Mood Swings : हिवाळ्यातच जास्त मूड स्विंग्स का होतात?

महिलांमध्ये हा आजार होण्याचे प्रमाण जास्त
Mood Swings
Mood Swingsesakal
Updated on

Mood Swings :

हिवाळा अनेकांना आवडतो. अंगाला बोचणाऱ्या थंडीत धुक्याला छेदत केलेली बाईक स्वारी, किंवा धुक्यात केलेला मॉर्निंग वॉक संस्मरणीय असतो. थंडीच्या दिवसात वॉकला जाणाऱ्यांची संख्या अफाट आहे. हा ऋतू साधारणपणे खूप आनंददायी आणि आरामदायी असतो.

पण हिवाळ्यातच अनेकदा मूड बिघडतो. प्रत्येक गोष्टीचा राग येतो. आजूबाजूचे सर्व काही वाईट वाटते. कधी कधी फक्त झोपून रहावे, शांत बसावे असे वाटते. पण असं का होतं. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, हिवाळ्यात मुड स्विग्सचा सर्वात जास्त सामना करावा लागतो. याबद्दलच आपण डॉ. कमल किशोर वर्मा मानसोपचारतज्ज्ञ याच्याकडून अधिक माहिती घेऊयात. (Mental Health

Mood Swings
Mood Swings : या लहरी स्वभावाचं करायचं तरी काय ? असा ठीक करा मूड

सीझनल इफेक्टिव्ह डिसऑर्डर (एसएडी) म्हणजे काय?

ऋतूमानानुसार बदलणारे भावनिक विकाराचे लक्षण आहे. याला आपण हिवाळ्यातील उदासीनता म्हणू शकतो. म्हणजेच हिवाळा येताच लोकांचा मूड बदलू लागतो. हे सर्वांसोबत घडेलच असे नाही.

पण काही लोकांना मात्र नेहमीच, आळशीपणा, दुःख, एनर्जी कमी असणे, निराशा,तणाव अशा समस्या सतत येत राहतात. तर, असे लोक सामाजिक समारंभात किंवा कार्यालयीन मेळाव्यात सहभागी होत नाहीत.

धक्कादायक बाब म्हणजे, मूड बदलण्याच्या या आजाराचे प्रमाण महिलांमध्ये जास्त आहे. महिलांना चेष्टेने म्हटलं जातं की, काय गं तुम्ही क्षणात चिडता अन् क्षणात नॉर्मल होता, हा या आजाराचाच भाग असू शकतो.  

Mood Swings
Menopause Mood : रजोनिवृत्तीमुळे येणारा चिडचिडेपणा कसा दूर कराल ?

हिवाळ्यातील मूड स्विंग्स का होतात?

हिवाळ्यात सूर्यप्रकाशाची कमतरता असते. तर सूर्यप्रकाश अनेकदा मूड सुधारण्याचे काम करतो. त्यामुळे थकवा कमी होतो आणि नकारात्मक विचार येत नाहीत. जेव्हा आपण सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येत नाही तेव्हा आपल्या मनःस्थितीवर नकारात्मक परिणाम होतो.

सूर्यप्रकाशाअभावी शरीराच्या अंतर्गत घड्याळावर वाईट परिणाम होतो. पुरेशा सूर्यप्रकाशाशिवाय, तुमची सेरोटोनिनची पातळी कमी होऊ शकते. जेव्हा सेरोटोनिन कमी होते तेव्हा नैराश्य आणि निराशा उद्भवते.

Mood Swings
Bad Mood In Morning: झोपेतून उठल्यावर तुमचाही मूड खराब असतो का? ‘या’ टिप्स वापरून पहा

संरक्षण कसे करावे

  1. झोपेचे योग्य नियोजन करा

  2. उन्हात बसा

  3. व्यायाम करा

  4. तुमच्या नित्यक्रमात ध्यानाचा समावेश करा.

  5. अंधारात, थंडी असलेल्या ठिकाणी जाणं टाळा

  6. मित्र आणि कुटुंबियांसोबत वेळ घालवा

  7. तुम्हाला पाहिजे ते करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.