शरीराच्या प्रत्येक भागावर मॉडेलने काढले टॅटू!

आजकाल टॅटू आणि पियर्सिंग करण्याची फॅशन वाढत आहे
Tattoo Model Amber Luke
Tattoo Model Amber Lukeesakal
Updated on
Summary

आजकाल टॅटू आणि पियर्सिंग करण्याची फॅशन वाढत आहे

आजकाल फॅशनचा (Fashion) बोलबाला सगळीकडे मोठ्या प्रमाणात सुरु आहे. जो तो फॅशन ट्रेंड्स (Fashion trends) फॉलो करतोय. आजकाल टॅटू (Tattoos) आणि पियर्सिंग (Piercing) करण्याची फॅशन वाढत आहे, तरुणांईंना त्यांच्या पसंतीच्या शरीराच्या भागावर टॅटू आणि पियर्सिंग करत आहेत. एका मॉडेलने तिचे फोटो ऑनलाइन विकून 1.5 कोटींहून अधिक कमावले आहेत. या मॉडेलचे नाव अंबर ल्यूक (Amber Luke) आहे. अंबर ल्यूकच्या संपूर्ण शरीरावर टॅटू आहेत. म्हणजेच तिने शरीराच्या 99 टक्के शरीरावर टॅटू बनवले आहेत.

डेली स्टारच्या वृत्तानुसार, 26 वर्षीय अंबर ल्यूकची (Amber Luke) ओळख टॅटू मॉडेल (Tattoo Model) म्हणून झाली आहे. ती मूळची क्वीन्सलँड, ऑस्ट्रेलियाची (Australia)आहे. मॉडेलने तिच्या शरीरात इतरही अनेक बदल केले आहेत. कानाचा खालचा भाग ताणून लांब केला आहे. त्याच वेळी, तिने तिच्या त्वचेत अनेक ठिकाणी पियर्सिंग (Piercing) केले आहे. एकूणच, या मॉडेलची 99 टक्के त्वचा टॅटू शाईने भरलेली आहे. हद्द अशी की, 'टॅटू लव्ह'मुळे ती काही काळ आंधळी झाली, जेव्हा तिचे डोळे निळे पडले.

एके ठिकाणी बोलताना ती म्हणाली, 'मी आज जी आहे त्याबद्दल मला कोणताही पश्चाताप नाही. आज मी ज्या प्रकारे दिसत आहे ते मला खरोखर आवडते. अंबर ल्यूकने सांगितले की, माझे हे सर्व बदल मला खूप आत्मविश्वास देतात.

अंबर ल्यूकने सांगितले की, सुरुवातीला शरीरावर इतके टॅटू असल्याने आपल्याला कधीच नोकरी मिळणार नाही अशी भीती वाटत होती, पण तसे झाले नाही. अंबर ल्यूकला सोशल मीडियावर अनेक ब्रँडसोबत काम करण्याची संधीही मिळते, तिला फोटोशूटच्या अनेक महागड्या ऑफर्सही मिळाल्या आहेत.

मॉडेलचा दावा आहे की तिचे फोटो ऑनलाइन विकून तिने सुमारे 1 कोटी 63 लाख रुपये कमावले आहेत. आता तिचे स्वप्न आहे की तो 2023 मध्ये स्वत:साठी घर खरेदी करू शकेल.

वयाच्या 14 व्या वर्षी पहिला टॅटू

अंबर ल्यूकने 14 वर्षांची असताना पहिला टॅटू बनवला होता. त्यानंतर ती डिप्रेशनशी झुंज देत होती. टॅटू बनवल्यानंतर तिला अधिक आत्मविश्वास वाटत असल्याचे ती म्हणते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()