Monsoon Wall Care Tips: उन्हानं अंगाची लाहीलाही झाल्यानंतर पावसाच्या दमदार हजेरीमुळे सर्वांना दिलासा दिला आहे. पण पावसाळ्यात अनेक आरोग्यासह घराचीही काळजी घेणे गरजेचे असते. पावसाळ्यात अनेक लोकांच्या घरातील भिंतावर ओलावा येतो. पावसाचे पाणी घराच्या भिंतींमध्ये झिरपते आणि भिंतांना ओलावा येतो. यामुळे भिंत खराब दिसत नाही तर त्यात किड निर्माण झाली की आणखी समस्या वाढतात. जर तुमच्याही घरातील भिंतीवर पावसाळ्यात ओल येत असेल खास काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी पुढील सोप्या पद्धतींचा वापर करू शकता.
जर पावसाचे पाणी सारखे भिंतींवर पडत असेल किंवा छतावर पाणी साचत असेल तर भिंतींवर ओलावा येतो. यामुळे भिंती आणि दरवाजांनाही तडे जातात. तर कधीकधी घरातील ड्रेनेज पाईप ब्लॉकमुळेही भिंती ओल्या होतात आणि त्या खराब होऊ लागतात.
ज्या ठिकाणी पाणी साचून भिंती खराब होत असेल ती जागा स्वच्छ करून त्यावर नवे प्लास्टर लावावे. अनेक लोक भिंतींना बाहेरून लावलेला रंग वॉटर प्रुफ नसतात त्यामुळे पाणी पाणी भिंतीत शिरते. त्यावर प्लास्टर करणे आवश्यक आहे. तुम्ही घराच्या बाहेरील भिंतींवर वॉटरप्रुफ कोटिंग करून घेऊ शकता. ज्यामुळे पावसाळ्यात भिंतींचे रक्षण होईल.
जर घरातील प्लास्टर पाण्यामुळे फुगले असेल तर लगेच काढून टाका आणि नवे प्लास्टर लावा. आजकाल बाजारात सिमेंटमिश्रित वॉटर प्रोटेक्शन मिळते ज्यामुळे भिंतावर ओलावा येत नाही.
भिंतींवर भेगा असेल तर पावसाचे पाणी त्यात जाऊन ओलावा येतो. जर तुमच्या घरातील भिंतींवर भेगा असेल तर सिमेंटने भरून घ्यावे. यामुळे भिंतींत पाणी झिरपणार नाही.
छतावर पडणारे पावसाचे पाणी पाहून नेणारे पाईप गळत असेल तर दुरूस्त करू घ्यावे. यामुळे भिंतींवर ओलावा येणार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.