Milk Face Wash : ग्लोईंग त्वचेसाठी केमिकलयुक्त फेसवॉश कशाला हवेत?दूधाचा बेस्ट फॉर्म्युला आहे की!

केवळ दूधच नाहीतर दुधाची साय देखील चेहऱ्याला लावण्याचे अनेक फायदे आहेत
Milk Face Wash
Milk Face Washesakal
Updated on

Milk Face Wash : तुम्हाला ग्लोईंग त्वचा हवी असेल तर तुमच्या स्किन केअर रूटिनमध्ये दूधाचा नक्कीच समावेश करा. दूध कॅल्शिअम आणि प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. कच्चे दूध किंवा ताक देखील तुमच्या त्वचेला खूप फायदेशीर ठरू शकते. दूध प्यायल्याने किंवा थेट त्वचेवर लावल्याने त्वचेचे पोषण होऊन ती मुलायम होते. 

दूध हा एक संपूर्ण आहार आहे जो केवळ आपल्या शरीरासाठीच नाही तर त्वचेसाठी देखील उत्तम आहे. अशातच आज आम्ही तुमच्यासाठी घरीच मिल्क फेस वॉश बनवण्याची पद्धत घेऊन आलो आहोत. दूध आपल्या त्वचेला खोलवर मॉइश्चरायझ ठेवते.

Milk Face Wash
Face Care : चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी घरीच तयार करा द्राक्षाचे हे ५ फेसपॅक

जर तुम्ही त्वचेच्या कोरडेपणामुळे त्रस्त असाल तर मिल्क फेस वॉश तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकते. यासोबतच यामुळे तुमची त्वचा मुलायम आणि चमकदार होते. मिल्क फेस वॉश देखील घरी बनविणे खूप सोपे आहे, तर चला जाणून घेऊया दूध फेस वॉश घरी कसे बनवायचे.

त्वचेसाठी उत्तम क्लिंजर 

जर तुम्ही ऑर्गेनिक, केमिकल फ्री आणि त्वचेसाठी सर्वोत्तम क्लिंजर शोधत असाल तर तुमच्यासाठी दूध हा एक चांगला पर्याय असू शकतो. फेस क्लिंजर म्हणून दूध वापरण्याचे अनेक फायदे आहेत. हे त्वचेच्या मृत पेशी सहजपणे काढून टाकण्यास मदत करते.

त्वचेला मॉईश्चराईज करते  

कच्चे दूध तुमच्या त्वचेसाठी उत्तम मॉईश्चरायझर म्हणून काम करते. कारण, लॅक्टिक अॅसिड हे एक पॉवरफूल ह्युमेक्टंट (humectant) आहे. थोडे थंड कच्चे दूध घ्या. त्यात कापसाचा गोळा बुडवून त्याच्या मदतीने चेहऱ्यावर दूध लावा. 10 मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर चेहरा धूवा. 

Milk Face Wash
Face Care Routine : फेशिअल का आणि कधी करावे? पहा काय सांगतात एक्सपर्ट्स!

एजिंग साईनला कमी करा 

जर तुमच्या चेहऱ्यावर वृद्धत्वाची (एजिंग साईन) चिन्हे दिसू लागली असतील तर दररोज कच्चे दूध त्वचेवर लावणे फायदेशीर ठरू शकते. दुधामध्ये लॅक्टिक ऍसिड असते, जे त्वचेचे आरोग्य सुधारते. हे कोलेजनचे उत्पादन वाढवते, ज्यामुळे त्वचा घट्ट होते आणि वृद्धत्वाची चिन्हे कमी होतात. त्याचे फायदे मिळवण्यासाठी फेस पॅकमध्ये कच्चे दूध वापरा. 

दूध फेस वॉश बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • १/२ कप दूध

  • चिमूटभर हळद

  • २ चमचे मध

दुधाचा फेस वॉश कसा बनवावा?

  1. प्रथम एक पॅन घ्या.

  2. नंतर त्यात दूध घालून थोडे घट्ट होईपर्यंत उकळावे.

  3. यानंतर तुम्ही ते थंड होण्यासाठी बाजूला ठेवा.

  4. मग त्यात मध आणि हळद घाला.

  5. यानंतर तुम्ही या सर्व गोष्टी व्यवस्थित मिसळता.

  6. आता तुमचा दुधाचा फेस वॉश तयार आहे. 

Milk Face Wash
Butter Milk Face Pack : चेहऱ्याला ताक लावून गोरं होता येतं; पहा ताकाचा आजवर कधीही न ऐकलेला फायदा!

दुधाचा फेस वॉश कसा वापरावा?

  • दुधाचा फेस वॉश वापरण्यापूर्वी चेहरा पाण्याने स्वच्छ करा.

  • त्यानंतर तयार केलेल्या फेसवॉशच्या मदतीने चेहरा स्वच्छ करा.

  • यासाठी आपल्या हातांनी रक्ताभिसरण गतीत चेहऱ्याला मसाज करा.

  • त्यानंतर नॉर्मल पाण्याने चेहरा धुवून घ्यावा.

  • यामुळे तुमची त्वचा मुलायम आणि चमकदार दिसेल.

केवळ दूधच नाहीतर दुधाची साय देखील चेहऱ्याला लावण्याचे अनेक फायदे आहेत. ती या पद्धतीने तुम्ही चेहऱ्याला लावली तर तुम्हाला अनेक फायदे होऊ शकतात.

लिंबू आणि मलई

त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी तुम्ही लिंबू आणि मलईचे मिश्रण चेहऱ्यावर लावू शकता. यासाठी १ चमचा दुधाची साय घ्या. त्यात थोडासा लिंबाचा रस मिसळा आणि चेहऱ्याला लावा. या मिश्रणाने सुमारे 15 मिनिटे चेहऱ्याला मसाज करा. त्यानंतर सामान्य पाण्याने चेहरा धुवा. यामुळे त्वचा चमकदार होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.