ट्रिक कारची रेंज वाढवणं शक्य आहे. तसंच बॅटरी लाइफ वाढवणं शक्य आहे. यामुळे तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचू शकतं. तसंच कारचा मेंटेनन्सही वाढणार नाही. यासाठी तुम्हाला गॅरेजमध्ये जाण्याची किंवा मेकॅनिकची देखील आवश्यकता भासणार नाही.

हे देखिल वाचा-

Electric Carची वाढवा रेंज
Petrol Vs Electric Car: पेट्रोलची गाडी सोडा, ईव्हीची वाट धरा! 8 लाखांची होतेय बचत, कशी ते जाणून घ्या

टायर प्रेशर योग्य ठेवा

इलेक्ट्रिक कार असो किंवा अन्य कोणतीही कारच्या टायरमध्ये कायम योग्य प्रेशर असणं आणि ते वेळोवेळी तपासणं गरजंच आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये टायरमध्ये ३२ पाउंड तर हिवाळ्यात ३५ पाउंड प्रेशर असणं गरजेचं आहे.

टायरमध्ये एअर प्रेशर योग्य असेल तर टायरचं घर्षण कमी होईल आणि मोटरवर कमी दाब येईल ज्यामुळे कारची रेंज वाढेल शिवाय टायरचं देखील लाइफ वाढेल.

ओव्हरलोडिंग टाळा

कारमध्ये कधीही कारच्या क्षमतेहून अधिक लोकांनी बसू नये किंवा कारच्या क्षमतेहून अधिक वजनाचा भार कारवर येणार नाही याची काळजी घ्या. यामुळे मोटरवर लोड येऊन बॅटरी लवकर खराब होण्याची शक्यता असते. तसंच कारच्या डिकीतही अनावश्यक वजनदार वस्तू ठेवू नये.

अनावश्यक अॅक्सेसरीज टाळा

कारमध्ये कंपनीकडून देण्यात आलेल्या अॅक्सेसरीज व्यतिरिक्त इतर भरमसाठ इलेक्ट्रीक अॅक्सेसरीज लावू नका. जर तुम्ही अतिरिक्त स्पीकर, लाइट किंवा इतर इलेक्ट्रिक अॅक्सेसरीज लावत असाल तर यामुळे बॅटरी लवकर ड्रेन होवू शकते ज्यामुळे कारची रेंज कमी होते.

अशी वापरा बॅटरी

इलेक्ट्रिक कार वापरत असताना एक गोष्टी कायम लक्षात घ्यावी ती म्हणजे कार वापरत असता बॅटरी १५ टक्क्यांच्या खाली येई देऊ नका. बॅटरी १५ ते २० टक्के असतानाच चार्ज करा. यामुळे बॅटरी दीर्घकाळ चांगली राहते आणि कारच्या रेंजवरही परिणाम होतो.

शिवाय इलेक्ट्रिक कारची बॅटरी चार्ज करत असताना ती कायम ९० टक्के तरी चार्ज करावी त्यानंतरच चार्जिंग बंद करावं. तसंच बॅटरी पूर्ण चार्ज झाल्यानंतर चार्जिंग सुरु ठेवू नका अन्यथा बॅटरी लाइफ कमी होतं.

अशा प्रकारे काही गोष्टींची काळजी घेतल्यास इलेक्ट्रीक कारची रेंज वाढवणंही शक्य आहे.

हे देखिल वाचा-

Electric Carची वाढवा रेंज
Tesla Electric Car घेऊन महिला गेली पेट्रोल पंपावर; पेट्रोल कसं भरावं तेच कळेना अन्...| Video Viral

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()