Money Saving Tips : तूमच्या सवयीत बदल करा अन् हजारो रूपये वाचवा!

तूम्ही काही टिप्स वापरून महिन्याला हजारो रूपये वाचवू शकता.
Money Saving Tips
Money Saving Tipsesakal
Updated on

“Your salary has been credited to your account” हा मेसेज आला की प्रत्येक माणसाला एक वेगळेच समाधान मिळते. पण, काहींच्या चेहऱ्यावर हा आनंद फार काळ टिकत नाही. कारण, पैसै येण्याआधीच ते खर्च कुठे करायचे हे ठरलेले असते. त्यामूळे आलेला पगार खर्च होतो आणि पुन्हा पुढच्या महिन्यात तो मेसेज कधी येतो याची वाट पाहत बसायला लागते.

दर महिन्याला आपण ठरवतो की पुढच्या महिन्यापासून सगळे वायफळ खर्च बंद आणि बचत सुरु करू. पण ते काही जमत नाही. अशावेळी जर कुणी तूम्हाला सांगितले की तूम्ही काही टिप्स वापरून महिन्याला हजारो रूपये वाचवू शकता. होय. तूमच्या स्वभावातील सवयींमध्ये काही बदल करून तूम्ही पैशांची बचत करू शकता.

Money Saving Tips
दिवसभरात घडलेल्या महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर

गरजेच्या वस्तूंची यादी करा

पगार झाल्यानंतर दोन आठवड्यात लोक इतकी खरेदी करतात की महिन्याच्या शेवटी त्यांचे खाते रिकामे होऊ लागते. अशा परिस्थितीत, तुम्ही तुमची खरेदीची यादी तयार करणे आणि त्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे हे पाहणे महत्त्वाचे आहे. यानंतर तुमचे पैसे नको असलेल्या गोष्टीत खर्च होणार नाहीत हे पहा. त्यामूळे नक्कीच तूमची बचत होईल.

Money Saving Tips
Ajit Pawar : सरकारनं कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना जशास तसं उत्तर द्यायला हवं; सीमावादावरुन अजित पवार आक्रमक

मॉलमध्ये जाणे टाळा

जर तुम्हाला मॉलमध्ये जायला आवडत असेल तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही सर्व खरेदी मॉलमधूनच करायला हवी. तुमच्या आजूबाजूच्या, ओळखीच्या डिस्काऊंट देणाऱ्या दुकानातूनही खरेदी करू शकता. घरगुती वस्तू, किराणा सामान स्थानिक बाजारातूनच खरेदी केल्यात तर फायदा होतो. त्यामूळेही पैशांची बचत होते.

Money Saving Tips
IPL 2023: "केळ्याचं स्टॉल लावा नाही तर अंडे विका", कपिल देवनी आयपीएल प्लेयर्सची काढली पिसे

बाहेरचे खाणे टाळा

आळशीपणामुळे किंवा सवय लागल्याने अनेकदा घरी स्वयंपाक केला जात नाही. त्याऐवजी बाहेरून जेवण मागवतात. अनेकदा यामूळे महिन्याचे बजेट कोलमडते. त्यामूळे घरीच वेगवेगळ्या रेसिपी बनवून खाणे कधीही बचतीची सवय लावते. तूम्हाला हे पटत नसेल तर महिन्याला जेवणावर किती खर्च होतो याचा हिशोब करा. म्हणजे तूमच्या लक्षात येईल की किती वायफळ खर्च थांबवता येऊ शकतो.

विजेची उपकरणे वापरताना काळजी घ्या

काही विजेची उपकरणे बंद असताना सुद्धा जर चार्जरने विजेशी कनेक्टेड असतील तर त्याने तुमच्या बिलाची रक्कम वाढू शकते. तुमच्या दर महिन्याला वाढत्या विजेच्या बिलाचे हे ही एक कारण असू शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()