Meditation Tips: मेडिटेशन करताना मन विचलित होत असेल तर करा 'हे' काम

Meditation Tips: सध्याच्या धावपळीच्या जीवनात अनेक लोक स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी योगा आणि ध्यान करतात. पण अनेक लोकांचे ध्यान करतांना मन विचलित होते.
Meditation
MeditationSakal
Updated on

Meditation Tips:  सध्याच्या धावपळीच्या जीवनात अनेक लोक स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी योगा आणि ध्यान करतात. पण अनेक लोकांचे ध्यान करतांना मन विचलित होते. यामुळे पाहिजे तसा रिझल्ट मिळत नाही . यामुळे तुम्हाला जर मन विचलित न होत ध्यान करायचे असेल तर पुढील गोष्टी लक्षात ठेऊ शकता.

वेळ निश्चित करावी

तुम्हाला जर ध्यान करायचे असेल तर त्याची वेळ निश्चित करावी.

ध्यानाची वेळ रोज बदलली तरी ध्यान बळकट होण्यात अडचण येते. अशा परिस्थितीत तुम्ही त्यासाठी ठराविक वेळ ठरवून दररोज त्याच वेळी सराव करणे महत्त्वाचे आहे.

घाई करू नका

ध्यान करताना घाई करू नका. ध्यान करण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. यासाठी नियमितपणे सराव करावा. यामुळे मन शांत राहील आणि तणाव कमी होईल.

Meditation
World Brain Day 2024: 'या' 5 गोष्टींमुळे मेंदुचे आरोग्य होऊ शकते खराब, वेळीच व्हा सावध

रिलॅक्स बसावे

ध्यान करताना सर्वात आधी रिलॅक्स बसावे. यामुळे ध्यान करताना कोणताही समस्या येणार नाही. ध्यान केल्याने शरीराचा जडपणा कमी होतो. तसेच तुमचे ध्यान देखील विचलित होणार नाही.

शांतता असावी

ध्यान करण्यासाठी योग्य जागेची निवड करणे गरजेचे आहे. ध्यान करताना वातावरण शांत असावे. यामुळे तुम्हा मन एकाग्र करू शकाल आणि मन विचलित होत नाही.

संगीत ऐकावे

ध्यान करताना शांत संगीत एकावे. यामुळे मनं शांत राहण्यास मदत मिळते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com