नुकताच वर्षातील सर्वात मोठा सण असलेली दिवाळी संपन्न झाली आहे. दिवळी हा सण देवीचा आहे, लक्ष्मी मातेची पूजा या सणात आपण करतो, पती-पत्नीच्या नात्याचा पाडवा आपण साजरा करतो. तसेच, भाऊ-बहिणीची भाऊबीजही साजरी केली आहे. दिवाळीत सर्वचजण गावी जातात, पाहुणे-बहिणी-भावंड एकत्र येत सण साजरा करतात.
काही लोकांना सण संपला की घर रिकामं वाटायला लागतं, मन उदास होतं. काहीच करायची इच्छा नसते. सण-समारंभात केलेली धावपळ, मजा-मस्ती सर्वकाही आठवत असतं. पण असं का होतं याचा कधी विचार केलाय का?
दरवर्षी सण येतात अन् जातात आपल्याला प्रत्येकवेळी असं उदास वाटत राहतं, पण, हे नक्की काय होतं अन् कशामुळे होतं याचा विचार केला का? याबद्दल अधिक माहिती घेऊयात.
चार दिवस जेव्हा सर्वजण एकत्र असतात तेव्हा आपल्या रोजच्या कामातून अन् तणावातून आपण दूर राहतो.कारण, एकत्र कुटुंबात राहणं नेहमी आशादायी आणि दिलासा देणारं असतं. पण अशा वातावरणातून लगेचच बाहेर पडल्यानंतर आपल्या मनाची स्थिती त्याच परिस्थितीत अडकलेली असते.
सर्वजण असतात तेव्हा आपल्याला अति उत्साह आलेला असतो. त्यामुळे, आपण सर्व कामे उत्साहात करतो. पण जेव्हा घर रिकामं होतं तेव्हा मन एकटं पडतं. त्यामुळे आपण शांत असतो.
सण-समारंभात आपण शारीरिकदृष्ट्या थकलेलो असतो. अशातच घरातील पाहुणे निघून गेल्यानंतर आपल्या मनाला अस्वस्थ वाटू लागतं. घरातील पाहुण्यांचा वावर, त्यांच्याशी मारलेल्या गप्पा, खेळ हे सर्व आठवतं आणि आपलं मन एकटं पडतं.
तसेच, घरात पाहुणे आपल्या कामात मदत करतात. तर तुम्ही माहेरी गेल्यानंतर तिकडे काम करावं लागत नाही. पण जेव्हा सण संपतो तेव्हा आपलं रोजचं रूटीन बसायला लागतं. अशावेळी, कामाचा कंटाळा येतो.
हे समजून घेणे आवश्यक आहे की सणानंतर दुःखी होणे सामान्य आहे. बहुतेक लोकांसाठी, ही भावना एक नैसर्गिक बदल आहे. बदल चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी, नकारात्मक भावनांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी त्या दिवसात केलेल्या आठवणींचे कौतुक करण्यासाठी वेळ काढा.
चांगल्या वेळेवर चिंतन करा आणि पुन्हा-पुन्हा त्या गोष्टी आठवा. सणानंतरचे नैराश्य झटकून टाकण्यासाठी पुढे दिलेल्या गोष्टींचा नक्की विचार करा.
सोशल मीडियावरील इतर लोकांच्या अपडेट्सशी स्वतःची तुलना केल्याने अपुरेपणा आणि एकाकीपणाची भावना येऊ शकते. एखादा व्यक्ती परदेशात किंवा एखाद्या सुंदर ठिकाणी फिरायला गेला अन् त्यांनी त्यांची सुट्टी मस्त मजेत घालवली. तर तुम्हाला त्यांचा हेवा वाटू शकतो. ही एक भावना आहे जी इतरांची अन् तुमची तुलना केल्याने होऊ शकते.
म्हणूनच सर्वातआधी तुमचे सोशल मीडिया एक्सपोजर मर्यादित करा. आणि इतरांशी तुलना करणे टाळा. तुमच्या सुंदर अनुभवांवर आणि नात्यांवर लक्ष केंद्रित करा. तुमची दिवाळी किती खास होती याचा विचार करा; हे इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिक महत्त्वाचे आहे.
सुट्टी संपली की आपण लगेचच काम करण्यासाठी कंबर कसून तयार असतो. त्यामुळे, दीर्घ विश्रांतीनंतर दुसऱ्या दिवशी आपल्या दिनचर्येत परत येऊ नका. लहान गोष्टींचा समावेश करून सुरुवात करा ज्यामुळे तुम्हाला सामान्य स्थितीत येण्यास मदत होईल.
सर्व उत्सवांनंतर काही दिवसाची सुट्टी घ्या आणि दिवसात कामाचे नियोजन आणि विश्रांती किंवा दुसऱ्या दिवशी खर्च करण्यात घालवा.
तुमचे वेळापत्रक आणि समतोल जबाबदारीचे परीक्षण आणि पुनर्मूल्यांकन करण्यासाठी देखील ही चांगली वेळ आहे. जर तुम्हाला असे आढळले की तुम्ही खूप काम करत आहात, तर तुम्ही गोष्टी वेगळ्या पद्धतीने करणे निवडू शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.