Monsoon Gardening Tips: पावसाळ्यात घरच्या घरी लावा स्वयंपाकघरातील मसाल्यांची रोपे, रोज येतील कामी

Monsoon Gardening Tips: घरातील बगीच्यामध्ये काही मसाल्याचे रोप लावू शकता. ज्यांचा वापर रोपच्या पदार्थांमध्ये करता येतो.
Monsoon Gardening Tips:
Monsoon Gardening Tips:Sakal
Updated on

Monsoon Gardening Tips: अनेक लोकांना बागायती कामांची आवड असते. बागायची कामांसाठी पावसाळा हा उत्तम ऋतू आहे. या दिवसामध्ये झाडांना पुरेसे पाणी मिळते आणि रोपांची योग्य वाढ होते. तुम्हा पावसाळ्याच घरातील बगीच्यामध्ये काही मसाल्याचे रोप लावू शकता. ज्यांचा वापर रोजच्या पदार्थांमध्ये करता येतो. मसाल्याचे रोप लावणे आणि त्याची देखभाल करणे सोपे आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या मसाल्यांचे रोप घरी सहज वाढवू शकता.

जीरा

जिऱ्याचे रोप घरामध्ये सहज लावू शकता. कारण ते खुप मोठे नसते. एका कुंडीत लावता येते. जिऱ्याचे रोप लावण्यासाठी चांगल्या प्रतीचे बियाणे वापरावे. मातीत सेंद्रिय खत टाकावे. याचा वापर अनेक पदार्थांमध्ये केला जातो.

मिरची

घरी मिरचे रोप लावू शकता. एका कुंडीत कंपोस्ट, कोको पीट आणि माती मिक्स करा आणि त्यामध्ये मिरचीच्या बिया टाका. या बिया हलक्या मातीने झाकून ठेव्या. नंतर पाणी घाला. काही दिवसानंतर मिरचीचे रोप वाढेल आणि त्यात सुमारे दोन महिने मिरची वाढू शकते.तुम्ही ठेचा, पोहे यासारख्या पदार्थांमध्ये मिरची वापरू शकता.

Monsoon Gardening Tips:
Gardening Tips: पावसाळ्यात घरातील बगीचा राहील हिरवागार, फक्त फॉलो करा 'या' छोट्या टिप्स

हळद

कोणताही पदार्थ असो किंवा भाजी त्यात हळदीचा वापर केला जातो. प्रत्येक भारतीय स्वयंपाक घरात हळदीचा वापर केला जातो. एका कुंडींमध्ये कंद लावावे. त्याला पाणी घालावे आणि सुर्यप्रकाशात ठेवावे. काही दिवसानंतर हळदीचे रोप मोठे झाले की त्याचा वापर करू शकता. तसेच पावसाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हळदीचे दूध पिऊ शकता.

कोथिंबीर

एका कुंडीमध्ये कोथिंबीरच्या बीया लावू शकता. त्यात सेंद्रिय खत टाकावे. काही दिवसांनी कोथिंबीरचे रोप मोठे होईल. याचा वापर तुम्ही सर्व पदार्थ सजवण्यासाठी करू शकता.

बडीशेप

तुमच्या घरीतील बगीच्यामध्ये बडीशेप लावू शकता. यासाठी एका कुंडीमध्ये बडीशेप हाताने चोळून मातीत टाकावे. नंतर पाणी शिंपडा आणि चांगला सूर्यप्रकाशामध्ये ठेवा. बडीशेप जेवण झाल्यानंतर खाल्ल्यास पचनसंस्था सुरळित कार्य करते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.