मारुतीची इलेक्ट्रिक मोटर तीन वर्षांच्या आत येणार

इलेक्ट्रिक मोटारीच्या किमतीत ५० टक्के वाटा असलेल्या तिच्या बॅटरीची किंमत कमी करण्याचे प्रयत्न मारुती सुझुकी इंडियातर्फे सुरू आहेत.
maruti suzuki
maruti suzukisakal
Updated on
Summary

इलेक्ट्रिक मोटारीच्या किमतीत ५० टक्के वाटा असलेल्या तिच्या बॅटरीची किंमत कमी करण्याचे प्रयत्न मारुती सुझुकी इंडियातर्फे सुरू आहेत.

नवी दिल्ली - इलेक्ट्रिक मोटारीच्या किमतीत ५० टक्के वाटा असलेल्या तिच्या बॅटरीची किंमत कमी करण्याचे प्रयत्न मारुती सुझुकी इंडियातर्फे सुरू आहेत. ते यशस्वी झाले की येत्या तीन वर्षाच्या आतच मारुतीची इलेक्ट्रिक मोटर बाजारात येईल, अशी माहिती कंपनीचे वरिष्ठ अधिकारी शशांक श्रीवास्तव यांनी दिली.

नव्या स्वरूपातील अल्टो के १० या मोटारीचे अनावरण करताना ते बोलत होते. इलेक्ट्रिक मोटारींची किंमत जास्त असल्यामुळे त्यांचा खपही कमी आहे. बॅटरीची किंमत कमी करण्याबरोबरच चार्जिंग च्या सुविधांबाबतही वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत, असेही श्रीवास्तव म्हणाले.

सेमीकंडक्टर चीपच्या तुटवड्यावर आता मारुतीने बऱ्यापैकी मात केली आहे. भविष्यात तैवानवरून लष्करी संघर्ष झालाच तर पुन्हा यावर काहीतरी परिणाम होईलच. मात्र तो किती होईल हे सांगता येत नाही. धातू, वस्तू आदींच्या किमतीत वाढ, तंत्रज्ञानाच्या किमतीत वाढ, सुरक्षा विषयक उपकरणांचे नियम आदींमुळे मोटारींच्या किमती वाढत आहेत. मात्र एकदा का आपल्या अर्थव्यवस्थेच्या वाढीने गती घेतली की लोकांना मोटारी सहज परवडतील, असेही ते म्हणाले.

भारत हा तरुणांचा देश असल्यामुळे मोटारी प्रथमच खरेदी करणारे हे तरुण, एकूण ग्राहकसंख्येत निम्मे आहेत. यापुढेही खाजगी वाहतूकीच्या गरजा वाढणार आहेत, कारण आपल्याकडे सार्वजनिक वाहतूक सुविधा फार वेगाने वाढत नाहीत. त्यामुळे या तरुणांना परवडेल अशा दरातच गाड्या दिल्या पाहिजेत. हल्ली मोटार घेणारा ग्राहक तिच्या ऍव्हरेज बरोबरच सोयी आणि स्वस्त किंमत या गोष्टी बघतो. भारतात एक हजार लोकांमागे केवळ ३२ मोटारी आहेत. अमेरिकेत हेच प्रमाण ८०० आहे. अल्टो ही गेली १६ वर्षे सर्वात जास्त विकणारी मोटार आहे, दर तासाला शंभर अल्टो मोटारी विकल्या जातात. अल्टो ची वेगळी कंपनी असती तर ती भारतातली चौथी सर्वात मोठी कंपनी झाली असती अशीही माहिती श्रीवास्तव यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.