Margashirsha Vrat 2023 : मार्गशीर्षातील गुरूवारची महालक्ष्मीमातेची उत्तरपूजा कशी करावी?

देवीच्या पूजेत वापरलेली फळे निर्माल्य म्हणून विसर्जित करू नका
Margashirsha Vrat 2023
Margashirsha Vrat 2023esakal
Updated on

Margashirsha Vrat 2023 : मार्गशीर्ष महिन्याला पुराणांमध्येही अनन्यसाधारण महत्त्व आहे. या महिन्यात व्रत-वैकल्य मोठ्या प्रमाणावर केली जातात. दत्त सांप्रदायातील सर्वोच्च अशी दत्त जयंतीही याच महिन्यात असते. त्यामुळे दत्त भक्तांमध्ये याचे विशेष महत्त्व आहे.

भगवान श्रीकृष्ण मार्गशीर्ष महिन्याचे महत्व भगवद् गीतेतील श्लोकातून व्यक्त केले आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, 'मसानां मार्गशीर्षोहं' अर्थात मार्गशीर्ष हा महिना माझेच स्वरूप आहे. स्कंद पुराणात देखील या महिन्याचा महिमा आहे.

Margashirsha Vrat 2023
Margashirsha Vrat 2023 : कथेच पुस्तक विसरलंय? इथे ऐका मार्गशीर्ष व्रताची संपूर्ण कथा

हा महिना सुहासिनी महिलांसाठीही पावित्र्याचा मानला जातो. या महिन्यात प्रत्येक गुरूवारी देवीच्या प्रतिमेची पूजा बांधून आराधना केली जाते. देवीच्या नवरात्रीला जसे महत्त्व आहे. अगदी त्याच भक्तीभावाने गृहिणी, कुमारीका हे व्रत करतात. हे व्रत करून माझी साधना करणाऱ्या सर्वांच मी भलं करेन असा आशिर्वाद साक्षात श्री लक्ष्मी मातेने दिला आहे.

अशा या व्रताची मांडणी कशी करायची, तिची कथा कशी वाचायची हे अनेकांना ठाऊक आहे पण देवीच्या या विशेष पुजेची उत्तरपूजा कशी करावी याची अनेकांना कल्पना नाही.चुकीच्या पद्धतीने पूजा उतरल्याने या व्रताचे फळ मिळत नाही असे म्हणतात. त्यामुळेच ही पूजा कशी उतरावी याचे काही नियम पुराणात दिले आहेत. ते आपण पाहुयात.

अशी करावी देवीची उत्तरपूजा

  • देवीची पूजा एक रात्रभर तरी तशीच राहूद्यावी.

  • दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर सर्वात आधी पूजा उतरावी.

  • पूजेसमोर बसून देवीला ओवाळून घेऊन आरती करावी. नैवेद्य दाखवावा आणि मगच पूजा हलवावी.

  • देवीच्या कलशात असलेले नाणे आणि सुपारी काढून ते पून्हा पुढच्या पूजेसाठी वापरावे.

  • कलशातील पाणी तुळशीला आणि झाडाला वहावे.

  • पूजेसाठी वापरलेले झाडांचे डहाळे, हार, फुले वाहत्या पाण्यात विसर्जित करावेत.

  • पूजेसाठी वापरलेली फळे घरातील व्यक्तींनी प्रसाद म्हणून खायला द्यावी

  • पूजेसाठी वापरलेला नारळ आणि तांदूळ पुढील पूजेसाठी वापरावा.

  • पाटाच्या खाली असलेल्या स्वास्तिकाला अगरबत्ती ओवाळू घर,संसार, धन-धान्य भरलेलं रहावं यासाठी प्रार्थना करावी.   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.