Morning Skin Care: वयाच्या ४० व्या वर्षीही दिसाल तरूण 'या' गोष्टींनी करा चेहऱ्याचा मसाज

Morning Face Massage Tips For Glowing Skin: तुम्ही नियमितपणे काही घरगुती पदार्थांचा वापर करून सकाळी चेहऱ्यावर मसाज केल्यास त्वचा चमदार होईल.
Skin Care Tips
Skin Care TipsSakal
Updated on

Morning Face Massage Tips For Glowing Skin: वयानुसार चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात. यामुळे अनेक महिला स्किन केअर प्रोडक्टचा वापर करतात. यामध्ये केमिकल असतात. काही दिवस त्वचा उजळ दिसते पण नंतर निर्जीव होते. हे टाळण्यासाठी तुम्ही घरगुती पदार्थांचा वापर करून चेहऱ्यावर मसाज केल्यास वयाच्या चाळीशीमध्ये देखील त्वचा चमकदार दिसेल. सकाळी फक्त पाच ते दहा मिनिटे पुढील पदार्थांनी चेहऱ्यावर मसाज करावी.

दूध आणि बेसण

सकाळी आंघोळीच्या आधी चेहऱ्यावर दूध आणि बेसणाने मसाज करावी. असे नियमितपणे केल्यास चेहरा उजळ दिसेल. यासाठी दोन चमचे दूध घ्यावे त्यात एक चमचा बेसण मिक्स करावे आणि चेहऱ्यावर लावावे. थोड्यावेळाने स्वच्छ पाण्याने चेहरा धुवावा.

पपई

पपई खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. यामध्ये व्हिटॅमिन सी, ए यासारखे पोषक घटक असतात. तसेच त्वचेसाठी देखील उत्तम आहे. यासाठी पपईचा गर काढून त्यात थोडे दूध मिक्स करावे. हे चेहऱ्यावर लावून मसाज करावे. यामुळे त्वचेच्या मृत पेशी निघून जातात.

तीळाचे तेल

तीळाचे तेल त्वचेसाठी खुप फायदेशीर असते. यामध्ये व्हिटॅमिन ई, अँटिऑक्सिडंट यासारखे अनेक गुणधर्म असतात. नियमितपणे सकाळी मसाज केल्याने चेहऱ्यावरचे डाग कमी होतात.

Skin Care Tips
Monsoon Yoga Tips: पावसाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी या आसनांचा करा सराव

खोबरेल तेल

जर तुमची त्वचा कोरडी असेल तर सकाळी नियमितपणे खोबरेल तेलाने मसाज करावी. यामुळे त्वचा चमकदार दिसेल आणि सुरकुत्या कमी होईल. तेल लावल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवावा.

दूध,मध आणि हळद

तुम्हाला चाळीशीमध्ये देखील तरूण दिसायचे असेल तर दूध,मध आमि हळद मिक्स करून लावू शकता. सकाळी नियमितपणे या पॅकने मसाज करावी. यामुळे त्वचा उजळ दिसते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.