Motor Insurance Renewal करताना घ्या या गोष्टींची काळजी, नाहीतर होईल नुकसान

इन्श्युरन्स असताना तुमच्या गाडीला Car अपघात झाल्यास किंवा एखादा बिघाड झाल्यास गाडी विना रक्कम दुरुस्त करून दिली जाते किंवा गाडीच्या दुरुस्तीसाठी झालेल्या खर्चाची भरपाई मिळते. यासाठीच सर्व नियम आणि अटी तपासून विमा निवडणं आणि तो रिन्यू करणं महत्वाचं ठरतं
मोटार इन्श्युरन्सचे नुतनीकरण
मोटार इन्श्युरन्सचे नुतनीकरणEsakal
Updated on

वाहन खरेदी करत केल्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे मोटार इन्श्युरन्स Insurance म्हणजेच त्या वाहनाचा विमा. तुमच्या तसचं तुमच्या वाहनाच्या सुरक्षिततेसाठी मोटर इन्श्युरन्स अत्यंत गरजेचं आहे. Marathi Tips Know this before renewing your car and vehicle insurance

मोटर इन्श्युरन्सची Motor Insurance निवड करत असताना काही महत्वाच्या गोष्टी पडताळणं अत्यंत गरजेचं आहे. अन्यथा भविष्यामध्ये तुम्हाला तोटा Loss होवू शकतो. ज्याप्रमाणे मोटर इन्श्युरन्स किंवा विमा घेताना काळजी घेणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे हा इन्श्युरन्स रिन्यू करताना देखील अनेक गोष्टी ध्यानात घेणं गरजेचं आहे.

इन्श्युरन्समुळे तुमच्या गाडीला Car अपघात झाल्यास किंवा एखादा बिघाड झाल्यास गाडी विना रक्कम दुरुस्त करून दिली जाते किंवा गाडीच्या दुरुस्तीसाठी झालेल्या खर्चाची भरपाई मिळते. यासाठीच सर्व नियम आणि अटी तपासून विमा निवडणं आणि तो रिन्यू करणं महत्वाचं ठरतं.

मोटर इन्श्युरन्स खरेदी करताना किंवा निवडताना कोणता विमा स्वस्तात मिळतो म्हणजेच वर्षाला कमी रक्कम भरावी लागणारा विमा निवडण्याएवजी तुमच्या गरजांची पूर्तता करणारा कार इन्श्युरन्स निवडणं गरजेचं आहे.

यासाठी थोडा अभ्यास करून विमा निवडावा. विम्याची निवड करताना कोणत्या गोष्टी पडताळाव्या याच्या काही टिप्स आम्ही तुम्हाला देत आहोत.

हे देखिल वाचा-

मोटार इन्श्युरन्सचे नुतनीकरण
Life Insurance: विमा एजंटने चुकीची माहिती देऊन पॉलिसी विकली आहे? अशी मिळेल पूर्ण रक्कम, काय सांगतो कायदा?

मोटर इंश्युरन्स निवडताना या प्राथमिक गोष्टी पडताळा

सर्व प्रथम विमा निवडताना विम्याच्या कागदपत्रांमध्ये देण्यात आलेली सर्व माहिती योग्य असल्याची खातरजमा करा. एखादी माहिती चुकीची असल्यास ती दुरुस्त करून घ्या. तसचं विमा रिन्यू करताना पुन्हा एकदा तुमचा पत्ता, मोबाईल नंबर तसचं सीएनजी किटमधील बदल किंवा कोणतेही बदल करण्यात आले असतील तर ती माहिती पुरवा.

महत्वाचं म्हणजे तुमची प्रीमियम रक्कम किती आहे आणि तुम्हाला किती पैसे द्यावे लागतील हे जाणून घ्या.

PAYD

PAYD म्हणजेच Pay-As-You-Drive म्हणजेत गाडी किती चालवली आहे यावर कारचा विमा ठरतो. अलिकडे अनेक मोटर विम्यामध्ये PAYD वापरलं जातं. या इन्श्युरन्स मॉडलमुळे विमा धारकांना पॉलिसी प्रिमियममध्ये बचत करणं शक्य होतं.

यामध्ये जर तुम्ही गाडीचा वापर कमी करत असाल, गाडी कमी चालत असेल तर तुम्हाला कमी प्रिमियम भरण्याची सुविधा मिळू शकते. त्यामुळेच जर तुमच्या गाडीचा वापर कमी होत असेल आणि तुम्ही पूर्ण प्रमियम भरत असाल तर तुम्ही PAYD इन्श्युरन्स मॉडेलचा विचार करू शकता.

यात मायलेज स्लॅब आणि गाडी किती किलोमीटर चालली यावर प्रिमियम स्लॅबचे आकडे ठरतं असतात.

ऑनलाइन आणि ऑफलाईन पॉलिसीची तुलना

मोटर विमा निवडण्यापूर्वी तुम्हाला ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा विविध कंपन्यांच्या पॉलिसीची तुलना करणं गरजेचं आहे. सर्विस आणि प्रिमियम पाहून ही तुलना करावी. अनेकदा ऑफलाइनच्या तुलनेत ऑनलाइन पॉलिसी घेत असताना तुम्हाला अनेक ऑफर आणि डिस्काउंट मिळतात. यासाठीच ऑनलाइन विविध कंपन्यांचे विमा तुम्ही तपासू शकता.

मोटार इन्श्युरन्सचे नुतनीकरण
Insurance Policy: विमा पॉलिसी म्हणजे काय? भारतातील विम्याचा इतिहास कधी आणि कसा सुरू झाला?

No Claim Bounsचा लाभ घ्या

जर तुम्ही तुमचा कार विमा योग्य वेळी म्हणजेच तो एक्सपायर होण्यापूर्वी रिन्यू करत असाल तर तुम्ही नो क्लेम बोनसचा लाभ घेऊ शकता. पहिल्या वर्षी २० टक्क्यांपर्यात नो क्लेम बोनसचा लाभ मिळू शकतो. म्हणजेच जर तुमचं वर्षाचं प्रिमियम १० हजार आहे तर तुम्हाला २ हजार रुपये नो क्लेम बोनस मिळू शकतो. म्हणजे तुम्हाला पुढील प्रिमियममध्ये २ हजारांची सूट मिळेल.

दरवर्षी नो क्लेम बोनस हा वाढत जातो. ५ वर्षांनी तो जवळपास ५० टक्के होऊ शकतो. मात्र जर तुम्ही वर्षभरामध्ये एखादा क्लेम केला तर तुम्हाला याचा फायदा मिळणार नाही.

हे देखिल वाचा-

मोटार इन्श्युरन्सचे नुतनीकरण
Free Life Insurance: 7 लाखांचा मोफत विमा हवाय, जाणून घ्या काय आहे EPFO ची योजना?

योग्य वेळेत इन्श्युरन्स रिन्यू करा

मोटर इन्श्युरन्स एक्सपायर होण्यापूर्वीच ते रिन्यू करणं अत्यंत गरजेचं आहे. अन्यथा तुमचं मोठं नुकसान होवू शकतं. विमा एक्सपायर झाल्यानंतर एखादा अपघात किंवा गाडीच बिघाड झाल्यास विमा नसल्याने तुम्हाला खिशातील पैशाने दुरुस्ती करावी लागेल.

शिवाय तुम्हाल लेट फी सोबतच विम्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतील. याशिवाय उशिरा विमा रिन्यू केल्यास पुन्हा नव्या अटी लागू होवू शकतात. यासाठी विमा संपण्याच्या ७ दिवसआधीच तो रिन्यू करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.