Long Term Relationships : प्रेयसींना धोका देत नाहीत दाढी असणारे पुरूष; अभ्यासातून माहिती आली समोर

Men with beards more stable In Relationships : सध्या आपण पाहातो की बरेचशे पुरूष दाढी वाढवत आहेत. दाढी वाढवणाऱ्या पुरुषांबद्दल एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
Men with beards more stable as romantic partners than clean-shaved ones study
Men with beards more stable as romantic partners than clean-shaved ones study
Updated on

सध्या आपण पाहातो की बरेचशे पुरूष दाढी वाढवत आहेत. दाढी वाढवणाऱ्या पुरुषांबद्दल एक महत्वाची माहिती समोर आली आहे. एका अभ्यासानुसार, दाढी असलेले पुरुष हे त्यांच्या रोमँटिक नात्यांमध्ये अधिक स्थिर असतात. तसेच ते नात्यामध्ये कायम चांगले पार्टनर ठरतात, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

अर्काइव्हज ऑफ सेक्शुअल बिहेवियरमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, दाढीवाले पुरुष एखाद्यासोबतच रोमँटिक रिलेशनशिपमध्ये असल्यास ते नवीन पार्टनर शोधण्याची शक्यता कमी असते. तसेच ते त्यांच्या गर्लफ्रेंडला फसवत नाहीत. ते त्यांचा सध्याचा जोडीदार टिकवून ठेवतात.

या अभ्यासात असे दिसून आले आहे की, क्लीन शेव्हन पुरुष नवीन जोडीदार शोधण्याची शक्यता अधिक असते. तर दाढी असलेल्या पुरुषांना नवीन जोडीदार शोधण्याची इच्छा कमी असते. ते त्यांच्या सध्याच्या जोडीदाराची देखभाल करण्यावर आणि त्यांच्या नात्याची काळजी घेण्यावर अधिक लक्ष देतात. हा अभ्यास १८ ते ४० वयोगटातील ४१४ पुरुषांवर करण्यात आला.

Men with beards more stable as romantic partners than clean-shaved ones study
जिल्हाधिकाऱ्यांसमोर लोटांगण! बळकावलेली जमीन मिळवण्यासाठी वृद्ध शेतकऱ्यावर आली वाईट वेळ; Video होतोय व्हायरल

वॉरसॉच्या कार्डिनल स्टीफन विझिन्स्की विद्यापीठाचे प्रोफेसर पीटर जोनासन यांनी या अभ्यासावर लिहिले आहे. ते म्हणाले की दाढी असलेल्या पुरुषांनी अनेक जोडीदार शोधण्याची शक्यता कमी असते. त्याऐवजी ते समोरच्या व्यक्तीमध्ये रोमँटिक आणि कौटुंबिकदृष्ट्या अधिक गुंतवणूक करतात.

चेहऱ्यावर केस असतील तर ते निटनीटके ठेवण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतात. केसांची नियमित काळजी घेण्यासाठी वेळ द्यावा लागतो. ज्या लोकांमध्ये हे गुण असतात ते इतरांचाही आदर करतात. ते आपल्या जोडीदाराची फसवणूक करण्याबद्दल कमी विचार करतात. अभ्यासाच्या लेखकांनी असा दावा केला की, पुरुषांना चेहऱ्यावरील केस का वाढवावे वाटतात याबद्दलचा हा पहिला अभ्यास आहे.

Men with beards more stable as romantic partners than clean-shaved ones study
विकसित भारताचं स्वप्न दूरच... देशात अर्ध्या लोकसंख्येला मिळेना तीन वेळचं जेवण; रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती आली समोर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.