How To Be Positive In Negative Environment : सतत उतार चढाव्याने भरलेल्या या जीवनात सतत सकारात्मक राहणं तसं कठीणच असतं. पण सकारात्मक उर्जा स्वीकारणे हेपण पूर्णपणे तुमच्या इच्छेवर अवलंबून असतं. वाढत्या नकारात्मकतेमध्ये सकारात्मकता स्वतःहून तुमच्याकडे येणार नाही. त्यासाठी तुम्हाला स्वतःहून सकारात्मकतेला निवडावं लागेल.
जर तुम्हाला शारीरिक आणि मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी नकारात्मकतेपासून दूर राहणं फार आवश्यक असतं. म्हणूनच सकारात्मक एनर्जी वाढवणे आवश्यक असते.
सकारात्मक ऊर्जेला आकर्षित करण्यासाठी
सकारात्मक शब्दांचा वापर करा - यासाठी मी आभारी आहे, हे करण्यासाठी मी तयार आहे, मला हे शिकायला आवडेल असे सकारात्मक शब्दच तुमची प्रगती घडवून आणतील. आपल्या बोलण्याची पद्धत सकारात्मक आणि नकारात्मक दोन्हीही उर्जा आकर्षित करतात. आता हे तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही कोणत्या प्रकारचे शब्द निवडतात आणि लोकांसमोर आपलं म्हणणं कशा पद्धीने मांडतात.
प्रेम, समाधान, आनंदी, सुरक्षित अशा शब्दांच्या वापराने एक चांगला सकारात्मक दृष्टीकोन तयार होतो. ज्यामुळे फक्त प्रसन्न मनच तयार होत नाही तर माणसाची प्रशंसाही होते.
नकारात्मक बातम्या वाचू नये - बरेच लोक सकाळी उठून पेपरमध्ये नकारात्मक बातम्या वाचायला सुरूवात करतात. त्यात दिवसातला बराचवेळ घालवतात. त्यामुळे तुमच्या मनात नकारात्मक विचार घोळू लागतात. संपूर्ण दिवस तेच नकारात्मक विचार डोक्या फिरत असतात. त्यामुळे आजूबाजूच्या सकारात्मकतेकडेही तुमचं दुर्लक्ष होतं.
त्यामुळे दिवसाची सुरुवात नेहमी सकारात्मक बातमी, लेखाने करा. माहितीपर बातम्या वाचा याशिवाय विनोद वाचावे. नकारात्मक बातम्या सगळ्यात शेवटी वर वर वाचा. त्यात फार वेळ घालवू नये.
संगीत ऐका - योग्य संगीत तुमच्या बॉडी व्हायब्रेशनला लगेच वाढवतं. त्या गाण्यांची प्ले लिस्ट बनवा ज्यांनी तुमचं मन शांत होतं आणि तुम्ही ते फार एन्जॉय करतात. जेव्हाही तुम्हाला सकारात्मक उर्जेची गरज असेल तेव्हा ते ऐका. फक्त एवढी खात्री करा की, जी गाणी तुम्ही ऐकत आहात त्यात नकारात्मक शब्द नसावे.
ही वेळपण निघून जाईल - हे समजून घ्या की, जी वेळ आज आली आहे तीदेखील निघून जाईल. सोपं उदाहरण म्हणजे रात्रीनंतर दिवस आणि दिवसानंतर रात्र येतेच. सगळ्या गोष्टी बदलत राहतात, तसंच जर आज तुम्ही दुःखात असला तर ही वेळ पण निघून जाईल. एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी, या जगात कोणतीच गोष्ट पर्मनंट नाही. सगळ्या गोष्टी बदलत राहतात.
तुमचा अॅटीट्यूडच तुमच्या वर्तमान काळावर लक्ष केंद्रीत करण्यात मदत करतो. हेच तुम्हाला नकारात्मकता सोडून सकारात्मक गोष्टींनी पुढे सरकायला मदत करतं.
स्वतःवरच्या प्रेमावर आणि स्वतःवर विश्वास कायम ठेवा - सकारात्मक उर्जेला आकर्षित करण्यासाठी स्वतःवर प्रेम करणं आणि स्वतःवर विश्वास ठेवणं फार आवश्यक असतं. जेव्हा कोणी तुमच्याकडे बोट दाखवतं तेव्हा तुम्ही स्वतःवर संशय घेतात. हे अजिबात चांगले नाही. जर तुमच्या मनात भीती बसत असेल तर तुम्ही जास्त भीतीला स्वतःकडे आकर्षित करतात. तेच जर तुम्ही सकारात्मक असाल तर तुम्ही अधिक सकारात्मकतेला स्वतःकडे आकर्षित करतात.
ज्याविषयी तुम्ही विचार करतात त्याच विचारांना तुम्ही स्वतःकडे आकर्षित करतात. म्हणून स्वतःवर प्रेम करायला हवं. स्वतःवर विश्वास ठेवायला हवा. असं केल्याने तुम्हाला सकारात्मक जीवन जगण्याला मदत मिळते. जेव्हा तुम्ही सकारात्मक गोष्टींवर मन केंद्रीत करतात तेव्हा काही न करताच तुम्ही आतून सकारात्मकतेने भरून जातात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.