Periods Pain Increases in Winter Season : हिवाळ्यात तुम्हालाही पाळीचा त्रास जास्त होत असल्याचं जाणवतं का? पाळीच्या काळात होणारी पोटदूखी, मूडस्विंग्ज इतर त्रासही या काळात वाढतात असं बऱ्याच महिलांचं म्हणणं आहे. यामागचं कारण तज्ज्ञांनी सांगितलं आहे.
जाणून घ्या कारण
व्हिटॅमिन डी ची कमतरता
या त्रासामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे व्हिटॅमिन डीची कमतरता आहे. या ऋतूत दिवस लहान आणि रात्र मोठ्या होतात. त्यामुळे सूर्यप्रकाश कमी मिळतो. हाच व्हिटॅमिन डी चा सर्वात मोठा सोर्स असतो.
पाळीच्या काळात शरीरात प्रोस्टाग्लँड नावाचं हार्मोनसारखा पदार्थ तयार होतो. त्यामुळे महिलांना जास्त त्रास होतो. व्हिटॅमिन डी या पदार्थाच्या प्रॉडक्शनला कमी करण्यास मदत करतात. ज्यामुळे त्रास कमी होतो.
थंडीत महिलांमध्ये मूड स्विंग्जपण जास्त होतात. या ऋतूत जास्त काळ घरात घालवल्याने शारीरिक हालचाली कमी होतात. याचा थेट परिणाम मूडवर होतो.
पाळीत त्रास कमी करा
पाळीचा त्रास कमी करण्यासाठी व्हिटॅमिन डीची कमतरता भरून काढावी.
व्हिटॅमिन डी ची कमतरता भरून काढण्यासाठी उन्हात जास्तवेळ बसायला हवं. याशिवाय मासे, ॲनिमल फॅट , संतऱ्याचा ज्यूस, दूध आणि धान्य खाल्यानं त्रास कमी होतो.
हल्की-फुलकी एक्सरसाइज करायला हवी. घरात बसून राहण्या ऐवजी बॉडी ॲक्टिव्ह रहायला हवं. यामुळे शरीरात होर्मोन्स रिलीज होतात. जो मूड फ्रेश करून ब्लीडिंग आणि त्रास कमी होतो.
दुखत असेल तर हीटिंग पॅड आणि गरम पाण्याची बॉटल वापरा. लगेच आराम पडेल.
पाळीत हलका आहार घ्यायला हवा. सर्व प्रकारचे न्यूट्रियंटस आहारात घ्यावे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.