Monsoon Hair Care : पावसाळ्यात पुरूषांच्याच केसांंची जास्त लागते वाट; अशी घ्या काळजी!

पावसाळ्यात केसांवर केमिकलचे प्रयोग करून ते अधिक Damage करू नका.
Monsoon Hair Care
Monsoon Hair Careesakal
Updated on

Monsoon Hair Care : पावसाळ्याच्या या हंगामात केसांची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. खरं सांगायचं तर, केस खराब होण्याचाही हा हंगाम आहे. केवळ आपली काळजी आणि सावधगिरीची पावले आपल्या केसांना निरोगी आयुष्य देऊ शकतात.

हवामानातील बदल म्हणजे वातावरणातील तापमान आणि आर्द्रता बदलणेही आहे. उष्णता आणि आर्द्रता यांचा मान्सून हंगामाशी जवळचा संबंध आहे. उबदार उष्णता टाळूचे पीएच संतुलन बिघडवते. यामुळे केस गळण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.

पावसाळ्यात विशेष करून पुरूषांच्या केसांचे अती नुकसान होते. कारण महिला जसे केसांची काळजी घेतात तसे पुरूषांना जमत नाही. केस पावसात भिजतात. ड्रायव्हिंग करताना केसांत धूळ जाते. त्यामुळे म्हणावे पुरूषांचे केस जास्त डॅमेज होतात. त्यामुळेच आज आपण पुरूषांनी त्यांच्या केसांची कशी काळजी घ्यावी, याबद्दल माहिती घेऊयात.

Monsoon Hair Care
Monsoon Hair Care Tips: माझे केस खूप गळतायत, पावसामुळे असावे का?

पावसाळ्यात केसांची अतिरिक्त काळजी घ्यावी लागते कारण या चिकट ऋतूत टाळू नेहमी ओलसर राहतो. त्यामुळे केस अधिक गळतात. त्यामुळे विशेषत: या मोसमात केस शक्य तितके कोरडे ठेवा आणि आठवड्यातून दोनदा केस धुणे टाळा.

जर तुमची केस जास्त तेलकट असेल तर तुमचे केस ड्राय शाम्पूने तयार करा. या शिवाय या ऋतूत केसांना लुक देण्यासाठी ड्राय शॅम्पू हा एक उत्तम उपाय आहे. पावसाळ्यात काळजी घेतली नाही तरी चालेल पण केसांवर केमिकलचे प्रयोग करून ते अधिक Damage करू नका.

पावसाळ्यात केस तुटण्याची समस्या सामान्य आहे. त्याचबरोबर ओले केस नीट वाळवले नाहीत तर टाळूमध्ये इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर पावसामुळे टाळूत कोरडेपणा येतो. ज्यामुळे कोंड्याची समस्या उद्भवू लागते. त्याचबरोबर पुरुषांनाही केसांच्या समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे पुरुषांनीही केसांची काळजी घ्यावी.

पावसाळ्यात पुरुषांनी या प्रकारे घ्यावी केसांची काळजी

केसांसाठी माइल्ड शॅम्पूचा वापर करा -

पावसाळ्यात पावसाव्यतिरिक्त वातावरणात बॅक्टेरिया असतात जे केसांच्या मुळांना नुकसान पोहोचवतात. अशावेळी केसांची मुळं स्वच्छ ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. पावसाळ्यात केस जास्त वेळ ओले राहिल्यास केस गळण्याची समस्या उद्भवते, त्यामुळे आठवड्यातून 3 वेळा माइल्ड शॅम्पूने केस धुवा.

Monsoon Hair Care
पावसाळ्यात पुरुषांनी ‘या’ प्रकारे घ्यावी केसांची काळजी! Hair Care

हेअर प्रॉडक्ट्स वापरू नका -

काही पुरुष या ऋतूत अनेक प्रकारचे हेअर प्रॉडक्ट्स वापरायला सुरुवात करतात. असे केल्याने तुमचे केस चिकट होऊ शकतात. त्यामुळे या प्रकारची समस्या टाळण्यासाठी केमिकलयुक्त हेअर केअर प्रॉडक्ट्स चा वापर टाळावा. अशावेळी लिंबाचा रस केसांना लावू शकता.

केसांना कंडीशन करा -

पावसाळ्यात केसांना रोज कंडीशन करा. कारण केसांच्या टाळूमध्ये ओलावा टिकवून ठेवण्याची समस्या टाळण्यासाठी कंडिशनिंग खूप महत्वाचे आहे. कारण केस कोरडे ठेवल्याने केस तुटतात.

केसांना उष्णतेपासून वाचवा -

पावसाळ्यात केसांवर हेअर ड्रायर किंवा ब्लो ड्रायर चा वापर करणे टाळा. कारण हीट स्टायलिंग टूल्स वापरल्याने तुमचे केस तुटू शकतात.

Monsoon Hair Care
Hair Care: केस खूप गळतात, हैराण आहात? रोज करा ही योगासनं, गळती थांबून केस होतील दाट

केसांची स्वच्छता करा -

पावसाळ्यात हवेत गारवा निर्माण झालेला असतो. यामुळे केस हे खूप ऑयली होतात. अशा वेली सल्फेट फ्री क्लीन्जरचा वापर करावा. शाम्पू करताना केसांना चांगले चोळून स्वच्छ करावे. कारण पावसाळ्यात केसांची स्वच्छता खूप गरजेची असते.


सीरम लावा -

कर्ली आणि वेवी केसांची काळजी घेणे पावसाळ्यात कठीण असते. असा वेळी पावसाळ्यात सीरम लावा. यामुळे केसांमध्ये गुंता होणार नाही आणि सहज मॅनेज करता येतील.


ओले केस बांधू नका -

पावसाळ्यात ओले केस वाळवणे खूप कठीण होते. अशा वेळी अनेक जण ओले केस तसेच बांधून घेतात. असे करणे घातक ठरते कारण यामुळे इन्फेक्शनचा धोका वाढतो. तसेच पावसात भिजल्यानंतर केस शाम्पूने अवश्य धुवावेत.

 

हेयर मास्क वापरा

पावसाळ्यात केस खूप डल आणि निर्जीव असल्यासारखे दिसतात. ज्या महिला केसांना कलर करतात त्यांचे केस पावसाळ्यात चमकत नाहीत. अशा वेळी केसांची काळजी घेण्यासाठी हेयर मास्क लावावा. केसांमध्ये दही आणि एवाकाडोचा हेयर मास्क तुम्ही लावू शकता.

Monsoon Hair Care
Hair Care: केस ड्राय झाले आहेत का?; 'या' 4 टिप्स करतील मदत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.