Mobile Phone Use In Pregnancy : गर्भावस्थेत मोबाइल फोनचा वापर करणे सुरक्षित आहे का?

आता गर्भावस्थेत मोबाइलचा किती वापर करावा किंवा करावा की नाही याबाबत डॉक्टर काय सांगतात ते जाणून घेऊया.
Mobile Phone Use In Pregnancy
Mobile Phone Use In Pregnancy esakal
Updated on

Mobile Phone Use In Pregnancy : गर्भावस्थेत महिलांना बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागते. सुरुवातीच्या दिवसांपासूनच डाएट, लाइफस्टाइल आणि झोपेच्या वेळांमध्येसुद्धा या अवस्थेत बदल करावा लागतो. गर्भावस्थेत महिलांनी काय करावे काय करू नये याबाबत डॉक्टर सल्ले देतात. आता गर्भावस्थेत मोबाइलचा किती वापर करावा किंवा करावा की नाही याबाबत डॉक्टर काय सांगतात ते जाणून घेऊया.

एक्सपर्ट डॉक्टरांच्या मते, गर्भावस्थेच्या दिवसांत मोबाइल फोनचा वापर शक्यतो टाळला पाहिजे.

गर्भवती महिलांसाठी मोबाइल फोनचा वापर हानिकारक आहे का?

मोबाइलमधून इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स निघतात, जे आरोग्यासाठी चांगलं नसतं. प्रत्येक मोबाइलच्या मॅन्यूफॅक्चरिंगनुसार मोबाइलमधून निघणारे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन कमी जास्त होत असतात. मात्र महिलांनी गर्भावस्थेच्या या स्थितीत मोबाइलचा कमीत कमीच वापर करावा.

दीर्घकाळ मोबाइलच्या संपर्कात असल्याने महिलांच्या ब्रेन अॅक्टिव्हिटीवर त्याचा प्रभाव पडतो. शिवाय त्यांच्या आरोग्यावरही त्याचा गंभीर परिणाम होतो. त्यामुळे महिलांना झोपेचा त्रास, गरगरल्यासारखे वाटणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

Mobile Phone Use In Pregnancy
Mobile Phone Use In Pregnancy

गर्भावस्थेत मोबाइलचा वापर केल्यास होणाऱ्या बाळावर होतो असा परिणाम

गर्भवती महिलांनी दीर्घकाळ मोबाइलचा वापर केल्यास त्याचा परिणाम बाळाच्या सर्वांगिण विकासावर होतो. (Pregnancy)

तज्ज्ञांच्या मते, ज्या महिला गरोदरपणात फोनकडे जास्त लक्ष देतात त्यांची मुले लहानपणापासूनच खूप हायपअॅक्टिव असू शकतात आणि त्यांचे वर्तनही इतर मुलांपेक्षा जास्त चिडचिडे असण्याची शक्यता आहे.

Mobile Phone Use In Pregnancy
Mobile Phone Use : मित्रांनो तुम्हीही एवढ्या मिनिटांपेक्षा जास्त वेळ मोबाईल बघता? जडतील गंभीर आजार

गरोदरपणात महिला दीर्घकाळ रेडिएशनच्या संपर्कात आल्यास त्यांच्या मेंदूवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. यामुळे त्यांना थकवा, चिंता यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. एवढेच नाही तर रेडिएशनचा त्यांच्या स्मरणशक्तीवरही परिणाम होऊ शकतो.

Mobile Phone Use In Pregnancy
Pregnancy Diet : बाळाच्या आगमनाची चाहूल लागताच गर्भवती महिलांनी सुरू करावा हा फायबरयुक्त आहार

गरोदरपणात रेडिओ वेव्जच्या संपर्कात आल्याने मानवी शरीरातील सेल्युलर रिसेप्टर्सवरही परिणाम होतो. रिसेप्टर्सना मेंदूकडून सिग्नल मिळतात . जर या रिसेप्टर्सवर परिणाम होऊ लागला तर कर्करोगाचा धोका वाढू शकतो. मात्र यासंदर्भात पूर्णपणे संशोधन अजून झालेले नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()