Smell in Car: पावसाळ्यामध्ये कारमधील दुर्गंधी दूर करण्यासाठी हे उपाय करून पहा, खर्च न करता जाईल दुर्गंधी

how to remove smell from car: पावसाळ्यातील एक मोठी समस्या म्हणजे कारमध्ये येणारी दुर्गंधी. कारमधील हा वास अनेकदा सहज दूर होत नाही किंवा हा वास कसा दूर करावा असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यासाठीच्या या टीप्स
how to remove smell from car during monsoon
how to remove smell from car during monsoon Esakal
Updated on

Monsoon Car Tips : पावसाळ्यातील एक मोठी समस्या म्हणजे कारमध्ये येणारी दुर्गंधी. पावसाळ्यात Monsoon विविध कारणांमुळे कारमधून दुर्गंधी येत असते. काही वेळेस हा घाण वास इतका जास्त असतो की गाडीत Car बसणं देखील अशक्य होतं. Monsoon Tips Marathi How To take care of your car from bad odor

पावसाळ्यात अनेकदा आपण गाडीमध्ये ओले बूट घेऊन बसतो. यामुळे बुटातील Shoes घाण पाणी मॅटवर निथळतं आणि ते कारमधील Car Care कारपेटपर्यंत पोहतचं. यामुळे कारच्या केबिनमध्ये दुर्गंधी पसरते.

how to remove smell from car during monsoon
Car Loan फेडण्याची चिंता करण्याएवजी हा फॉर्मुला वापरा, असे संपतील EMI

तसंच अनेकदा आपण ओली छत्री मॅटवर ठेवतो. ओल्या छत्रीच्या पाण्याने कारपेट ओलं होतं आणि त्यामुळे कुबट वास येऊ लागतो. तसचं ओली बॅग, इतर ओल्या वस्तू किंवा काही वेळास आपणी भिजलेल्या कपड्यांमध्ये कारमध्ये बसतो.

या सगळ्या कारणांमुळे कारमध्ये ओलावा निर्माण होतो. त्यानंतर कार काही तास बंद राहिल्यास कारमध्ये कुबट किंवा काही वेळच कुजलेला वास येऊ लागतो.

कारमधील हा वास अनेकदा सहज दूर होत नाही किंवा हा वास कसा दूर करावा असा प्रश्न अनेकांना पडतो.

कार फ्लोअर मॅटची नियमित स्वच्छता

नियमितपणे कारच्या फ्लोअर मॅटची स्वच्छता न केल्यासही कारमधून दुर्गंधी येऊ लागते. खास करून पावसाळ्याच्या दिवसांमध्ये फ्लोअर मॅट नियमित स्वच्छ करणं गरजेचं आहे. तुम्ही बेकिंग सोडा किंवा विनेगरच्या मदतीने हे मॅट स्वच्छ करू शकता. यामुळे मॅटमुळे दुर्गंधी पसरणार नाही.

याशिवाय फ्लोअर मॅट कोरडी ठेवण्याचा प्रयत्न करा. भिजलेली कार फ्लोर मॅट वेळ मिळतार कारमधून काढून स्वच्छ धुवा आणि पूर्ण कोरडी करून मगच पुन्हा टाका. यामुळे कारमध्ये कुबट वास येणार नाही.

इसेन्स ऑइल्सचा वापर

कारमधील दुर्गंधी दूर करण्यासाठी तुम्ही इसेन्स ऑइल म्हणजेच काही सुगंधीत तेलांचा वापर करू शकता. यामुळे कारमधील दुर्गंधी दूर होईलच शिवाय कारमध्ये सुगंध दरवळू लागेल.

यासाठी तुम्ही एक लिटर पाण्यात १ चमचा सुंगधीत तेल Perfumed Oil टाकून स्प्रे बॉटलच्या मदतीने कारमध्ये स्प्रे करू शकता. तसंच कापसाचे बोळे इसेंशियल ऑइलमध्ये भिजवून हे बोळे एखाद्या झाकण नसलेल्या डब्यात ठेवून हा डबा गाडीत ठेवा. यामुळे देखील कारमध्ये सुगंध दरवळू लागेल.

how to remove smell from car during monsoon
Car Maintenance Tips : पावसाचं पाणी कारमध्ये शिरलंय? मनस्ताप टाळायचा असेल तर फॉलो करा या टिप्स

कारच्या काचा ठेवा उघड्या

जर तुम्ही कारचा वापर सलग न करता ३-४ दिवसातून एकदा करत असाल तर कारच्या काचा किंचित उघड्या ठेवा. यामुळे कारमध्ये मोकळी हवा फिरण्यास मदत होईल आणि कारमधून वास येणार नाही.

अनेकदा ग्लास क्लिनरच्या मदतीने काचा स्वच्छ केल्यानंतर त्या लगेचच बंद केल्यासही गाडीमध्ये उग्र वास येऊ लागतो. यासाठी काचा स्वच्छ केल्यानंतर त्या कोरड्या कराव्या. त्यानंतर काही वेळ काचा उघड्या ठेवा आणि त्यानंतर बंद करा.

त्याशिवाय बाजारामध्ये उपलब्ध असलेले कार परफ्यूम देखील तुम्ही वापरू शकता. तसंच कारमध्ये खाण्या-पिण्याच्या वस्तू किंवा डबे ठेवणं टाळा. या काही गोष्टींची काळजी घेतल्यास कारमधील दुर्गंधी दूर होण्यास मदत होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.