Monsoon in India: पहिल्या पावसात भिजण्यातून फक्त आनंदच नव्हे; त्रासही होतो, जाणून घ्या तोटे

पहिल्या पावसात भिजण्यासाठी आबालवृद्ध उत्सुक आहेत. पण तुम्हाला माहित आहे का पावसात भिजल्याचा तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो?
Monsoon In India
Monsoon In IndiaSakal
Updated on

भारतभर आता पावसाला सुरुवात झाली आहे. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसाच्या थंडाव्याने दिलासा मिळाला आहे. तसंच शेतकरीही पावसाच्या आगमनाने सुखावून गेले आहेत. पहिल्या पावसात भिजण्यासाठी आबालवृद्ध उत्सुक आहेत. पण तुम्हाला माहित आहे का पावसात भिजल्याचा तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो?

आरोग्य विषयक तज्ज्ञांचं म्हणणं आहे की जर तुम्ही पहिला पावसात भिजाल तर तुम्हाला सर्दी पडसं होऊ शकतं.तसंच तुमच्या केसांचंही नुकसान होऊ शकतं. पहिल्या पावसाच्या थेंबांसोबत वातावरणातली धूळ, मातीही डोक्यावर पडते. त्यामुळे केसात कचरा जमा होतो. डोक्यात खाज सुटते आणि इन्फेक्शनची शक्यता वाढते.

Monsoon In India
Monsoon In India : इथे घेता येईल मान्सूनचा दुप्पट आनंद , तेव्हा लगेच भेट द्या भारतातील या 6 ठिकाणांना

पहिल्या पावसामध्ये आम्लाचं प्रमाणही जास्त असतं. त्यामुळे त्वचेला धोका निर्माण होतो. पहिल्या पावसात भिजल्याने तुमच्या त्वचेवर रॅशेस येऊ शकतात. तसंच चेहऱ्यावर पिंपल्सही येतात. जास्त वेळापर्यंत पावसात भिजल्याने रोगप्रतिकारक शक्तीही कमी होते. उन्हाळ्यामध्ये बाहेरचं तापमान ४० अंशाच्या जवळपास असतं. आणि पावसात भिजल्याने शरीराचं तापमान अचानक कमी होतं. त्यामुळे शरीरावर वाईट परिणाम होतो आणि रोगप्रतिकारशक्ती कमी होते.

पावसाळ्यात मेकअप कसा टिकवायचा?

पावसाळा आता सुरू झाला आहे. अशा वेळी बाहेर जाताना पावसाच्या पाण्याने मेकअप खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाळ्यामध्ये मेकअपची विशेष काळजी घेण्याची गरज असते. पावसाळ्यामध्ये क्रीम बेस मेकअप प्रोडक्ट्स वापरायला हवेत. तसंच मेकअप जास्त वेळ टिकण्यासाठी सेटिंग पावडर वापरावी. मोठ्या ब्रशने ही पावडर लावावी.

Monsoon In India
Monsoon Makeup Tips : पावसाळ्यात मेकअप करायचं टेन्शन येतं? ट्राय करा या टिप्स

पावसाळ्यात हेवी मेकअप टाळायला हवा. तसंच त्वचेचीही काळजी घ्यावी. हात सतत धुवत राहावे. क्लिन्जरने चेहरा स्वच्छ करावा. आर्द्रतेमुळे जास्त घाम आल्याने त्वचेचा संसर्गही होऊ शकतो. त्यामुळे जास्त फाऊंडेशन वापरु नये. तसंच वॉटरप्रूफ लिपस्टिक वापरावी. शिवाय डार्क शेड्सच्या लिपस्टीक वापराव्यात.

Monsoon In India
Monsoon Tips: पावसाळ्यात चुकूनही खाऊ नका हे पदार्थ, जाणून घ्या

पावसाळ्यात काय खाऊ नये?

पावसाळ्यामध्ये पचनाच्या समस्या तसंच फूड इन्फेक्शन होण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे पावसाळ्यामध्ये स्ट्रीट फूड खाणे टाळावे. चाट, भजी, समोसे असे तळलेले आणि उघड्यावर ठेवलेले पदार्थ खाऊ नये. पावसाळ्यामध्ये मासे लवकर प्रदूषित होतात. त्यामुळे मासे खाणे टाळावेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.