Apple And Makhana Smoothie: सकाळी हेल्दी नाश्ता करणे गरजेचे आहे. कारण यामुळे दिवसभर थकवा राहत नाही. तुम्हाला सकाळी नाश्त्यात हेल्दी पदार्थ खायचा आणि प्यायचा असेल तर अॅपल-मखाणा स्मुदी तयार करू शकता. सफरचंद आणि मखाणामध्ये अनेक पोषक घटक असतात जे शरीरासाठी खुप फायदेशीर असतात. ही स्मुदी बनवणे सोपे असून चवदार आहे. चला तर मग जाणून घेऊया अॅपल स्मुदी कशी बनवतात.