मेघा धाडे शर्मिष्ठा राऊत मैत्री म्हणजे दोन व्यक्तींमध्ये असलेले एक अनमोल आणि विशेष जे नाते विश्वास, समर्पण आणि परस्पर सहानुभूतीवर आधारित असते. असंच मैत्रीचं अनमोल नातं आहे अभिनेत्री मेघा धाडे आणि शर्मिष्ठा राऊत यांच्यामध्ये..याविषयी मेघा म्हणाली, ‘‘मी शर्मिष्ठाला सर्वांत पहिल्यांदा भेटले ते २००९ मध्ये. त्यावेळी मी एक मराठी मालिका करत होते आणि नंतर मला एका हिंदी मालिकेमध्ये संधी मिळाली, तेव्हा त्या मराठी मालिकेमध्ये मला शर्मिष्ठानं रिप्लेस केलं होतं. त्यावेळेपासून मी तिला पाहतेय. त्यांनतरही अनेक पुरस्कार सोहळ्यांमध्ये आम्ही एकमेकींना भेटलो; पण ती आमची वरवरची ओळख होती. त्यावेळी आमची काही मैत्री होती असे नाही म्हणता येणार... आमची खऱ्या अर्थानं मैत्री झाली ती ‘बिग बॉस’च्या घरात. खरंच म्हणजे ज्या घरात भलेभले जीवश्चकंठश्च मित्र एकमेकांचं दुश्मन होतात, त्या घरात शर्मिष्ठा माझी लाइफटाइम बेस्ट फ्रेंड झाली. मला खरंच कोणाचीतरी गरज होती, तेव्हा ती त्या घरात आली. तिनं सुरुवातीपासून माझा प्रवास पाहिला होता, त्यामुळे ती घरात आल्यानंतर तिनं माझ्यासमोर मैत्रीचा हात पुढे केला आणि मी देखील तिचा हात पकडला आणि आता तो हात आम्ही कधीच नाही सोडू शकत.’’मेघाविषयी शर्मिष्ठा सांगत होती, ‘‘मेघा अतिशय मनमिळाऊ आणि एखाद्याला पटकन आपलंसं करून घेणारी व्यक्ती आहे. शिवाय ती कोणालाही दुःखात नाही बघू शकत. तिला सगळ्यांना आनंदी पाहायला आवडतं. तिचा स्वभाव अतिशय साधा सोपा सरळ आहे. तुम्ही तिला प्रेम दिलं, तर ती त्यांना दहापट प्रेम तुमच्यावर करेल; पण विनाकारण तिला कोणी नडलं, तर ती त्याला अद्दलही घडवू शकते. त्यासोबत मी असंही नक्कीच म्हणेन, की एक वेळ तिला कोणी त्रास दिला, तर ती कदाचित माफ करेल; पण तिच्या माणसांना कोणी त्रास दिला, तर ती त्या व्यक्तीला अजिबातच माफ करणार नाही. तिचा हा स्वभाव मला खूप आवडतो.’’.निसर्गाचं देणं लाभलेला सिंधुदुर्ग.शर्मिष्ठा पुढे म्हणाली, ‘‘तिच्या स्वभावातील मला आवडणारी गोष्ट म्हणजे तिला मैत्री जपता येते. मैत्रीण कशी असावी याचं ती एक बेस्ट उदाहरण आहे. कोणत्याही अपेक्षा न ठेवता ती प्रेम करते. कोणत्याही गोष्टी ती समोरच्यावर लादत नाही. ती एखाद्या बाबतीत तिची मतं मांडते, समजावण्याचा प्रयत्न करते; पण कधीही तिचं मत ती समोरच्या व्यक्तीवर थोपत नाही. गोष्टी तिथल्या तिथे सोडून सतत पुढे जात राहण्याचा तिचा स्वभाव नक्कीच वाखाणण्याजोगा आहे.’’मेघा म्हणाली, ‘‘शर्मिष्ठा माझी मैत्रीण आहे म्हणून तिचा अभिमान वाटतो आणि एक व्यक्ती म्हणून मला तिचा खूप आदर वाटतो. इंडस्ट्रीमध्ये काहीही आगापीछा नसताना तिनं स्वतःच्या टॅलेंटवर आणि आत्मविश्वासाच्या जोरावर स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं आहे, स्वतःची ओळख निर्माण केली आहे. मला खरंच तिच्या कामाचं तिच्या जिद्दीचं आणि तिच्या हार्डवर्कचं खरंच खूप कौतुक आहे. आताच ‘झी मराठी’ वाहिनीचा पुरस्कार सोहळा पार पडला. त्यावेळी आमची भेट झाली. याप्रसंगी तिला अनेक पुरस्कारही मिळाले. त्यावेळी तिनं मला सांगितलं, की हे सगळे पुरस्कार तुझंच आहे- कारण ती तिच्या कामामुळे मला जास्त वेळ नाही देऊ शकत आणि त्याच्या बदल्यात तिनं जी कामं केली, त्याचं फळ म्हणजे तिला मिळालेले ते पुरस्कार तिनं माझ्यासोबत शेअर केले. सोबतच ती हे देखील म्हणाली, की पुढच्या वर्षी पुरस्कार सोहळ्यात तू देखील असे अनेक पुरस्कार घे- जे माझे असतील.’’(शब्दांकन : मयूरी गावडे).सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.