Work Balance Lifestyle: आजकाल सगळ्यांचे जीवन फारच व्यस्त झाले आहे. ऑफिसला जाणाऱ्यांसाठी तर ऑफिस हे त्यांचे दुसरे घर आहे. यानंतर घरी पोहोचल्यावर देखील आपले लक्ष ऑफिसचे काम, मेल्स, यासारख्या गोष्टींवर असते. त्यामुळे आपण कुटुंबाकडे लक्ष देऊ शकत नाही.
खरं तरं आजच्या वेगाने विकसित होत असलेल्या समाजात महिला पुरूषांच्या खांद्याला खांदा देत काम करत आहे. प्रत्येक क्षेत्रात महिला आपले कौशल्य दाखवत आहे. अनेक महिला आपले काम आणि कुटुंबात समतोल राखतात. त्याचप्रमाणे पुरूष देखील काम आणि कुटूंबात समतोल राखण्यासाठी कोणत्या गोष्टी करू शकतात हे जाणून घेऊया.