Men Wedding Wear : सध्या देशात लग्नसराईचा माहोल पहायला मिळतोय. एप्रिलच्या अखेरीस आणि मे महिन्यात लग्नाचे मुहूर्त आहेत. त्यामुळे, मार्केटमध्ये सध्या भावी वर-वधूची खरेदीसाठी लगबग पहायला मिळतेय. लग्नात आजकाल तरूण पारंपारिक पोशाख, शेरवानी परिधान करण्यावर भर देत आहेत. मागील ३ वर्षांमध्ये पारंपारिक पोशाखाच्या खरेदीमध्ये तब्बल २५% वाढ झाली आहे.
पारंपारिक पोशाखांच्या वाढत्या मागणीमुळे वेडिंग वेअरच्या विक्रीमध्ये स्पर्धा निर्माण झाली आहे. परिणामी आदित्य बिर्ला फॅशन, वेदांत फॅशन्स आणि रेमंडसह इत्यादी वेडिंग आऊटलेट्स आणि ब्रॅण्ड्समध्ये टक्कर निर्माण झाली आहे. लग्नातील पुरूषांच्या पारंपारिक पोशाखांपैकी एक असलेली शेरवानी स्टॅंडआऊट श्रेणी म्हणून उदयास आली आहे. विशेष म्हणजे या शेरवानीची एकूण विक्री एक चतुर्थांश आहे.
वेडिंग पोशाखासाठी प्रसिद्ध असलेल्या तस्वाचा व्यवसाय दुप्पट झाला आहे. विशेष म्हणजे तस्वाच्या अंगरखा सिल्हूटने (Angrakha Silhouette) ग्राहकांमध्ये चांगली लोकप्रियता मिळवली आहे, अशी माहिती तस्वाचे ब्रॅंड प्रमुख आशिष मुकुल यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना दिली.
शेरवानीला आणि अंगरख्याला मागणी वाढल्यामागचे कारण सांगताना ते म्हणाले की, हे मुख्यत्वे देशभरात रिटेलच्या वाढलेल्या विस्तारामुळे आणि ग्राहकांना त्यांच्या आवडीनिवडीनुसार मिळणाऱ्या विविध प्रकारच्या डिझाईन्समुळे घडत आहे.
मागील २ वर्षांपासून तस्वाचे मार्केटिंग करणारे आदित्य बिर्ला फॅशन आणि रेमंड एथनिक्स यांनी मिळून तब्बल १८३ आऊटलेट्स एकमेकांशी जोडले. त्यासोबतच वेदांत फॅशन्सची ९४ दुकाने आहेत. जे ‘मान्यवर’ म्हणून अधिक लोकप्रिय आहेत. I-Sec कंपनीच्या अंदाजानुसार, पुढील २ वर्षांमध्ये हे दोन्ही फॅशन ब्रॅंड्स सुमारे ३०० स्टोअर्स पार्टनरशिपमध्ये उघडतील अशी दाट शक्यता आहे.
वेडिंग फॅशनच्या जगतात वेदांत फॅशन्सच्या यशामुळे वेडिंग-वेअर सेगमेंटमध्ये त्यांची आता इतर ब्रॅंड्ससोबत स्पर्धा सुरू झाली आहे, असे एका अहवालात म्हटले आहे. शिवाय, वेडिंग वेअरच्या प्रिमियम सेगमेंटमध्ये मागील काही वर्षांमध्ये भरीव वाढ होत आहे. ज्याला तरूणांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. ग्राहक विशेष प्रसंगांसाठी उच्च दर्जाची उत्पादने आणि पोशाखांची निवड करत आहेत. त्यामुळे, लक्झरी ब्रॅंड्सच्या विक्रीमध्ये देखील वाढ होतेय.
मागील काही वर्षांमध्ये मध्यमवर्गाचा वाढलेला विस्तार, विवेकी खर्चातील वाढ आणि उत्साही ग्राहकांमुळे वेडिंगवेअर पोशाखाला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. महत्वाची बाब म्हणजे प्रिमियम सेगमेंटमध्ये देखील लक्षणीय वाढ झाली आहे. खास करून लग्नासाठी शेरवानीला तरूणांची सर्वाधिक पसंती मिळतेय.
यासंदर्भात बोलताना वेडिंग इंडस्ट्रीतील तज्ज्ञ म्हणतात की, भारतीय तरूण लग्नातील पारंपारिक पोशाखाबद्दल अधिकाधिक समजूतदार आणि सुज्ञ झाले आहेत. ग्राहक आजकाल अर्थपूर्ण डिझाईन्सवर भर देऊन लक्झरी लूकसोबतच आरामदायक कपड्यांना प्राधान्य देत आहेत.
परिणामी वेडिंग फॅशनच्या ब्रॅंड्सने वाढत्या बाजारपेठेत प्रभावीपणे प्रवेश केला आहे. उच्च गुणवत्तेच्या डिझाईन्स अधिक व्यापक प्रमाणात ग्राहकांसाठी खुल्या केल्या जात आहेत, असे मत वेडिंग इंडस्ट्रीतील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. लग्नातील पुरूषांच्या शेरवानीसोबत इतर लोकप्रिय पोशाख जसे की, कुर्ता आणि कुर्ता सेट्स पारंपारिक पोशाखांमध्ये मोठ्या प्रमाणात नाविन्यपूर्ण डिझाईन्सची वाढ झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.