नैराश्याहून गंभीर आहे Clinical Depression, ही आहेत या विकाराची लक्षणं

डिप्रेशनचा सामना करणाऱ्या व्यक्तीला आधाराची आणि देखलभाल करण्याची गरज असते. अन्यथा अशा व्यक्ती आत्महत्या करण्यासारखं टोकाचं पाऊल उचलू शकतात.
क्लिनिकल डिप्रेशन
क्लिनिकल डिप्रेशनEsakal
Updated on

अलिकडे अनेक कारणांमुळे बऱ्याचजणांमध्ये ताण-तणाव Tension वाढू लागला आहे. चिंता आणि तणावामुळे मानसिक आरोग्य धोक्यात येऊ लागलं आहे. तणावपूर्ण जीवनशैली Lifestyle जगत असताना अनेकांना नैराश्याचा देखील सामना करावा लागतोय. Mental Health Tips Marathi Know about Clinical Depression symptoms

हे नैराश्य Depression वाढत गेल्यास गंभीर समस्या निर्माण होवू शकतात. क्लिनिकल डिप्रेशन Clinical Depression हे असच नैराश्याचं गंभीर स्वरुप आहे. यामध्ये एखादी व्यक्ती स्वतःला नुकसान पोहचवू शकते. क्लिनिकल डिप्रेशनमध्ये काहीवेळीस मानसिक संतुलन पूर्णपणे ढासळू शकतं.

याला मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डर असेही म्हणतात. या डिप्रेशनचा सामना करणाऱ्या व्यक्तीला आधाराची आणि देखलभाल करण्याची गरज असते. अन्यथा अशा व्यक्ती आत्महत्या करण्यासारखं टोकाचं पाऊल उचलू शकतात.

तीन आठवड्यांहून अधिक काळ उदास वाटत राहिल्यास येऊ शकतं नैराश्य

नैराश्याची पहिली पायरी म्हणजे उदास भावना. सतत उदास वाटत राहणं किंवा स्वत:बद्दल दोष किंवा कमीपणा वाटतं राहणं, एकाकी वाटणं यामुळे नैराश्य येऊ लागतं. जर तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ एखाद्या व्यक्तीला सतत उदास वाटत राहिल्यास नैराश्य येण्याची शक्यता असते.

तर काही वेळीस हे नैराश्य टप्प्याटप्प्यामधून येतं आणि ते वाढतं जातं. क्लिनिकल डिप्रेशनमध्ये अशा प्रकारे आलेलं नैराश्य अनेकदा त्या व्यक्तीला तसचं इतरांनादेखील जाणवून येत नाही. इतरांमध्ये ही व्यक्ती सामान्य व्यक्तीप्रमाणेच वागते. मात्र काही ठराविक आठवड्यांच्या किंवा महिन्यांच्या कालामधीने एखाद्या घटनेने किंवा काही कारणांमुळे हे डिप्रेशन पुन्हा ट्रिगर होवू शकतं आणि वाढू शकतं.

हे देखिल वाचा-

क्लिनिकल डिप्रेशन
Depression Cure : डिप्रेशनमध्ये झोपेच्या पॉवरफूल गोळ्या खाण्याऐवजी घरी बसून हे 6 उपाय करा

मेंदूतील काही महत्वाच्या रसायनांमुळे मनाचं संतुलन नियंत्रणात राहण्यास मदत होते. मेंदूतील डोपाईन, सेरेटोनीन आणि एन्डॉर्फिन अशा काही रसायनांमुळे आपलं मानसिक संतुलन स्थिर राखण्यास मदत होते. या रसायनांमुळे विविध भावनांमधून आपण जात असतो. मग ते आनंदी राहणं असो वा उदास वाटणं किंवा राग येणं.

उदास वाटू लागल्यास मेंदूतील सेरेटोनीन हार्मोनचं नियंत्रण बिघडतं. याचा स्तर जास्त खालावल्यास तणाव, चिंता वाढू लागते. नैराश्य येऊन अनेकदा क्लिनिकल डिप्रेशनचा सामना करावा लागू शकतो.

क्लिनिकल डिप्रेशनची लक्षणं

क्लिनिकल डिप्रेशनचा समाना करणारी व्यक्तीस्वत:बद्दल आणि आयुष्याबद्दल कायम नकारात्मक विचार करू लागते.

अशा व्यक्ती कायम स्वत:ला दोष देऊ लागतात. तसचं एखादं नुकसान किंवा घटनेसाठी आपणच जबाबदार असल्याचं मानू लागतात.

एखाद्या कामामध्ये मन एकाग्र करण्यास त्यांना अडचण येऊ लागते. अगदी दैंनंदिन कामातील रुची कमी होवू लागते.

छोट्या छोट्या गोष्टींवर अचानक चिडचिड करणं, क्रोधित होणं किंवा खूप जास्त चिंता करणं, असे बदल त्यांच्या वागण्यात जाणवतात.

क्लिनिकल डिप्रेशनमुळे जेवण न जाणं किंवा जास्त खाणं तसंच थकवा जाणवणं अशा समस्या निर्माण होतात. याचा झोपेवररही परिणाम दिसून येतो. जास्त झोप किंवा झोप न लागणं अशी समस्या दिसू लागतात.

काही वेळेस जास्त नैराश्य आल्याने आत्महत्येचे विचार डोक्यात फिरू लागतात.

क्लिनिकल डिप्रेशनची कारणं

विविध कारणांमुळे एखाद्या व्यक्तीला क्लिनिकल डिप्रेशन येऊ शकतं. यात काही वेळस अनुवांशिक कारणं देखील जबाबदार असू शकतात. त्याचप्रमाणे मधुमेह, थायरॉइड किंवा इतर काही गंभीर आजारामुळे क्लिनिकल डिप्रेशन येत असल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे.

तसंच कुटुंबातील किंवा प्रियजनांपैकी एखाद्या व्यक्तीचा मृत्यू किंवा दुरावा, एखादा अपघात किंवा मानसिक आघात अशी काही कारणं देखील यासाठी जबाबदार असतात.

अशा व्यक्तींची काळजी घेणं गरजेचं

जर तुमच्या जवळची एखादी व्यक्ती क्लिनिकल डिप्रेशनचा सामना करत असेल किंवा तुम्हाला एखाद्या व्यक्तिमध्ये नैराश्याची ही लक्षणं आढळून आल्यास तिची खास काळजी घेणं गरजेचं आहे. अन्यथा अशा व्यक्ती टोकाचं पाऊल उचलू शकतात.

अशा व्यक्तीला कधीही एकाकी वाटू देऊ नका. तिच्याशी वेळोवेळी विविध विषयांवर खास करून त्या व्यक्तीच्या आवडत्या विषयांवर चर्चा करा.

ती एकटी नसून सर्व सुख-दु:खामध्ये तिच्यासोबत कुटुंबातील किंवा मित्र परिवारातील अनेकजण सोबत आहेत याची तिला सतत जाणीव करून द्या.

त्या व्यक्तीची अडचण आणि नैराश्याचं कारण समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि आपल्याला त्याच्या अडचणींची जाणीव असल्याची कल्पना करून द्या.

आयुष्य हे अनमोल आहे. अनेक सकारात्मक गोष्टींनी सुंदर होवू शकतं हे त्यांना पटवून देवून आत्महत्येसारख्या विचारांपासून त्याना परावृत्त करा.

हे देखिल वाचा-

क्लिनिकल डिप्रेशन
Mental Health : कायम स्वत:ला दोष दिल्यास येऊ शकतं नैराश्य, या प्रकारे करा Depression दूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.