Masala Corn Recipe: मान्सून स्पेशल! चहासोबत बनवा क्रिस्पी मसाला कॉर्न, जाणून घ्या रेसिपी

या डीशला कॉर्न चाट किंवा स्वीट कॉर्न चाट म्हणूनही ओळखले जाते.
masala corn
masala cornsakal
Updated on

पावसाळ्यात चहा आणि पकोड्यांचे कॉम्बिनेशन खूप आवडते. या ऋतूत लोक पकोड्यांच्या अनेक प्रकारांचा आस्वाद घेतात. त्यात बटाटा, कांद्यापासून मिरचीपर्यंत विविध प्रकारच्या पकोड्यांचा समावेश आहे. पकोडे अगदी सहज घरी तयार होतात. या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही हेल्दी खायचे असेल तर तुम्ही कॉर्न रेसिपी देखील ट्राय करू शकता. कॉर्न मसाला स्नॅक तुम्ही घरी बनवू शकता.

अलीकडेच प्रसिद्ध शेफ कुणाल कपूरने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर कॉर्न मसाल्याची रेसिपी शेअर केली आहे. लहान मुलांनाही कॉर्नपासून बनवलेला हा नाश्ता आवडेल. हेल्दी असण्यासोबतच ते खूप चविष्ट देखील आहे. चला जाणून घेऊया घरच्या घरी कॉर्न मसाला कसा बनवायचा.

masala corn
Right Time To Eat: चुकीच्या वेळी खाल्ल्याने वाढते वजन, जाणून घ्या लंच आणि डिनरची योग्य वेळ?

मसाला कॉर्न साहित्य

  • कॉर्न - १

  • पाणी - 3 कप

  • दूध - अर्धा कप

  • मीठ - अर्धा टीस्पून

  • चिली फ्लेक्स - 1 टीस्पून

  • ओरेगॅनो - 1 टीस्पून

  • लोणी - 1 टीस्पून

  • लिंबू - अर्धा

  • चाट मसाला - १ टीस्पून

  • चिरलेली ताजी कोथिंबीर

मसाला कॉर्न रेसिपी

1 ली स्टेप

सर्व प्रथम एक कणीस घ्या. कणीसाचे 3 तुकडे करा.

स्टेप - 2

यानंतर गॅसवर तवा ठेवा. पॅनमध्ये 3 कप पाणी घाला आणि कॉर्नचे तुकडे टाका

स्टेप - 3

त्यात अर्धा कप दूध घाला. अर्धा टीस्पून मीठ घाला. एक चमचा चिली फ्लेक्स किंवा कुट्टी मिर्च घाला.

masala corn
Weight Loss: वजन कमी करण्यासाठी तुम्हीही लिंबू आणि गरम पाणी पित असाल तर थांबा... जाणून घ्या आधी हे सत्य!

स्टेप - 4

एक चमचा ओरेगॅनो घाला आणि 1 टीस्पून बटर घाला. आता ते शिजेपर्यंत थोडा वेळ उकळवा.

स्टेप - 5

आता पॅनमधून कॉर्नचे तुकडे काढून थंड होऊ द्या. त्यावर चमचाभर चाट मसाला घाला.

स्टेप - 6

त्यावर अर्ध्या लिंबाचा रस लावा. त्यावर ताजी चिरलेली कोथिंबीर टाका.

स्टेप - 7

यानंतर, प्लेटमध्ये ठेवून सर्व्ह करा. पावसाळ्यात हा फराळ खायला खूप मजा येईल.

कणीस खाण्याचे फायदे

कणीस खाल्ल्याने दात मजबूत होतात. मक्यामध्ये व्हिटॅमिन ए असते. यामुळे त्वचा निरोगी राहते. यामध्ये मॅग्नेशियम आणि लोहासारखे पोषक घटक असतात. ते हाडे मजबूत करतात. हे खाल्ल्याने डोळ्यांची दृष्टी वाढते. कणीस खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहण्यास मदत होते. मसाला कॉर्न खाल्ल्याने तुम्ही दिवसभर एनर्जेटिक राहता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.