Monsoon Pet Care : पावसाळ्यात पाळीव प्राण्यांची अशी घ्या काळजी, जाणून घ्या 'या' सोप्या टिप्स

Monsoon Pet Care : पावसाळ्यात पाळीव प्राण्यांची खास काळजी घेणे, गरजेचे आहे.
Monsoon Pet Care
Monsoon Pet Careesakal
Updated on

Monsoon Pet Care : देशातील काही भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे, तर काही भागांमध्ये अद्याप ही उन्हाचा तडाखा जाणवतोय. वातावरणातील उष्णतेचा तडाखा पावसामुळे काहीसा कमी होतो आणि वातावरणात गारवा निर्माण होतो. हे आल्हाददायक वातावरण जितके आपल्याला हवेहवेसे वाटते, तितकेच ते आरोग्यासाठी काही प्रमाणात घातक देखील असते.

या दिवसांमध्ये हवेतील वातावरण दमट असते. या बदलत्या वातावरणामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे, या दिवसांमध्ये आपल्या आरोग्यासोबतच पाळीव प्राण्यांची देखील खास काळजी घेणे गरजेचे आहे. पावसाळ्यात पाळीव प्राण्यांची कशी काळजी घ्यायची? चला तर मग जाणून घेऊयात.

Monsoon Pet Care
Monsoon Health Care : आला पावसाळा, तब्येतीला सांभाळा.! संसर्गाचा धोका टाळण्यासाठी अशी घ्या आरोग्याची काळजी

राहण्याची योग्य व्यवस्था

पावसाळ्यात तुमचे पाळीव प्राणी ज्या ठिकाणी राहतात. त्याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. पावसाच्या पाण्यापासून प्राण्यांचा बचाव करण्यासाठी त्यांचे शेड किंवा घर हे जलरोधक, चांगले आणि इन्सुलेटेड असावे. शक्यतो जमिनीच्या पातळीपासून थोडे वर असायला हवे. तुमच्या पाळीव प्राण्यांना त्यांच्या शेडमध्ये किंवा घरामध्ये आरामात राहता येईल, अशी व्यवस्था करावी.

प्राण्यांचे पंजे आणि केसांची स्वच्छता

सततच्या पावसाचा परिणाम हा तुमच्या पाळीव प्राण्यांच्या पंजांवर आणि केसांवर होण्याची शक्यता असते. आर्द्रतेमुळे पंज्यांवर संसर्ग, संक्रमण होऊ शकते. त्यामुळे, त्यांच्या पायांची नखे नियमितपणे स्वच्छ करा. तसेच, बुरशीजन्य संसर्ग टाळण्यासाठी त्यांच्या शरीराचा प्रत्येक भाग कोरडा करा. नियमितपणे तुमच्या पाळीव प्राण्यांना अंघोळ घाला, जेणेकरून त्यांना कोणताही संसर्ग उद्भवणार नाही.

प्राण्यांचा आहार

पावसाळ्यात पाळीव प्राणी फारसे सक्रिय नसतात. त्यांना बाहेर पडून अधिक हालचाल ही करता येत नाही. त्यामुळे, त्यांचे वजन वाढू शकते. हा लठ्ठपणा टाळण्यासाठी पावसाळ्यात प्राण्यांच्या आहारात बदल करा. ते पाणी किती प्रमाणात पित आहेत? यावर ही लक्ष ठेवा.

कारण, अनेकदा ते तहान लागल्यावर ठिकठिकाणी साचलेले पाणी पितात. त्यामुळे, शरीरात बॅक्टेरिआ पसरण्याची दाट शक्यता असते. या सर्व गोष्टी टाळण्यासाठी त्यांना शुद्ध पाणी आणि संतुलित आहार द्यावा.

पशुवैद्यकीय तपासणी अवश्य करा

खरं तर ऋतु कोणताही असो, तुम्ही तुमच्या पाळीव प्राण्यांची पशुवैद्यकाकडून नियमितपणे तपासणी करणे, गरजेचे आहे. पाळीव प्राण्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी नियमित त्यांची तपासणी करा. प्राण्यांचे लसीकरण करा आणि पावसाळ्यात त्यांची काळजी कशी घ्यावी? याबदद्ल पशुवैद्यकांचा सल्ला अवश्य घ्या.

Monsoon Pet Care
Monsoon Makeup Tips : पावसाळ्यात मेकअप करताना काय काळजी घ्यायची? जाणून घ्या ‘या’ सोप्या टिप्स

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.