Mens Skin Care : त्वचेची काळजी असेल तर पुरूषांनी रोज लावायला हवंय मॉइश्चरायझर, नाहीतर...

मॉइश्चरायझर निवडताना ही काळजी घ्यावी
Mens Skin Care
Mens Skin Careesakal
Updated on

Mens Skin Care :

जसजशी थंडी वाढत जाते तसतसे लोकांना त्वचेशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हिवाळ्यात त्वचेची कोरडेपणा, , रूक्ष त्वचा आणि फुटलेले ओठ यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.

हे घडते कारण थंडी त्वचेतील आर्द्रता काढून घेतात. त्यामुळे हिवाळ्यात त्वचेला मॉइश्चरायझेशन ठेवण्याची गरज असते. पण अनेकदा आपण पाहतो की स्त्रिया आपल्या त्वचेची पुरेशी काळजी घेतात. आणि मॉइश्चरायझर देखील वापरतात. पण पुरुष तसे करत नाहीत.

अनेक पुरुष आंघोळ केल्यानंतर किंवा चेहरा धुतल्यानंतर केवळ चेहऱ्यावर मॉइश्चरायझर किंवा स्किन क्रीम लावतात. आणि शरीराच्या इतर भागाकडे लक्ष देत नाहीत. किंवा फक्त शरीराच्या इतर भागांच्या त्वचेवर तेल लावतात.

Mens Skin Care
Winter Skin care: हिवाळ्यात परफेक्ट मॉईश्चरायजर कसं निवडायचं; जाणून घ्या

सर्वसाधारणपणे पुरुष मॉइश्चरायझरच्या वापराला फारसे महत्त्व देत नाहीत. आणि मॉइश्चरायझरची गरज फक्त महिलांनाच असते असे मानतात. तर त्वचेवर मॉइश्चरायझर लावणे प्रत्येकासाठी आवश्यक आहे. पुरुषांनी मॉइश्चरायझर लावावे का हा प्रश्न बरेच जण विचारतात? स्कीन केअर थेरपिस्ट जयश्री शरद यांनी एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये याबद्दल माहिती दिली आहे.

पुरुषांनी मॉइश्चरायझर लावावे का?

जयश्री शरद यांच्या म्हणण्यानुसार, मॉइश्चरायझर फक्त महिलांनीच लावावे, असे मानणे चुकीचे आहे. हे पुरुषांसाठीही तितकेच महत्त्वाचे आहे. आणि त्यांनी ते वापरावे. विशेषतः हिवाळ्यात जेव्हा त्वचा कोरडी आणि निर्जलीकरण होते. पुरुषांनी मॉइश्चरायझर का वापरावे याची खाली 5 कारणे आहेत.

  • त्वचेवर मॉइश्चरायझर वापरणे हा कोरड्या किंवा तेलकट त्वचेचा सामना करण्याचा आणि त्वचेला मॉइश्चरायझ करण्याचा उत्तम मार्ग आहे.

  • मॉइश्चरायझर लावल्याने सुरकुत्या आणि बारीक रेषा यांसारख्या वृद्धत्वाची चिन्हे टाळण्यास मदत होते.

  • दररोज त्वचेवर मॉइश्चरायझर लावल्याने मुरुम, अॅलर्जी आणि त्वचेशी संबंधित इतर समस्यांचा धोका कमी होतो.

  • चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावल्याने त्वचेचे वातावरणातील हानिकारक कणांपासून संरक्षण होते.

  • तुमच्या त्वचेची काळजी घेण्याचा हा एक सोपा आणि अतिशय प्रभावी मार्ग आहे.

Mens Skin Care
Winter Skin Care : हिवाळ्यात घरच्या घरी बनवा 'हे' खास फेस सीरम्स, जाणून घ्या बनवण्याची पद्धत

पण मॉइश्चरायझर निवडताना या गोष्टी लक्षात ठेवा

  1. सेरामाइड्स असलेले मॉइश्चरायझर्स निवडा, हे त्वचेचे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत, ते एक संरक्षणात्मक थर तयार करतात आणि त्वचेचे सूक्ष्म जीवाणू तसेच हवेतील हानिकारक कण, प्रदूषण इत्यादींपासून संरक्षण करतात.

  2. शिया बटर किंवा कोकोआ बटर सारख्या ब्लॉकर्सना विसरू नका, जे त्वचेला सील करतील, ते त्वचेवर एक थर तयार करतात.

  3. तुम्ही केवळ तुमच्या चेहऱ्यावरच नव्हे तर तुमच्या शरीरावरही मॉइश्चरायझर लावावे आणि ओलावा टिकवून ठेवण्यासाठी किंचित ओलसर त्वचेवरही मॉइश्चरायझर लावायला विसरू नका.

Mens Skin Care
Winter Skin Care: हिवाळ्यात ओठ फाटण्याची समस्या वाढतेय? मग ट्राय करा हे होममेड लिप मास्क

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()