Monsoon Facts : मुंबई पालिकेने जारी केला यलो अलर्ट; रेड,ऑरेंज,यलो अलर्ट कधी जारी केला जातो?

मुंबई आणि उपनगरात वाढलेल्या पावसामुळे मुंबई महापालिकेने मुंबई शहरात यलो अलर्ट जारी केला आहे.
Monsoon Facts
Monsoon Factsesakal
Updated on

Monsoon Facts :

मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे. मुंबई आणि उपनगरात वाढलेल्या पावसामुळे मुंबई महापालिकेने मुंबई शहरात यलो अलर्ट जारी केला आहे. जास्त पाऊस पडला तर येलो अन् वादळी पाऊस पडला तर रेड अलर्ट जारी करतात. हे नक्की काय आहे त्याबदद्ल जाणून घेऊयात.

हवामान खात्याकडून रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट, यलो अलर्ट आणि ग्रीन अलर्ट जारी केला जातो. चेतावणीसाठी रंग अनेक एजन्सींच्या सहकार्याने निवडले जातात. खराब हवामानाच्या तीव्रतेनुसार हे अलर्ट जारी केले जातात. म्हणजेच तीव्रतेने रंग बदलत राहतात. सर्वात तीव्र चक्रीवादळासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Monsoon Facts
पावसाळी गटारांची स्वच्छता ‘दिखाऊ’

रेड अलर्ट:

जेव्हा एखादे अधिक तीव्रतेचे चक्रीवादळ येत आणि या वादळासोबत पाऊस आणि हवेचा वेग 130 किलोमीटर प्रति तास असतो. तेव्हा हवामान विभागाकडून रेड अलर्ट जाहीर केला जातो. केवळ रेड अलर्ट नाही तर प्रशासनाला योग्य त्या उपाययोजना करण्याची आदेश दिले जातात. तसेच नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात येतो.

हवामान विभागाचे सांगतं की जेव्हा वातावरण बिघडलेलं असतं आणि काहीतरी मोठा धोका घडण्याची शक्यता असते तेव्हा रेड अलर्ट दिला जातो.

Monsoon Facts
जुनी सांगवी-बोपोडी पूल पावसाळ्यानंतरच सुरू होणार

ऑरेंज अलर्ट :

पाऊस अन् वादळांमुळे हवामान अधिकच बिघडले की, यलो अलर्ट ऑरेंज अलर्टमध्ये अपडेट केला जातो. जेव्हा चक्रीवादळामुळे अत्यंत गंभीर हवामान परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते.

ज्यामुळे रस्ते आणि हवाई वाहतुकीचे तसेच जीवित व मालमत्तेचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे लोकांना घरातच राहण्याचा सल्ला देण्यात येतो. वीजपुरवठा खंडित होणे, वाहतूक ठप्प होण्यासारखे प्रकार ऑरेंज अलर्टच्या काळात घडू शकतात.

गरज असेल तरच या काळात बाहेर पडायला हवे असे प्रशासनाकडून सांगण्यात येत असते किंवा ऑरेंज अलर्टचा तसा अर्थ असतो. ही एक प्रकारे पुढच्या संकटाची तयारी असते. ऑरेंज अलर्टच्या काळात परिस्थिती रेड अलर्टच्या तुलनेत कमी धोकादायक असते.

Monsoon Facts
खवणे-गाबितवाडीतील रस्त्यामुळे पावसाळ्यात घरांना धोका

यलो अलर्ट :

पुढील काही दिवसांमध्ये हवामानाच्या बदलामुळे नैसर्गिक संकट ओढावू शकते, अशी सुचना जारी करण्यासाठी प्रशासन यलो अलर्टचा आधार घेते. दैनंदिन कामे रखडू शकतात त्यामुळे सावधगिरी बाळगण्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात येतो. रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्टच्या तुलनेत यलो अलर्ट हा कमी धोकादायक मानला जातो.

Monsoon Facts
Monsoon Skin Care : पावसाळ्यात सनस्क्रीन लावताय? मग 'या' गोष्टी नक्की लक्षात ठेवा, कारण...

ग्रीन अलर्ट

नैसर्गिकदृष्ट्या कोणतेही संकट नाही, सर्व काही ठीक आहे हा सिग्नल लोकांना देण्यासाठी ग्रीन अलर्ट देण्यात येतो. नैसर्गिकदृष्ट्या या काळात कोणतेही संकट नसते. सर्वच अलर्टच्या तुलनेत ग्रीन अलर्टच्या काळात आपण सर्वाधिक सुरक्षित आहोत असे मानण्यात येते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.