Home Remedies Piles: आजकालच्या धावपळीच्या जीवनात अयोग्य आहार आणि व्यायामाचा अभाव असल्याने पोटासंबंधित अनेक आजार निर्माण होतात. या समस्यांमध्ये मुळव्याधाचा देखील समावेश होतो.
मुळव्याधा ची समस्या असलेल्या लोकांना पोट स्वच्छ होण्यास त्रास होतो. यामुळे गुद्द्वारे दुखणे, सूज येणे, रक्त येणे यासारखा त्रास होतो. जर तुम्हालाही मूळव्याधाची समस्या असेल तर दूध आणि लिंबाचे मिश्रण तुमच्यासाठी उत्तम ठरू शकते.
दूध आणि लिंबाचा वापर करून पोट स्वच्छ होण्यास मदत मिळते. पण दूध आणि लिंबाचा वापर कसा करावा आणि मुळव्याधाची समस्या असल्यास दूधाचे सेवन करावे की नाही हे जाणून घेणे गरजेचे आहे.