Monsoon Tips : या पावसाळ्यात तुमचा स्मार्टफोन ठेवा वॉटरप्रूफ, ट्राय करा या टिप्स

पावसात फोन भिजल्याने खराब होणे ही आता अगदी सामान्य समस्या झाली आहे.
Monsoon Tips
Monsoon Tipsesakal
Updated on

How To Keep Smartphone Waterproof In Rainy Season : पावसात फोन भिजल्याने खराब होणे ही आता अगदी सामान्य समस्या झाली आहे. त्यामुळे जर तुम्हालाही आपला फोन सुरक्षित कसा ठेवायचा याची काळजी लागली असेल तर फार टेन्शन घेऊ नका. कारण आज आम्ही अशाच काही टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहोत ज्या तुम्हाला फोन जपण्यासाठी सहज शक्य होतील.

उन्हाळ्याची नको नको करणारी गर्मी पावसाच्या सरींमुळे दूर होते खरी, पण त्याबरोबर इतर प्रश्न समोर उभे राहतात. त्यात दुचाकीवरून प्रवास करणाऱ्यांसाठी किंवा अगदी पायी चालणाऱ्यांसाठीही पावसाळ्यात आपल्या फोनला भिजण्यापासून कसे जपावे ही एक वेगळीच डोकेदुखी असते.

फोन वॉटरप्रूफ ठेवण्याचे उपाय

  • ज्यांना पावसाळ्यात बाहेर फिरावे लागते त्यांच्यासाठी वॉटरप्रूफ पाऊच वापरणे हा फारच सोयीस्कर उपाय आहे. असे पाऊच ऑनलाइनपण सहज उपलब्ध असतात.

  • सिलिका जेल पॅकेटसह झिपलॉक पाउच हा आणखी एक चांगला पर्याय आहे. झिपलॉक पाउच आणि सिलिका जेल पॅकेट सुपरमार्केटमध्ये सहज उपलब्ध आहेत आणि ऑनलाइन देखील ऑर्डर केले जाऊ शकतात.

  • जे लोक वॉटरप्रूफ केस किंवा झिपलॉक पाउच ठेवण्यास विसरतात, त्यांनी फोन खिशात किंवा पिशवीत ठेवावा. फोन न काढता पटकन कॉल घेण्यासाठी ब्लूटूथ हेडफोन हा एक चांगला पर्याय आहे. बहुतेक हेडफोन लवकर खराब होत नाहीत.

Monsoon Tips
Driving Tips For Monsoon : या गोष्टी लक्षात ठेऊनच पावसाळ्यात ड्रायव्हिंगसाठी बाहेर पडा, नाहीतर...

फोन भिजल्यावर काय करावे?

  • तुमचा फोन ओला झाल्यास, बॅटरी काढा (काढता येण्याजोग्या बॅटरी फोनच्या बाबतीत),

  • चार्जरमध्ये प्लग करू नका.

  • फोन सुकविण्यासाठी हेअर ड्रायर वापरू नका.

  • फोन रात्रभर कोरड्या तांदूळ भरलेल्या डब्यात ठेवा किंवा सिलिका जेलच्या पॅकेटसह झिपलॉक पाऊचमध्ये तो व्यवस्थित कोरडा होईपर्यंत ठेवा.

  • तरीही सुरू होत नसेल तर, सर्व्हीस सेंटरला दाखवणे योग्य ठरते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.