मेंदीच्या पानावर...

स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गायलेले ‘मेंदीच्या पानावर मन अजून झुलते गं…’ हे गीत आजही मेंदीचे विलक्षण सौंदर्य अधोरेखित करते.
Mehandi
Mehandisakal
Updated on

स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गायलेले ‘मेंदीच्या पानावर मन अजून झुलते गं…’ हे गीत आजही मेंदीचे विलक्षण सौंदर्य अधोरेखित करते. मेंदीचा सुगंध मनाला वेड लावतो. अंगातील दाह शांत करतो. नववधूच्या हातावर काढलेली मेंदी रंगते, तेव्हा ती वधू मनातून अधिकच आनंदी होते. मेंदीचे असंख्य प्रकार बघितले की थक्क होते.

मेंदी लावणे जवळपास प्रत्येक मुलीलाच खूप आवडते. मग ती मॉडर्न असो किंवा साधे राहणीमान असणारी तरुणी. मेंदीला भारतीय व्यवस्थेत सन्मानाचे स्थान. आधुनिक काळातही परंपरेला जोडणाऱ्या मेंदीचा इतिहास अगदी पाच हजार वर्षांपासून आढळतो.

वेगवेगळ्या प्रकारच्या मेंदी डिझाइन्स असल्याने तुमच्याकडे प्रयोग करायला खूप प्रकार आहेत. मेंदी फुल हँड असते किंवा नुसती तळहातावर काढता येते.

फुल हँड मेंदीसाठी ‘फ्लोरल सिम्फनी’ हा प्रकार अत्यंत नाजूक आणि देखणा आहे. ॲबस्ट्रॅक्ट प्रकारातील या मेंदीमध्ये पाने-फुले असतात. ही मेंदी ‘मुघलाई’ मेंदी म्हणून ओळखली जाते. फुलांच्या परफेक्ट नाजूक रेषा अचूक काढता आल्या, तर ही मेंदी भाव खाऊन जाते.

अरेबिक मेंदीसुद्धा तिच्या नाजूक आणि क्लिष्ट डिझाइनची छाप सोडते. तपशीलवार डिझाइनमुळे ही मेंदी संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. ‘पेस्ले मॅजिक’मध्ये आंब्याचे क्लिष्ट डिझाइन असते, तर ‘मयूर महिमा’ या डिझाइनमध्ये सौंदर्याचे प्रतीक असलेला भव्य मोर, पूर्ण हातावर काढला जातो आणि मोराची पिसे संपूर्ण हाताभर काढली जातात.

या मेंदीमध्ये स्ट्रोक महत्त्वाचे असतात. भौमितिक रचनांची तितकीच सुंदर मांडणी ‘मंडला मॅजिक’ या मेंदीमध्ये दिसते. ही मेंदी अत्यंत क्लिष्ट असते; पण परफेक्ट मेंदी आर्टिस्ट ही मेंदी काढतो, तेव्हा डोळ्यांचे पारणे फिटते. सेलिब्रेटी कॅनव्हास या प्रकारात ‘बाहो मेंदी’ हा प्रकार लोकप्रिय होतोय. यामध्ये हातामध्ये ज्वेलरीऐवजी मेंदी लावली जाते.

तुम्ही निवडलेल्या डिझाइनवरही आर्टिस्ट हुबेहूब मेंदी काढतात. स्टायलिश इफेक्ट असणारी ही मेंदी हातावर आणि पायावरही काढली जाते आणि या मेंदीला स्टोरी असते. पृथ्वी, निसर्ग आणि भावनांचा प्रभाव असलेल्या सुंदर कलाकृती भारतीय मेंदी डिझाइनमध्ये दिसतात.

भारतीय मेंदी तर आजही आवर्जून काढली जाते आणि ही मेंदी छानच दिसते. ‘राजा-राणी गाथा’ हा ट्रेंड म्हणजे एक प्रकारचे ‘रॉयल पोर्ट्रेट’. हा क्लासी प्रकार विवाह सोहळ्यांत लोकप्रिय होतोय. पायावरची मेंदी काढतानाही पोर्ट्रेटप्रमाणे डिझाइन असतात. या मेंदीचा कुठला एक प्रकार सांगणे अवघड आहे; पण बाहो मेंदीच्या अत्यंत नाजूक आणि साध्या डिझाइन पायाचे सौंदर्य खुलवतात.

‘बॉर्डर मेंदी’मध्ये तर अजूनच ॲडव्हान्स्ड प्रकार. यामध्ये वधूच्या ड्रेसच्या रंगाची बॉर्डर असते. या बॉर्डरच्या आत मेंदी काढली जाते. मेंदी पुराण असेच आहे. जितके प्रकार शोधले तितके कमी. डिझाइन कोणतीही निवडा, बस मेंदी काढण्याचा क्षण एन्जॉय करा.

पुरातन काळापासून वापर

इजिप्तमध्ये खूप पुरातन काळी मेंदीचा वापर केला जायचा. सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी धडपडणाऱ्या इजिप्शियन राणी केस व नख रंगवण्यासाठी मेंदी वापरायच्या. मात्र, भारतीय संस्कृतीमध्ये मेंदीचा वापर त्याच्याही आधीपासून चालत आला आहे, असे सांगितले जाते. त्या-त्या वेळच्या राजसत्तांचा प्रभाव मेंदीच्या कलेवर दिसतो, असेही म्हटले जाते.

मेंदी आणि ‘कथा’

प्रत्येक वधूसाठी तिचे लग्न हा तिच्या आयुष्यातील सर्वांत महत्वाचा क्षण असतो. या क्षणाला स्मरणीय करण्यासाठी मुली अगदी छोट्याही क्षणांचा आनंद घेतात. ‘प्रेम आणि परंपरेची टेपेस्ट्री’ म्हणजे कथा. यामध्ये कथेवर आधारित मेंदी काढली जाते.

या डिझाईन्समध्ये मुलीचा जन्म ते लग्न असा प्रवास असतो. हा प्रकार काढणे आव्हानात्मक आहे; पण अशा प्रकारची मेंदी काढणे मेंदी आर्टिस्टचे स्वप्न असते. हा कॅनव्हास केवळ नववधू नाही तर तिच्या अवतीभवती असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीलाही सुंदर आठवणी देतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.