‘ते पाच दिवस’; जाणवणाऱ्या अडचणी, समस्या, वेदना आणि उपाययोजना

स्त्रियांच्या आयुष्यातील बालपण आणि प्रौढत्व या कालावधीत ‘ते पाच दिवस’ मुख्य भाग असतात
Menstruation
MenstruationMenstruation
Updated on

मासिक पाळी (Menstruation) हे निसर्गाने स्त्रियांसाठी रचलेला विशिष्ट जैविक टप्पा आहे. जोवर स्त्रीला पाळी येत नाही तोवर ती समाजात अपूर्ण आहे असे समजले जाते. पाळी आली तर तिला घाण आहे अशी भावना खेडेगावातच नाही तर मोठ्या शहरात देखील धारणा आहे. स्त्रियांच्या आयुष्यातील बालपण आणि प्रौढत्व या कालावधीत ‘ते पाच दिवस’ मुख्य भाग असतात. अशा वेळी स्त्रियांना जाणवणाऱ्या अडचणी, समस्या, वेदना आणि उपाययोजना याबाबत स्त्रीरोगतज्ज्ञांसोबत साधलेला संवाद.

1) शाळेत जातांना अशक्तपणा जाणवतो त्यावेळेस काय करावे?

- अशावेळेस शरीराला पुरेसा आराम दिला नाही तर अशक्तपणा जाणवतो. म्हणून शक्यतो तेवढा आराम करावा. फळे, पालेभाज्या असा योग्य आहार घ्यावा.

2) पाळीच्या वेळी किंवा पाळी येण्याआधी पोटदुखीचा आणि कंबरदुखीचा त्रास असल्यास काय करावे?

- हा त्रास सामान्य आहे.बऱ्याचदा हा त्रास पाळी येण्याअगोदर होतो किंवा पाळी आल्यानंतर पोटदुखी व कंबरदुखीचा त्रास सुरू होतो.हा त्रास कमीजास्त प्रमाणात असते.त्यामुळे चिडचिड होऊ शकते.अशावेळेस शक्यतो तेवढा आराम करावा,भरपूर पाणी प्यावे,काही सोपे व्यायाम करू शकता,आणि पौष्टिक आहार घ्यावे.जर जास्त त्रास असल्यास डॉक्टरांशी संवाद साधावा.

3) पाळीच्या वेळेस योग्य आणि सोप स्वच्छता साधन म्हणून कशाचा वापर करावा?

- आता बाजारामध्ये मासिक पाळीच्या स्वच्छतेसाठी सॅनिटरी नॅपकिन,टेम्पॉन्स, मॅन्युस्टरल कप ही साधने उपलब्ध असते .साधारणपणे मुली सॅनिटरी नॅपकिनचा उपयोग करतात. कापडी घड्यापेक्षा ते जास्त स्वच्छ आणि सुरक्षित असते असे मला वाटते. त्याचा उपयोग करणे सोप असते.सर्वे त्याच्या गरजेनुसार साधने वापरतात. पण माझ्या मते जर सोप आणि सुरक्षित साधन म्हटलं तर मी सॅनिटरी नॅपकिनचा सल्ला देणार.कापडी घड्यांचा वापर करणे टाळावे असे मला वाटते.

Menstruation
राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात व्हिस्की, स्कॉचचे दर सर्वाधिक

4) स्वच्छता साधनांची काळजी कशी घ्यावी?

- त्या दिवसात स्वच्छता बाळगणे हे महत्त्वाचा मुद्दा असतो.जर त्याचदरम्यान आपण चुकीची साधने वापरली तर ते असुरक्षित ठरते.त्याचे परिणाम होऊ शकते.माझ्या मते महिलांचे आरोग्य निरोगी राखण्यासाठी सॅनिटरी नॅपकिन वापरणे गरजेचे आहे.मासिक पाळीसाठी योग्य स्वच्छता साधनांची निवड करणे देखील महत्त्वाचे आहे.ही साधने दर तीन ते चार तासात बदलणे योग्य असते.त्यादरम्यान शरीर स्वच्छ ठेवणे आवश्यक असते.कारण असे न केल्यास गूप्तांग मार्गास इन्फेक्शन आणि रॅशेस होऊ शकते.असे झाल्यास डॉक्टरांशी सल्ला घ्यावे.

5) रॅशेस झाल्यास काय करावे?

- पॅड आणि त्वचा याचे वारंवार घर्षण झाल्यामुळे रॅशेस होतात.असे झाल्यास घरगुती उपाय टाळावे.अशा वेळेस एक्स्ट्रॉ लार्ज पॅडचा वापर करू नये,घट्ट कपडे टाळावे,जास्त रक्तप्रवाह झाल्यामुळे ओलावा असतो त्यामुळे जास्त त्रास होऊ शकते.अशावेळेस डॉक्टरांच्या सल्ल्याने लगेच उपाय करणे गरजेचे आहे.

Menstruation
सरकारकडून बळाचा वापर; एसटी कर्मचाऱ्यांना दिले पेंडॉल काढण्याचे आदेश

6) पाळीच्या वेळेस योग्य आणि सोप स्वच्छता साधन म्हणून कशाचा वापर करावा?

- आता बाजारामध्ये मासिक पाळीच्या स्वच्छतेसाठी सॅनिटरी नॅपकिन, टेम्पॉन्स, मॅन्युस्टरल कप ही साधने उपलब्ध असते. साधारणपणे मुली सॅनिटरी नॅपकिनचा उपयोग करतात. कापडी घड्यापेक्षा ते जास्त स्वच्छ आणि सुरक्षित असते असे मला वाटते. त्याचा उपयोग करणे सोप असते. सर्वे त्याच्या गरजेनुसार साधने वापरतात. पण माझ्या मते जर सोप आणि सुरक्षित साधन म्हटलं तर मी सॅनिटरी नॅपकिनचा सल्ला देणार. कापडी घड्यांचा वापर करणे टाळावे असे मला वाटते.

त्यादिवसात अशी घ्यावी काळजी

  • कापडी घड्या वापरण्याएवजी सॅनिटरी नॅपकिनचा वापर करावा.

  • वेळोवेळी पॅड बदलणे.

  • स्वच्छता बाळगणे.

  • पाणी भरपूर प्यावे.

  • व्यायाम व प्राणायाम करावे.

  • संतुलित आहार घ्यावे.

  • घट्ट कपडे टाळावे.

- डॉ. विनिता अग्रवाल, स्त्रीरोगतज्ञ

(मुलाखत-संकलन वैष्णवी बोढारे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()