Monsoon Disease : घरात पावसाचं पाणी शिरताच होऊ शकतात हे 11 आजार, हेल्दी राहाण्यासाठी या गोष्टी खा

तुमच्या घरात सतत ओलावा राहिल्यास तुम्हालाही संसर्ग होऊ शकतो तेव्हा या काही गोष्टींची विशेष काळजी घ्या
Monsoon Disease
Monsoon Diseaseesakal
Updated on

Monsoon Disease : पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. मात्र यासोबतच आता काही आजारांचा धोका वाढणार आहे. पावसाळ्यात हानिकारक जीवाणू, विषाणू, फंगस, डास इत्यादींची वाढ झपाट्याने होऊ लागते. तुमच्या घरात सतत ओलावा राहिल्यास तुम्हालाही संसर्ग होऊ शकतो तेव्हा या काही गोष्टींची विशेष काळजी घ्या.

पावसामुळे घरात ओलावा येतो. त्यामुळे सूक्ष्मजंतू शरीरात प्रवेश करतात आणि जळजळ होते, ज्यामुळे खोकला, ताप, सर्दी यासारख्या बहुतेक समस्या उद्भवतात. चला तर जाणून घेऊया पावसाळ्यात होणारे 11 धोकादायक आजार कोणते ते.

मान्सूनमध्ये होणारे आजार

  1. मलेरिया

  2. डेंगू

  3. चिकनगुनिया

  4. टाइफाइड

  5. कॉलरा

  6. लेप्टोस्पायरोसिस

  7. पीलिया

  8. पोटदुखी, डायरिया यांसारख्या पोटाच्या समस्या

  9. हॅपेटायटिस ए

  10. इंफ्लुएंजा

  11. खोकला-सर्दी

इम्युनिटी वाढवून आजारांपासून बचाव करा

एका संशोधनात (संदर्भ) स्पष्टपणे नमूद केले आहे की पावसाळ्यात शरीराची रोगांशी लढण्याची प्रतिकारशक्ती कमकुवत होते. यामुळे तुम्हाला कुठल्याही आजाराची सहज लागण होऊ शकते. पण हे आजार टाळणे अगदी सोपे आहे. त्यासाठी कोणते उपाय करायचे ते जाणून घ्या.

Monsoon Disease
health tips in rainy days : आला पावसाळा, तब्येती सांभाळा!

रोज लसणाच्या कळ्या खा

पावसाळ्यात होणारे संक्रमण आणि आजार लसूण खाल्ल्याने टाळता येतात. लसणाने रोग प्रतिकारशक्ती वाढते. तुम्ही लसणाच्या कच्च्या कळ्याही खाऊ शकता. किंवा रोजच्या खाण्याच्या पदार्थांतही घालून खाऊ शकता. (Monsoon)

Monsoon Disease
Monsoon Update : प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! परशुराम घाटातून प्रवास करताय? मग, ही बातमी आधी वाचा..

आयुर्वेदातही सांगितले आहे लसणाचे फायदे

आयुर्वेदात लसूण शरीरासाठी फायदेशीर मानले गेले आहे. लसून खाल्ल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होतो. त्यामुळे तुम्ही कोणत्याही काळजीशिवाय याचे सेवन करू शकता. (Health)

डिस्क्लेमर - वरील लेख सामान्य माहितीवर आधारित असून सकाळ समुह याची पुष्टी करत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.