रात्रीची चांगली झोप खूप महत्वाची आहे. झोप आपल्या शरीराला तंदुरूस्त करण्यासाठी फायद्याची आहे. तसेच तुमचे मानसिक आणि शारिरिक आरोग्यही चांगले राखते. झोप ही हृदयरोग आणि मधुमेहासह - अनेक आरोग्याच्या बाबींमध्ये झोप महत्वाची ठरली आहे. पुरेशी झोप न मिळाल्यास अल्झायमर सारख्या आजाराशी सामना करावा लागू शकतो. आतापर्यंत नियमित झोप का महत्वाची हेच जास्त एेकयला मिळत होते. पण अलिकडे झालेल्या एका अभ्यासानुसार साडेसहा तासांपेक्षा जास्त झोपल्यामुळे किंवा त्यापेक्षा कमी झोपल्यामुळे तुमच्या आकलन शक्तीवर परिणाम होऊ शकतो.
वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या संशोधकांनी एक शोधनिबंध प्रकाशित केला आहे. त्यात ही बाब सूचित करण्यात आली आहे. संशोधकांना अती झोपेमुळे आकलनशक्तीला काही बिघाड होतो का, त्याचा काही संबंध आहे का ते पाहायचे होते. यासाठी त्यांनी 100 वयस्कर व्यक्तींचा त्यांच्या मध्य ते 70 च्या दशकाच्या आसपास आणि चार ते पाच वर्षांच्या दरम्यान मागोवा घेतला. 100 पेैकी 88 लोकांमध्ये स्मृतिभ्रंशाची कोणतीही चिन्हे दिसून आली नाहीत.तर 12 जणांनी सौम्य स्मृतीभंश किंवा आकलन शक्तीवर परिणाम झाल्याचे सांगितले. 11 जणांना हा त्रास जास्त होता( प्री-डिमेंशिया स्टेज).
असा केला अभ्यास
संपूर्ण अभ्यासादरम्यान, सहभागींना आकलनशक्ती किंवा स्मृतिभ्रंशाची चिन्हे शोधण्यासाठी सामान्य संज्ञानात्मक आणि न्यूरोसायकोलॉजिकल चाचण्या पूर्ण करण्यास सांगितले गेले. या चाचण्यांमधील त्यांचे स्कोअर एकत्र केले गेले, ज्याला प्रीक्लिनिकल अल्झायमर कॉग्निटिव्ह कंपोझिट (PACC) स्कोअर म्हणतात. स्कोअर जितका जास्त तितकी त्यांची आकलनशक्ती चांगली होती.
यासाठी single-electrode encephalography (EEG) यंत्र वापरून झोप मोजली गेली. हे यंत्र चार ते सहा रात्री यात सहभागी झालेल्या लोकांवर झोपताना कपाळावर लावले, हे कार्य लोकांनी त्यांच्या वार्षिक संज्ञानात्मक चाचण्या पूर्ण केल्यानंतर तीन वर्षांनी केले गेले. संशोधकांना या ईईजीने मेंदूच्या क्रियेचे अचूक मोजमाप करण्याची परवानगी दिली, ज्यामुळे त्यांना कोणी झोपले आहे की नाही (आणि किती वेळ) आणि झोप किती शांत होती हे त्यांना कळले.
केवळ अभ्यासासाठी विशिष्ट कालावधीत हे मोजमाप केले गेले असले तरीही संशोधकांना यात सहभागी झालेल्या लोकांच्या झोपेच्या सामान्य सवयींचे चांगले पर्याय मिळाले. मेंदूच्या क्रियाकलाप मोजण्यासाठी ईईजी वापरताना पहिल्या रात्री झोपण्यासाठी काही प्रमाणात अडचणी येत होत्या. पुढे त्या उपकरणाची लोकांना सवय झाल्याने त्यांना सामान्य झोप मिळाली. त्यानंतर या झोपेचा मागोवा घेतला गेला.
एकंदरीत, संशोधकांना असे आढळून आले की रात्री 4.5 तासांपेक्षा कमी आणि 6.5 तासांपेक्षा जास्त झोपल्याने कालांतराने व्यक्तीच्या आकलनशक्तीवर दाट परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, आकलन शक्तीच्या कार्यावर झोपेच्या कालावधीचा प्रभाव वयाच्या प्रभावासारखाच होता. जो सर्वात मोठा धोका आहे.
असा आहे निष्कर्ष
या अभ्यासाच्या निष्कर्षांबद्दल आश्चर्यकारक गोष्ट अशी आहे की झोपेचा कालावधी हा आधीच्या अभ्यासांनी सुचविलेल्या समस्यांपेक्षा खूपच कमी असतो. अभ्यासात असे दिसून आले आहे की 6.5 तासांपेक्षा जास्त वेळ झोपल्याने आकलन शक्तीवर परिणाम होतो,. पण यात वृद्ध अपवाद असावेत. कारण त्यांना दररोज रात्री सात ते आठ तास झोपण्याची शिफारस केली जाते.
आपल्या झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम करणारे अनेक घटक आहे. पण अभ्यासानुसार असे दिसून येते की रोज रात्री साडेचार ते साडेसहा तास झोपल्यामुळे तुमच्या मेंदूला नुकसान होण्याची शक्यता नसते.परंतु दीर्घ झोपेचा संबंध आकलनशक्तीशी आहे का ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. मागील अभ्यासांमध्ये अति-झोप आणि आकलनशक्तीवर परिणाम यांच्यातील दुवा आढळला आहे, याचा अर्थ मेंदू क्रियाकलाप मोजण्यासाठी ईईजी वापरण्यापेक्षा डेटा कमी अचूक आहे. त्यामुळे हा नवीन अभ्यास अशा निष्कर्षांना महत्त्व देतो.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.