Mental Health : तुम्हालाही प्रत्येक गोष्टीवर रिऍक्ट होण्याची सवय लागलीय का? या टिप्स करतील मदत

रागावर नियंत्रण असणारे लोक निरोगी आणि आनंदी असतात
Mental Health : तुम्हालाही प्रत्येक गोष्टीवर रिऍक्ट होण्याची सवय लागलीय का? या टिप्स करतील मदत
Updated on

Mental Health :

बर्‍याच वेळा आपण आपल्या व्यस्त जीवनात आणि सततच्या समस्यांमध्ये इतके अडकून जातो की आपल्या भावनांवर आपले नियंत्रण नसते. अशा परिस्थितीत, काही लोक इतके अस्वस्थ होतात की ते छोट्या छोट्या गोष्टींवरही प्रतिक्रिया देऊ लागतात.

प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणे हा काही लोकांचा सामान्य स्वभाव आहे. पण यामुळे व्यक्तीकडून नकळत मोठ्या चुकाही होतात. अशा परिस्थितीत एखादी व्यक्ती प्रियजनांच्या भावना देखील दुखावू शकते. त्यामुळे आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.  

Mental Health : तुम्हालाही प्रत्येक गोष्टीवर रिऍक्ट होण्याची सवय लागलीय का? या टिप्स करतील मदत
Mental Health: मानसिक आरोग्य बिघडल्यावर 'ही' लक्षणं दिसतात; तुम्हालाही जाणवत असतील तर वेळीच सावध व्हा

रिऍक्ट होण्यापूर्वी विचार करा

जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल राग येतो तेव्हा बहुतेक लोक प्रतिक्रिया देतात. तुम्ही प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया दिल्यास, तुम्ही नकळत तुमच्या जवळच्या व्यक्तीला दुखवू शकता. म्हणूनच, जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटते की तुम्ही एखाद्या गोष्टीवर प्रतिक्रिया द्यावी तेव्हा काही काळ शांत राहण्याचा प्रयत्न करा. तुमच्या प्रतिक्रियेचा समोरच्या व्यक्तीवर काय परिणाम होऊ शकतो याचाही विचार करण्याचा प्रयत्न करा.

लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करा

तुम्हाला शक्य असेल तर गोष्टींवर प्रतिक्रिया देण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करा. अशा स्थितीत तुम्ही त्या ठिकाणाहून काही काळ दूर जाऊ शकता किंवा तुमचे लक्ष दुसऱ्या कशावर तरी केंद्रित करू शकता.  जेव्हा राग येईल तेव्हा मनात उलट आकडे मोजणे, किंवा एखादी कृती परत परत केल्यानेही राग निवळला जाऊ शकतो.

Mental Health : तुम्हालाही प्रत्येक गोष्टीवर रिऍक्ट होण्याची सवय लागलीय का? या टिप्स करतील मदत
World Mental Health Day : निदान मानसिक आरोग्य व्यवस्थेचे

ऍनर्जी वाया घालवू नका

तुम्हाला खूप राग येत असेल तर त्यावर प्रतिक्रिया देण्याऐवजी स्वतःला व्यस्त ठेवा. असे केल्याने तुमचे लक्ष त्या गोष्टीवरून हटवले जाईल आणि तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकाल. तुम्ही रागासाठी देत असलेला वेळ, एनर्जी यामुळे तुमचेच नुकसान होते. ते होऊन द्यायचे नसेल तर, तुम्ही ती एनर्जी साठवून इतर ठिकाणी उपयोगात आणू शकता.

तुमच्यातल्या कमतरता शोधा

जर तुम्हाला तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे कठीण होत असेल आणि प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणे ही तुमची सवय झाली असेल, तर तुम्हाला स्वतःवर काम करावे लागेल. अशा परिस्थितीत, आपण ज्या कारणांमुळे प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देतो ते समजून घेतले पाहिजे. वैयक्तिक आयुष्यामुळे किंवा कामाच्या दबावामुळे. हे तुम्हाला तुमच्या भावना समजून घेण्यास आणि त्यावर कार्य करण्यास मदत करेल.

Mental Health : तुम्हालाही प्रत्येक गोष्टीवर रिऍक्ट होण्याची सवय लागलीय का? या टिप्स करतील मदत
Child Mental Health : सोशल मीडियावर तुमची मुलं किती वेळ घालवताय? 76% टक्के मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम

डॉक्टरांचा सल्ला फायद्याचा ठरेल

सतत रिऍक्शन देणे, चिडचीड करणे, जास्त राग येणे ही तुमची सवय झाली असेल तर याचा अर्थ तुम्हाला तुमच्या भावना कंट्रोल करता येत नाहीत. त्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही औषधोपचार घेऊ शकता.

तुम्ही मानसिक आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कारण योग्य थेरपी आणि समुपदेशनाद्वारे तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकता. तुम्हाला तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकतात. याच्या मदतीने तुम्ही स्वतःला छोट्या छोट्या गोष्टींवर चिडचिड करणं थांबवू शकता.

Mental Health : तुम्हालाही प्रत्येक गोष्टीवर रिऍक्ट होण्याची सवय लागलीय का? या टिप्स करतील मदत
Mental Health: स्मरणशक्ती वाढवायचीये? मग दररोज सकाळी करा ही 7 आसने

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.