Monsoon Care : पावसाळ्यात मुलांची अशी घ्या काळजी; या गोष्टी लक्षात ठेवा पाऊस मुलांपासून दूर राहील

Kids Care In Monsoon : पाण्याने भरलेले डब्यात उगीच उड्या मारतात. त्यांचे हे बालपण त्यांना आपण जगू देतो.
Monsoon Care
Monsoon Care esakal
Updated on

Monsoon Care :

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच पावसाळा आवडतो. पावसाळ्यात धबधबे तलाव याकडे पर्यटकांची ओढ असते. त्यामुळे पावसाळ्यात वर्षा पर्यटनाचे नियोजन सतत होत असतं. पण कोणतीही पावसाळी ट्रिप करून आलं की आपण आजारी पडतोच.  

लहान मुलं सुद्धा शाळेत येत जातात शाळेत ग्राउंडवर खेळताना अनेक वेळा पावसात भिजतात. पाण्याने भरलेले डब्यात उगीच उड्या मारतात. त्यांचे हे बालपण त्यांना आपण जगू देतो. पण ते आजारी पडल्यानंतर त्यांना तितकाच त्रासही होतो. त्यामुळे पावसाळ्यात मुलांची कशी काळजी घ्यायची याबद्दल काही गोष्टी जाणून घेऊयात.

Monsoon Care
Monsoon Health Care : आला पावसाळा, तब्येतीला सांभाळा.! संसर्गाचा धोका टाळण्यासाठी अशी घ्या आरोग्याची काळजी

मुलं शाळेत जाताना ते भिजतात. प्रवासातही मुलं अनेकवेळा पाण्यात मुद्दाम भिजतात. तसेच शाळेत एखादा मुलगा आजारी असेल तर त्याच्यासोबत खेळल्याने व्हायरल इन्फेक्शन, सर्दी असे आजारी पसरतात. त्यामुळे मुलांचा पावसाळा अर्ध्याहून अधिक तर आजारपणातच जातो. त्यामुळे मुलांची कशी काळजी घ्यायची हे पाहुयात. (Monsoon Care)

Monsoon Care
Skincare : पावसाळा असो वा उन्हाळा,त्वचा दिसेल चमकदार! घरच्याघरी बनवा 'हे' स्पेशल ड्रिंक; सोपी पद्धत वाचा एका क्लिकवर

मुलांसोबत असताना छत्री वापरा

तुम्ही मुलांसोबत बाहेर जाताना किंवा मुलं खेळायला बाहेर जाताना त्यांच्यासोबत नेहमी एक छत्री द्या. मुलांच्या विविध छत्र्यांच्या अनेक व्हरायटी बाजारात उपलब्ध आहेत. त्यांना आवडणाऱ्या कार्टूनच्या छत्र्या आहेत त्या आवडीने सोबत घेऊन जातील.

मुलांना रेनकोट द्या

शाळेत मुलं बस ने किंवा रिक्षाने जात असली तरी देखील ते पावसात भिजू नयेत यासाठी तुम्ही मुलांना सोबत रेनकोट द्या. मुलांना रेनकोट दिल्याने ते पावसात भिजण्याचा आनंदही घेऊ शकतात.

Monsoon Care
Dhule Monsoon Update : लामकानीत 85 मिलिमीटर पाऊस! घरांची पडझड, शेतशिवाराचे नुकसान

वॉटरप्रूफ शूज आणि बॅग

लहान मुलांना वेगवेगळ्या आकाराचे शूज आणि स्कूल बॅग वापरायला आवडतात. अनेक वेळा शूज मध्ये पाणी गेल्याने ते ओले राहतात. मुलांचे पायही ओले राहतात. त्यामुळे मुलं आजारी पडतात. मुलांना वॉटरप्रूफ शूज आणि वॉटरप्रूफ बॅग ही बाजारात उपलब्ध आहेत. त्या वापरून तुम्ही मुलांना पावसात सुरक्षित ठेवू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.