Marijuanas for Better Sex: गांजा मध्ये लपले आहे सेक्स विषयक रहस्य, वैज्ञानिकांनी काढलं शोधून

वैज्ञानिकांनी असा शोध लावला आहे की, सेक्सच्या आधी गांजा पिल्याने ऑरगॅझम वाढतं.
Marijuanas for Better Sex
Marijuanas for Better Sexesakal
Updated on

Marijuanas for Better Sex : वैज्ञानिकांनी शोध लावला आहे की, सेक्स करण्याआधी गांजा पिल्याने ऑरगॅझम वाढतो. इस्ट कॅरोलिना युनिव्हर्सिटी अँड नॉर्थ कॅरोलिना स्टेट युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनाला आढळले आहे की, धूम्रपान न करणाऱ्यांपेक्षा गांजा पिणाऱ्यांची सेक्स लाइफ चांगली असते. अमेरिकी स्टडीनुसार अशावेळी ५० टक्के महिला फीजिकल रिलेशनमध्ये समाधानी असतात.

वैज्ञानिकांचा मानणं आहे की, गांजा महिलांना जास्त आराम देतो आणि त्यांची इच्छा वाढवल्याने ऑरगॅझम मिळण्याची शक्यता वाढते. अभ्यासात ७० टक्के पुरुष आणि महिला दोघांनी गांजा घेतल्यानंतर सेक्स चांगला झाल्याचं सांगितलं. आकडेवारीनुसार ४० टक्के महिलांना गांजामुळे ऑरगॅझमपर्यंत पोहचण्याचा आनंद मिळाला.

Marijuanas for Better Sex
Pakistan Visa : व्हिसासाठी SEX बाबत विचारले, महिलेच्या आरोपावर पाकिस्तानची प्रतिक्रिया...

संशोधकांनी जर्नल ऑफ कॅनबिस रिसर्चमध्ये प्रकाशित अहवालात लिहिलं आहे की, एकुणच गांजाच्या वापरामुळे लिंग किंवा वयाची पर्वा न करता व्यक्तींच्या लैंगिक कार्यावर आणि समाधानावर सकारात्मक प्रभाव पडतो. हा अभ्यास एका सर्वेक्षणावर आधारित होतं. यात ८११ सहभागींचे सेक्स आणि गांजाच्या सवयींचं निरीक्षण केलं गेलं. त्यांच वय १८ ते ८५ च्या दरम्यान होतं.

Marijuanas for Better Sex
Loss Of Interest In Sex : 'या' एका कारणामुळे कमी होते सेक्सची इच्छा !

या सर्वेक्षणाच्या निष्कर्षांसह धोक्याचा इशाराही देण्यात आला आहे. गांजाचा उलट परिणाम पण होऊ शकतो. गांजा ओढणं, पिक घेणं, वितरीत करणं, विकणं हे बेकायदेशीर असल्याने पकडले गेलात तर त्याचे दुष्परिणाम पण भोगावे लागू शकतात.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.