Morning Routine: दिवसभर स्ट्रेस फ्री राहण्यासाठी सकाळी उठल्याबरोबर करा 'या' गोष्टी, दिवसभर राहाल उत्साही

Morning Health Tips: सकाळी सुर्यप्रकाश, योग्य आहार, आवश्यक पोषक घटकांचा तुमच्यावर सकारात्मक परिणाम होतो आणि तणाव कमी होतो.
Morning Health Tips:
Morning Health Tips: Sakal
Updated on

Morning Routine: दिवसभर उत्साही आणि तणावमुक्त राहण्यासाठी मन निरोगी राहणे गरजेचे असते. मानसिक आरोग्यावर काम करण्यासाठी सकाळची वेळ उत्तम असते. तुम्ही तुमचा दिवस कसा सुरू कराल ते तुमची मानसिकता तयार करण्यात मदत करू शकते. तुम्ही अनावश्यक गोष्टींचा ताण घेत असाल तर यामुळे केवळ फक्त वेळ वाया जातो आणि तुमचा दृष्टीकोन नकारात्मक बनतो. सकाळी सुर्यप्रकाश, योग्य आहार, आवश्यक पोषक घटकांचा तुमच्यावर सकारात्मक परिणाम होतो आणि तणाव कमी होतो. दिवसभर तणावमुक्त आणि सकारात्मक राहण्यासाठी सकाळी उठल्यानंतर पुढील गोष्टी केल्या पाहिजेत.

योगा

सकाळी उठल्यानंतर व्यायाम करावा. ज्यामुळे तणाव कमी होतो. कारण ते एन्डॉर्फिन नावाच्या मुड सुधारणाऱ्या रसायनांता स्त्राव करण्यास मदत करते. व्यायामुळे नकारात्मक विचार दूर ठेवता येतात.

चालायला जावे

सकाळी उठल्यावर बेडवर झोपून मोबाईल पाहत बसल्यापेक्षा चालायला जावे. यामुळे तुम्हाला उत्साही वाटेल. तसेच यामुळे तुमच्या दिवसाची सुरूवात चांगली होते. जर तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर तुम्ही घराभोवती चालायला जाऊ शकता.

ध्यान

सकाळी शांत वातावरणात ध्यान केल्याने तणाव दूर होण्यास खूप मदत होते. यामुळे तुम्हाला खुप कामाचा तण येत असेल तर ध्यान करावे. यामुळे दिवसभर तुम्ही फ्रेश राहाल.

Morning Health Tips:
Navratri Fast Recipe: उपवासाला नाश्त्यात बनवा स्वादिष्ट अन् आरोग्यदायी रताळे चाट, लिहून घ्या रेसिपी

पौष्टिक नाश्ता

सकाळी नाश्ता केल्याने दिवसभर शरीरात ऊर्जा राहते. तसेच काम करण्यात देखील मन राहते. यामुळे सकाळी नाश्ता करूनच बाहरे पडावे. तुम्ही सकाळी नाश्त्यात चिला, अंडी, फ्रुट सॅलड, यासारख्या पदार्थांचा सेवन करू शकता. तुम्ही नाश्त्यात सुकामेवा आणि बीन्सचा समावेश करू शकता. कारण त्यात व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात असते. संशोधनानुसार, व्हिटॅमिन ईच्या कमतरतेमुळे मेंदूशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

कामाचे नियोजन

कोणतेही काम नियोजनाने केले की वेळेवर गोंधळ होणार नाही. त्यामुळे तुम्ही सकाळी उठून दिवसभराच्या कामाचे नियोजन करू शकता. तुम्ही त्याची नोंद करू शकता. यामुळे तुमचे काम सोपे होईल आणि डोकेदुखी वाढणार नाही.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

Related Stories

No stories found.