तुम्हालाही पगार पुरत नाही? मग 'या' टीप्स वापरुन वाचवू शकता पैसे

महिन्याला होणारा पगार पुरत नसल्याच्या तक्रारी आपण अनेकदा ऐकल्या असतील.
Salary
SalarySakal
Updated on

महिन्याला होणारा पगार पुरत नसल्याच्या तक्रारी आपण अनेकदा ऐकल्या असतील. कुणालाही पैशांबद्दल विचारलं तर प्रत्येकजण आपापलं गऱ्हाण सांगताना आपल्याला दिसतो. सातआठ हजारापासून साठ - सत्तर हजार पगार असला तरी पुरत नसल्याचं आपल्याला ऐकायला मिळतं. पगार कितीही असला तरी तो पहिल्याच आठवड्यात संपतो असं अनेकांच्या बाबतीत घडतं. आपल्याला असणाऱ्या पागारातून पैसे वाचवायचे असतील तर काही टीप्स आम्ही तुम्हाला देणार आहोत. या टीप्स वापरुन तुम्ही आपल्या पगारातून पैसै वाचवू शकता.

खालील काही टीप्स वापरून तुम्ही पगाराचं व्यवस्थापन केलं तर नक्कीच तुम्ही पगारातून बचत करु शकता.

Salary
१२२ वर्ष जगणाऱ्या महिलेचं राज काय? खायची 'हे' तीन पदार्थ

१) बजेट प्लॅन बनवा

प्रत्येक पगाराच्या आधी आपल्या महिन्याभराच्या खर्चाचा बजेट प्लॅन बनवला पाहिजे. त्यामध्ये महिन्याचं भाडं, किराणा सामान आणि महत्त्वाच्या वस्तूंवरील खर्च याचा सामावेश असला पाहिजे आणि त्यानुसार महिनाभर खर्च करायला पाहिजे.

२) खर्च कुठे होतो हे शोधा

आपला महिन्याभराचा खर्च कुठे होतो आणि कसा होतो या गोष्टी आपण शोधल्या पाहिजेत. त्यावरुन आपला अनपेक्षित खर्च आपल्याला कळेल आणि त्यानुसार आपल्याला खर्चाची काळजी घेता येईल.

Salary
चेन्नईमधील IT कंपनीकडून १०० कर्मचाऱ्यांना Maruti Suzuki कार भेट

३) पैसे बॅंकेत जमा करत चला

आपल्या खिशात जर पैसे असतील तर आपण ते लगेच बॅंकेत टाकायला पाहिजेत. कारण खिशात पैसे असले की काही लोकांना त्यांच्या खर्चावर नियंत्रण राहत नाही त्यामुळे खिशातील असलेले पैसे आपला खिसा मोकळा करु शकतात. म्हणून ज्यांना खर्चावर नियंत्रण नसते त्यांनी पैसै बॅंकेत जमा करायला पाहिजेत.

४) बचत खात्यात पैसे जमा करा

आपण जर नोकरी करत असाल तर सॅलरी अकाउंटसोबतच आपण बचत खातं उघडलं पाहिजे आणि प्रत्येक महिन्याला आपण ठराविक रक्कम त्यामध्ये टाकली पाहिजे. त्यामुळे आपली महिन्याची ठराविक रक्कम बचतीसाठी जमा होत राहील.

५) ऑनलाईन खरेदीवर नियंत्रण ठेवा

काही लोकांना ऑनलाईन खरेदीवर नियंत्रण राहत नसल्याने आपल्या बजेटपेक्षा जास्त खरेदी कधीकधी करताना दिसतात. ही शॉपिंग सोपी झाल्याने त्यावर नियंत्रण ठेवणं महत्त्वाचं आहे.

या टीप्स तुम्हाला तुमच्या पगारातील पैसे वाचवण्यासाठी महत्त्वाच्या ठरतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.