प्रेम असूनही लग्न करण्यास ४ सवयीमुळे नकार देतात पुरुष

Relationship Tips
Relationship TipsEsakal
Updated on

Relationship Tips in Marathi: प्रेम ही खूप सुंदर भावना असते पण ते निभावणे सोपे नसते. प्रेम आहे असे नुसते बोलून चालत नाही तर ते नातं मनापासून आयुष्यभर टिकवावं लागतं. प्रेम मिळवणे काही सोपी गोष्ट नाही. प्रेमात पडल्यानंतर जेव्हा नात्याला नाव द्यायची वेळ येते तेव्हा बरेचशी नाती संपून जातात. लग्नाच्या विषय काढल्यावर बरेच पुरुष मागे सरकतात. प्रत्येक पुरुषांच्या बाबतीत असे होत नाही पण त्यांच्यासोबत होते जे दिर्घकाळ रिलेशनशीपमध्ये (Relationship) राहूनही गर्लफ्रेंडसोबत (Girlfriend) लग्न करत नाही. पुरुषांच्या या सवयी कोणत्या आहेत ज्या रिलेशनशीपला लग्नापर्यंत पोहचव नाही ते जाणून घेऊया...

Relationship Tips
रात्री मुली मोबाइलवर काय सर्च करतात? चार गोष्टी आहेत फेव्हरेट

दिर्घकाळ नात्यामध्ये राहिल्यानंतर ही पालकांना न सांगणे

दिर्घकाळ एकत्र राहिल्यनंतरही जोडप्यांना समजते की त्यांना त्यांच्या नाते आणखी पुढे न्यायचे आहे. नात्याच्या पुढच्या टप्पा म्हणजे लग्नाच्या दिशेने एक पाऊल उचलायला हवे. अशा वेळी दोघांच्या पालकांना (parrents)आपल्या नात्याबाबत सांगावे लागते. पण जर तुमचा जोडीदार इतक्या वर्षांच्या नात्यांनतरही आपल्या कुटुंबापासून तुमचे नाते लपवत असेल तर तुम्हाला देखील त्यांना सांगण्यापासून अडवत असेल तर समजून जा की तो तुमच्या नात्याबाबत गंभीर नाही.

अॅरेंज मॅरेजच चांगले वाटते :

नात्यामध्ये राहूनही कित्येक पुरुषांना लव्ह (Love) मॅरेजपेक्षा अरेंज मॅरेजच(Arrange marriage) जास्त चांगले वाटते. ते लोक प्रेमात तर पडतात पण त्यांना लग्न मात्र अरेंज मॅरेज पध्दतीने करायचे असते. त्यामुळे अशावेळी अचानक तुमच्या बॉयफ्रेंडचे (Boyfriend) लग्न ठरल्याचे तुम्हाला समजू शकते आणि मोठा झटका बसू शकतो. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारचा विचार करणाऱ्या पुरुषांना त्यांचे बोलण्यातून पारखण्याची गरज आहे.

Relationship Tips
तुम्ही कोरोना रुग्णाची देखभाल करताय का? मग या गोष्टींची घ्या खबरदारी

वर्किंग नव्हे हाऊस वाईफ पाहिजे :

जर तुमचे तुमच्या बॉयफ्रेंडसोबत तुमच्या कामाबाबत कित्येकदा भांडण झाली असतील तर तुम्हाला लक्ष द्यायला हवे की काही पुरुषांना महिला आवडत नाही. भलेही एका रिलेशनशीपसाठी तुम्हाला झेलतात पण लग्नाच्या बाबतीत त्यांच्या आयुष्यभराचा प्रश्न त्यांच्यासमोर असतो. कित्येक (Working women)पुरुषांना वाटते की, वर्किंग महिलांचे घराकडे लक्ष नसते, त्यामुळे ते अरेंज मॅरेजला देखील जास्त महत्त्व देत नाही. त्यासाठी तुमचा बॉयफ्रेंड तुमच्या कामाच्या बाबतीत खूश नसतो तेव्हा तुम्ही मोकळेपणाने बोलायला हवे.

कुटुंब आणि समाजाला घाबरणारे :

प्रेम करण्यापेक्षा जास्त निभावण्यासाठी हिम्मत लागते. जे पुरुष भित्रे असतात ते प्रेम तर करतात मात्र लग्नाची वेळ येते तेव्हा मागे हटतात. त्यांच्या मनात कुटुंब आणि लोकांची एक प्रकारची भिती असते. असे पुरुषांकडे कुटुंबासमोर तुमच्यावर प्रेम करत आहेत हे सांगायची हिंम्मत नसते आणि तुमच्यासोबत नाते तोडून टाकण्यसाठी तयार होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.