Long Weekend Trips : पावसाळ्यात लॉन्ग विकेंड प्लॅन करताय? आधी यां 8 महत्त्वाच्या टिप्स लक्षात ठेवा

Long Weekend Trips : १५ ते १९ ऑगस्ट अशा ५ दिवसांची सुट्टी घेऊन आलेला हा लाँग विकेंड तुम्हाला सुखद अनुभव देईल.
Long Weekend Trips
Long Weekend Trips esakal
Updated on

Monsoon Tour Plan Tips :

पावसाळ्याला सुरूवात झाली की आधी खिडकीतून पाऊस पाहत लोक चहा अन् कांदाभजीचा अस्वाद घेतात. त्यानंतर जेव्हा पाऊस थोडा कमी होतो तेव्हा ते फिरायला जाण्याचा प्लॅ करतात. जर तुम्हीही यंदाच्या पावसाळ्यात फिरायला बाहेर पडला नसाल. तर, तुम्हाला याहून बेस्ट पर्याय मिळणार नाही.

कारण या महिन्यात आलेला लाँग विकेंड तुमच्यासाठी पर्वणीच आहे. १५ ते १९ ऑगस्ट अशा ५ दिवसांची सुट्टी घेऊन आलेला हा लाँग विकेंड तुम्हाला सुखद अनुभव देईल. त्यामुळे या दिवसात अनेक लोक सुट्टीचे प्लॅन करत आहेत. तुम्हीही पावसाळ्याचा आनंद लुटायला बाहेर पडणार असाल तर काय काळजी ध्यावी याच्या काही टिप्स तुम्हाला सांगणार आहोत. (Long Weekend)

Long Weekend Trips
Monsoon Tourism: लोणावळा,खंडाळा, पाचगणी की कळसूबाई; पावसाळ्यात कुठं कुठं जायचं फिरायला?

या टिप्समुळे तुम्ही सुट्टीही अनुभवू शकाल आणि योग्य ती काळजीही घेता येईल.

कपड्याची योग्य निवड करा

पावसाळ्यात घरी असतानाही कपडे वाळण्याचा त्रास आपल्याला सहन करावा लागतो. पावसाळ्यात ओलाव्यामुळे कपडे सुकली तरी त्यातून कुबट वास येतो. अशावेळी मशिन ड्राय करूनही कपडे सुकत नाहीत. त्यामुळे, बाहेर फिरायला जाण्यासाठी लगेच सुकतील असे कपडे निवडा. काही फॅब्रिक असे असतात ज्यात पाणी राहत नाही. त्यामुळे बाहेर फिरण्यासाठी जाताना तुम्ही हलक्या कपड्यांची निवड करा.

वॉटरप्रूफ शूज

पावसाळ्यात आपले शूज सतत भिजतात त्यामुळे त्यांचा वास येतो. त्यामुळे शूज सुकवणे महत्त्वाचे असते. तसेच ओले शूज घालून बाहेर पडू नका. कारण, गाडीत बसल्यानंतर भिजलेल्या शूजचा जास्त वास येतो. त्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे, प्रवासात वॉटरप्रूफ शूजची निवड करा.

वॉटरप्रूफ कव्हर

तुम्ही फोटोग्राफर असाल किंवा तुमच्याकडे महागडा फोन असेल तर तुम्ही वॉटरप्रूफ कव्हर घातल्याशिवाय बाहेर पडण्याचा विचारही करू नका. कारण, पावसात धबधब्यांना मोठी पसंती असते. आणि लोक पावसातही भिजतात. त्यामुळे असे वॉटरप्रूफ कव्हर नक्की वापरा.

Long Weekend Trips
Nanded Tourism : नांदेडमध्येही आहेत धोकादायक स्पॉट, निर्सगप्रेमींकडून काळजी घेण्याचे आवाहन

सोबत घ्या पाणी

पावसाळ्यात सर्वाधिक आजार हे दूषित पाण्यामुळे पसरतात. त्यामुळे, तुम्ही जिथे जाल तिथे सोबत स्वच्छ पाणी घेऊन जा. पाणी घेऊन जाणं शक्य नसेल तर जेवायला,नाश्त्याला थांबाल तिथे विकतचे स्वच्छ पाणी घ्या. आणि प्रसिद्ध लेबल दिसतं म्हणजे ते पाणी स्वच्छ असतं असं नाही, त्यावरील लेबल नीट वाचून घ्या.

Long Weekend Trips
Nashik Igatpuri Tourism: पर्यटनाला खुणावतोय इगतपुरी तालुका! सगळीकडे हिरवा शालू पांघरल्याचे चित्र, धबधब्यातून वाहतेय नितळ पाणी

गरम जेवण खा

प्रवासात शक्यतो आपण हॉटेलचे खाणे खातो. पण काहीवेळा गर्दी असते त्यामुळे गरम पदार्थांसाठी वाट न पाहता आपण थंड जेवतो. किंवा काहीवेळा पार्सल घेऊन ते खातो. असं नका करू, हे तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. तुम्हाला हेल्दी रहायचं असेल तर हेल्दी खाण्यासोबतच तो पदार्थ गरम असेल हे पहा.

छत्री,रेनकोट सोबत ठेवा

प्रवासात असताना पावसापासून बचाव करणारी छत्री, रेनकोट सोबत घ्या. तुम्हाला पावसात भिजायला आवडत असले. तरी, काहीवेळा प्रवासात असे प्रसंग ओढावतात जेव्हा मनात नसताना पावसात जावं लागतं. अशावेळी, रेनकोट,छत्री असेल तर भिजावं लागणार नाही.

हेअर ड्रायर

पावसात भिजल्यावर आपण आजारी यामुळे अधिक पडतो की आपले केस सुकत नाहीत. ते अधिक काळ ओले राहील्याने आपल्याला सर्दी होऊ शकते. त्यामुळे हेअर ड्रायर सोबत ठेवा. जे तुम्हाला केस आणि कपडे वाळवण्यासही मदत करू शकते.

Long Weekend Trips
मनसोक्त करा पर्यटन सफर

औषधे सोबत ठेवा

तुम्ही लहान बाळासोबत असाल तर अधिक काळजी घ्यावी लागते. बाळाची औषधे सोबत ठेवा. तसेच, काही सर्दीची, पेनकिलर, उलटी यांवरची औषधेही सोबत ठेवा. कारण, प्रवासात अचानक काहीही होऊ शकते. आणि प्रवासात कुठेही थांबावे लागू शकते. त्यामुळे ऐनवेळी औषधे सोबत असतील तर गैरसोय होणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.