कामातून ब्रेक घेतल्यानंतर असा करा वेळेचा सदुपयोग

स्वत:साठी वेळेचा 'असा' करा सदुपयोग
Me Time
Me Timeesakal
Updated on

घरची (Home) आणि ऑफिसची (Office) कामे करताना ब्रेक (Break) घेणे खूप महत्त्वाचे आहे. यामुळे तणाव (Stress) कमी होतो आणि काम चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्याची प्रेरणा (Motivation) मिळते. जेव्हा आपण कामातून काही मिनिटे विश्रांती घेतो, तेव्हा या ब्रेकचा 'Me Time' म्हणून वापर करा, म्हणजेच मोबाइल (Mobile)किंवा टीव्हीकडे (TV) टक लावून बसण्याऐवजी स्वतःसाठी वेळ घालवा. कामाच्या दरम्यान लागणारा वेळ आपण कसा वापरू शकतो.

Me Time
ऑफिस मिटींगला जाण्यापूर्वी फॉलो करा 'या' महत्त्वपूर्ण गोष्टी

जेव्हा ब्रेक पाच मिनिटांचा असतो...

- तुम्ही घरी असाल तर फळे (Fruits), हिरव्या भाज्यांची कोशिंबीर (Salad) आणि ड्रायफ्रुट्स (Dry fruits) खाऊ शकता. हे ऊर्जा देईल आणि मेंदूचे कार्य सुधारेल.

- तुम्ही करत असलेल्या कामावर लक्ष द्या आणि आवडता आर्टिकल वाचा. तुम्ही एखादे पुस्तक (Books) वाचत असाल तर त्यातील काही भागही तुम्ही वाचू शकता. हे घरी आणि ऑफिसमध्ये दोन्ही केले जाऊ शकते.

- तुम्ही घरी किंवा ऑफिसमध्ये सतत काम करत असाल, तर पाच मिनिटांच्या ब्रेकमध्ये हात आणि मानेला मसाज करा. हे रक्त प्रवाह सुधारेल आणि तणाव कमी करेल.

- मेंदूच्या व्यायामासाठी, तुम्ही कोडी सोडवू शकता किंवा मेंदूचे खेळ(ब्रेन गेम्स) खेळू शकता, जसे की सुडोकू, रुबिक्स क्यूब किंवा क्रॉसवर्ड इ.

Me Time
ऑफिसमध्ये घर नको आणि घरात ऑफिस, काम करा जरा हटके

जेव्हा ब्रेक 10 मिनिटांचा असतो...

- ऑफिसमध्ये सतत बसणे आरोग्यासाठी (Health)चांगले नाही. यादरम्यान फेरफटका मारणेही महत्त्वाचे आहे. जर तुम्ही 10 मिनिटांचा ब्रेक घेऊ शकत असाल, तर कॉफी मशीनमधून तुमची स्वतःची कॉफी (Coffee)किंवा चहा (Tea) बनवा आणि मोकळ्या जागेत उभे राहून प्या. हे घरी देखील करता येते.

- या मध्यंतरात ऑफिस किंवा घरातील कपाट किंवा ड्रॉव्हर्स साफ करता येतात.

- तुम्ही कोणत्याही व्यक्तिमत्वाचे प्रेरणादायी व्हिडिओ (Inspirational videos)देखील पाहू शकता. यामुळे मनाला आराम मिळेल, मानसिक थकवा (Mental fatigue)कमी होईल आणि पूर्वीपेक्षा जास्त उत्साहाने काम पूर्ण करता येईल.

जेव्हा ब्रेक 15 मिनिटांचा असतो...

- 15-मिनिटांचा ब्रेक घेतल्यास, हा वेळ शारीरिक हालचालींसाठी वापरा. घरी किंवा ऑफिसमध्ये शांततेने एकटे फिरा. यामुळे शारीरिक हालचाल होईल आणि ऊर्जा स्थिर राहील. पण चालताना मोबाईल (Mobile) नजरेआड राहील याची काळजी घ्या.

-तुम्ही व्यस्त (Busy)असाल तेव्हा तुमच्या जवळच्या किंवा कुटुंबातील सदस्यांशी फोनवर बोलू शकता. पण या दरम्यान उभे राहा किंवा चालत राहा.

- म्युझिक हे मन शांत करण्याचाही उत्तम मार्ग आहे.

- जेव्हा तुम्ही कामातून ब्रेक घ्याल तेव्हा तुमचे आवडते संगीत (Music) ऐका. मोकळ्या हवेत फेरफटका मारणे आणि एकटे संगीत ऐकणे चांगले.

Me Time
‘होम ऑफिस’साठी काही टिप्स;घरून  काम करताना...

जेव्हा ब्रेक 15 मिनिटांचा असतो...

- 15-मिनिटांचा ब्रेक घेतल्यास, हा वेळ शारीरिक हालचालींसाठी वापरा. घरी किंवा ऑफिसमध्ये शांततेने एकटे फिरा. यामुळे शारीरिक हालचाल होईल आणि ऊर्जा स्थिर राहील. पण चालताना मोबाईल (Mobile) नजरेआड राहील याची काळजी घ्या.

-तुम्ही व्यस्त (Busy)असाल तेव्हा तुमच्या जवळच्या किंवा कुटुंबातील सदस्यांशी फोनवर बोलू शकता. पण या दरम्यान उभे राहा किंवा चालत राहा.

म्युझिक हे मन शांत करण्याचाही उत्तम मार्ग आहे.

- जेव्हा तुम्ही कामातून ब्रेक घ्याल तेव्हा तुमचे आवडते संगीत (Music) ऐका. मोकळ्या हवेत फेरफटका मारणे आणि एकटे संगीत ऐकणे चांगले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()