तुम्ही देखील कामामुळे ऑफिसमध्ये सतत Tension मध्ये रहाता? मग या प्रकारे Stress करा दूर

ऑफिसच्या कामाचा ताण कमी करणं तसचं ऑफिसमध्येही काम करत असताना तणावमुक्त राहणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही काही साध्या सवयी किंवा टिप्सची मदत घेतली तर तुमचा ताण नक्कीच कमी होईल.
करा आॅफिसमधला स्ट्रेस दूर
करा आॅफिसमधला स्ट्रेस दूरEsakal
Updated on

वाढता ताण-तणाव ही तशी तर सध्या एक सामान्य समस्या बनत चालली आहे. त्यात खास करून ऑफिसमधील कामाचा ताण Work Load ही तर अनेकांच्या आयुष्यातील एक महत्वाची समस्या आहे. Mental Health Tips in Marathi How to be stress Free in Office

ऑफिसमधील कामामुळे अनेकजण ऑफिसमध्ये तर सतत तणावात Stress राहतातच शिवाय ऑफिसनंतर घरी गेल्यानंतरी ते या तणावापासून दूर होत नाहीत. अनेकजण ऑफिसात आणि घरी आल्यावरही सतत आपलं काम किंवा टार्गेट पूर्ण होईल का? तसंच ऑफिसमधील मिटींग, कॉल्स अशा अनेक गोष्टींमध्ये व्यग्र राहतात.

कामाच्या ताणामुळे नकळत तुमचं मानसिक आरोग्य Mental Health धोक्यात येऊ शकतं. शिवाय या स्ट्रेसचा Stress तुमच्या कामावरदेखील नकारात्मक परिणाम घडू शकतो.

यासाठीच ऑफिसच्या कामाचा ताण कमी करणं तसचं ऑफिसमध्येही काम करत असताना तणावमुक्त राहणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही काही साध्या सवयी किंवा टिप्सची मदत घेतली तर तुमचा ताण नक्कीच कमी होईल.

स्वत:साठी वेळ काढा- सतत ऑफिसच्या कामांचे विचार आणि कामं यामुळे ताण अधिक वाढत जातो. यातून तुम्ही स्वत:साठी वेळ काढण गरजेचं आहे. यासाठी मिटिंग किंवा थोडं काम झाल्यानंतर टी ब्रेक घ्या.

या ब्रेकमध्ये कामाच्या विषयांवरील चर्चा टाळा. या लंच किंवा टी ब्रेकमध्ये एखादं तुमचं आवडतं गाणं ऐका किंवा काही फनी व्हिडीओ तुम्ही पाहू शकता. यामुळे तुम्हाला पुढील काम करण्यासाठी फ्रेश वाटेल.

हे देखिल वाचा-

करा आॅफिसमधला स्ट्रेस दूर
Ayurvedic Remedies For Stress : जीवघेण्या आजारांचं कारण स्ट्रेस, या 7 आयुर्वेदिक उपायांनी असा करा दूर

तसंच ऑफिसला जाताना किंवा येताना कामाचा विचार करू नका. प्रवासामध्ये काही गाणी ऐका. तसंच सुट्टीच्या दिवशी फोन आणि लॅपटॉप दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. आपल्या कुटुंबासोबत किंवा मित्र-मैत्रिणींसोबत वेळ घालवा. यामुळे तणाव कमी होण्यास मदत होईल.

वेळेचं योग्य नियोजन करा- अनेकदा वेळेचं योग्य नियोजन न केल्यासही तणाव वाढू शकतो. तुमची ऑफिसमधील कामं वेळेत पूर्ण झाल्यास किंवा तुम्हाला इतर वेळेत करण्याच्या कामांचं तुम्ही आठवडाभराचं नियोजन केल्यास तणाव कमी जाणवेल.

आठवडाभरात तुम्हाला काय करायचं आहे. याच तुम्ही एक साधारण वेळापत्रक तयार केल्यास तुमचा स्ट्रेस कमी होण्यास मदत होईल.

हे देखिल वाचा-

करा आॅफिसमधला स्ट्रेस दूर
Relationship Stress झटक्यात दूर करेल या सोप्या ट्रिक्स

रिष्ठांशी मोकळेपणाने चर्चा करा- ऑफिसमधील कामामध्ये जर तुम्हाला एखादी शंका किंवा अडचण आल्यास वरिष्ठांशी चर्चा करण्यास जर तुम्हाला संकोच वाटत असेल. तर तणाव वाढू शकतो. शिवाय एखाद्या कामामध्ये त्रूटी निर्माण होवू शकतात. त्या ऐवजी वरिष्ठांशी मोकळेपणाने संवाद साधा.

एखाद्या अडचणीबद्दल किंवा समस्येबद्दल वरिष्ठांशी चर्चा केल्यास तुमचा तणाव कमी होण्यास मदत होऊ शकते.

योगा- केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक स्वास्थ्य चांगलं रहावं यासाठी देखील योगा अत्यंत गरजेचा आहे. तुमच्या बिझी टाइमटेबलमधून नियमितपणे थोडा वेळ काढून योगा केल्यास तुम्हाला रिलॅक्स वाटेल.

रोज सकाळी उठून योगा केल्यास तुमच्या दिवसाची सुरुवात चांगली होईल. तसंच ऑफिसमध्ये देखील तुम्ही काम करताना तणावमुक्त रहाल.

अशा प्रकारे तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये काही साध्या सवयी लावल्यास तुमचा ऑफिसमधील कामाचा ताण कमी होण्यास मदत होईल. शिवाय तणाव कमी झाल्यामुळे तुमच्या कामाची गुणवत्ता देखील सुधारेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()