Men Skin Care Tips: पावसाळ्यात पुरुषांनी त्वचेची काळजी कशाप्रकारे घ्यावी? फॉलो करा ‘या’ टिप्स

या टिप्स फॉलो केल्याने तुमची त्वचा निरोगी आणि स्वच्छ राहील.
skin
skinsakal
Updated on

बदलत्या ऋतूमध्ये केवळ आरोग्याचीच नव्हे तर त्वचेचीही अधिक काळजी घेण्याची गरज आहे. दमट हवामानात अनेकांना त्वचेच्या समस्यांना सामोरे जावे लागते. मुरुम, डाग आणि टॅनिंग टाळण्यासाठी अनेक पद्धती वापरल्या जाऊ शकतात.

पावसाळ्यात निरोगी त्वचेसाठी पुरुषही या टिप्स फॉलो करू शकतात. या टिप्स फॉलो केल्याने तुमची त्वचा निरोगी आणि स्वच्छ राहील. पावसाळ्यात पुरुष कोणत्या स्किनकेअर टिप्स फॉलो करू शकतात ते आम्ही तुम्हाला सांगतो.

skin
Weight Loss: वजन कमी करायचंय? मग फ्रिजमधील थंड पाणी पिणे टाळा, नाहीतर...

क्लींजिंग

त्वचेच्या अतिरिक्त तेलावर नियंत्रण ठेवण्यासाठी, दिवसातून किमान दोनदा चेहरा धुवा. ऑइल फ्री क्लिंझर वापरा. यासोबतच मुरुमांपासून बचाव करण्यासही मदत होईल. त्वचेच्या अतिरिक्त तेलावर नियंत्रण ठेवण्यासाठी, घाण आणि घाम टाळण्यासाठी, दिवसातून दोनदा आपला चेहरा धुवा.

एक्सफोलिएट

त्वचा एक्सफोलिएट करा. हे डेड स्किन सेल्स काढून टाकण्यास मदत करते. यामुळे बंद छिद्रे उघडतात. त्वचेसाठी माईल्ड स्क्रबचा वापर केला जाऊ शकतो.

वाटर बेस्ड मॉइश्चरायझर

दमट हवामानात हलके मॉइश्चरायझर वापरा. त्वचेसाठी तुम्ही वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर वापरू शकता. याच्या मदतीने तुम्ही त्वचेला ग्रिसी होण्यापासून वाचवू शकाल. तसेच, तुमची त्वचा हायड्रेटेड राहील.

skin
Side Effects Of Tickling: बाळाला हसवण्यासाठी तुम्ही गुदगुल्या करता का? थांबा असं करणं ठरू शकतं घातक

सनस्क्रीन

निरोगी त्वचेसाठी सनस्क्रीन वापरा. याच्या मदतीने तुम्ही त्वचेचे हानिकारक अतिनील किरणांपासून संरक्षण करू शकाल. बाहेर जाण्यापूर्वी तुम्ही सनस्क्रीन वापरू शकता. याच्या मदतीने तुम्ही त्वचेला टॅनिंग होण्यापासून वाचवू शकाल.

पाणी

त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. पुरेसे पाणी प्यायल्याने शरीरातून टॉक्सिन्सही बाहेर पडतात.पाणी प्यायल्याने तुमची त्वचा नैसर्गिकरीत्या तजेलदार दिसेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.