Monsoon Tourism: लोणावळा,खंडाळा, पाचगणी की कळसूबाई; पावसाळ्यात कुठं कुठं जायचं फिरायला?

पावसाळ्यात फिरण्याचा प्लॅन करत असाल तर महाराष्ट्रातील या ठिकाणांना जरुर भेट द्या.
Monsoon Tourism
Monsoon Tourism
Updated on

पाऊस सुरु झाला की चहाची तल्लफ लागते तशी अनेकांना फिरण्याचीदेखील तल्लफ लागते. निसर्गाच्या सानिध्यात मनसोक्तपणे पावसात भिजण्याचा आनंद हा प्रत्येकाला हवाहवासा वाटतो. मग सुरु होतात प्लॅन्स, मग ते घरच्यांचसोबत असो वा मित्रपरिवारासोबत.

फिरण्याचा प्लॅन करताना प्रत्येकाची गाडी येऊन थांबते ती म्हणजे कुठे जायचं ? या प्रश्नावर. ग्रुपमध्ये असो वा कुटुंबामध्ये एकमेकांना कुठे जायचं असा सवाल एकमेकांना उपस्थित केला जातो.

Monsoon Tourism
Monsoon Tourism : स्वर्गातील अद्भुत इंद्राचा दरबार अनुभवायचाय? मग, खेड-साताऱ्याला जोडणाऱ्या 'या' घाटाला जरुर भेट द्या

पण महाराष्ट्रात असे काही ठिकाणं आहेत, ज्यांना नैसर्गिक सौंदर्याचं वरदान लाभलं आहे. महाराष्ट्रात अनेक गड किल्ले, विस्तीर्ण झाडे, आणि अनोळखी हायकिंग ट्रॅक तसेच भरपूर हिल स्टेशन्स आणि धबधबे आहेत.तर जाणून घेऊयात महाराष्ट्रातील काही ठिकाणं...

लोणावळा

लोणावळा हे महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत रांगेत वसलेलं एक नयनरम्य हिल स्टेशन आहे. पावसाळ्यातील लोणावळा हे एखाद्या मंत्रमुग्ध करणाऱ्या वंडरलैंडपेक्षा कमी नाही.

लोणावळ्यात भुशी धरण, राजमाची पॉइंट, लॉयन्स पॉइंट, टायगर पॉइंट, टायगर लिप, इमॅजिका थीम पार्क अशी काही ठिकाणं आहेत. सह्याद्रीच्या कुशीत असलेले लोणावळा या ठिकाणी उंच झाडी, खोल दऱ्या, पावसाळ्यात उंच डोंगरांवरून कोसाळणारे धबधबे पर्यटकांना भुरळ घालतात.

Monsoon Tourism
Kashmir Tourism : काश्मीरमधील डल सरोवराची निर्मिती कशी झाली, सुंदर असूनही ‘डल’असं नाव का पडलं?

माळशेज

माळशेज हे हिल स्टेशन पुण्यापासून 128 किमी अंतरावर आहे. येथे अनेक तलाव, डोंगर, धबधबे, हिरवेगार वनस्पती आणि प्राणी यांच्यामुळे माळशेज घाटाचे सौंदर्य अजून खुलून येते. हिरव्यागार टेकड्या आणि आकर्षक गुलाबी फ्लेमिंगोसह पावसाळ्यात हे ठिकाण विशेषतः सुंदर असते. पावसाळ्यात येथे पर्यटकांची रिघ पाहायला मिळते.

महाबळेश्वर

महाराष्ट्राचे नंदनवन महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण आहे. महाबळेश्वर येथील हिरवा निसर्ग, सुंदर बगीचे, उद्याने श्वास रोखायला लावणारी दृश अशी सुंदर प्रेक्षणीय स्थळे पर्यंटंकांना आकर्षित करतात. हवामान जर स्वच्छ असेल तर या पॉईंटवरून रायगड किल्ला, तोरणा किल्ला स्पष्ट दिसतात. याच मार्गावर ‘टायगर स्प्रिंग’, ‘इको पॉईंट’, ‘एलफिस्टन पॉईंट’ आहेत.

Monsoon Tourism
पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! आंबोली घाटातला 'हा' मुख्य धबधबा झाला प्रवाहित; महाराष्ट्र, कर्नाटकसह गोव्यातील पर्यटक दाखल होणार

पाचगणी

पाचगणी हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पाच डोंगरांनी वेढलेले थंड हवेचे ठिकाण आहे. हायकिंग, ट्रेकिंग आणि पॅराग्लायडिंग करण्यासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे.

धोम धरण, लिंगमळा धबधबा, कास पठार, देवराई कला गाव, कमलगड किल्ला, राजपुरी लेणी, प्रताप गड किल्ला, सिडनी पॉईंट, पारसी पॉईंट असे अनेक ठिकाणं आहेत.

भातसा नदी खोरे

भातसा नदी खोरे हे महाराष्ट्रातील पावसाळ्यात भेट देण्याचे सर्वोत्तम ठिकाण आहे, हिरवेगार आणि खोऱ्यातून वाहणाऱ्या नदीचे अद्भुत दृश्य येथे पावसाळ्यात पाहायला मिळते.

इगतपुरीची भातसा नदी खोरे भातसा नदीच्या खोऱ्यात आणि थळ घाटाच्या शेवटी आहे. पावसाळ्यात इगतपुरीचे हे ठिकाण नयनरम्य दृश्य, वनस्पती आणि खडकाळ रचनांमुळे अधिक सुंदर दिसते.

Monsoon Tourism
Konkan Tourism : खोरनिनको धबधबा, मुचकुंद ऋषींच्या गुहेची पर्यटकांना भुरळ; एकखांबी, बल्लाळ गणेश पाहण्यासाठी गर्दी

माथेरान

पाचगणीनंतर, माथेरान हे महाराष्ट्रातील सर्वोत्तम पावसाळी ठिकाणांपैकी एक आहे; तुम्ही वीकेंडला जाण्याचा विचार करत असल्यास किंवा पावसाळ्यातील निर्मळ सौंदर्य अनुभवायचे असले, तरी माथेरान हे महाराष्ट्रातील पावसाळी ठिकाणांपैकी एक आहे.

कळसूबाई शिखर

1646 मीटर किंवा 5400 फूट उंचीचा कळसूबाई शिखर ट्रेक महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर म्हणून प्रसिद्ध आहे. कळसूबाई पर्वत हा कळसूबाई हरिश्चंद्रगड वन्यजीव अभयारण्याच्या अंतर्गत येणाऱ्या सह्याद्रीच्या पर्वत रांगेत आहे. कळसूबाईची उंची सर्वोच्च शिखर असल्याने तिथून तुम्हाला अगदी नयनरम्य आणि सुंदर दृश्य दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.