Stay Safe From Mosquito
Stay Safe From Mosquitoesakal

Mosquito: घरगुती वस्तूंनी बनवलेलं हे लोशन म्हणजे डासांचे शत्रूच...

उन्हाळ्यात डासांचा खूप धोका असतो, त्यामुळे अनेक प्राणघातक आजार होतात
Published on

Stay Safe From Mosquito: बारा महीने चोवीस तास सगळ्यात जास्त त्रास देणारा कोणता प्राणी असेल तर तो म्हणजे डास. संध्याकाळ झाली की डासांची भूणभूण सुरु होते. घरात, घराबाहेर डास फारच त्रास देतात. शिवाय, डासांमुळे मलेरिया, डेंग्युसारखे अनेक गंभीर आजारही होतात. त्यामुळे डासांपासून स्वत:ला सुरक्षित ठेवणं फार आवश्यक असतं. शिवाय, डासांना मारण्यासाठी किंवा पळवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थांपासून आपल्याला काही त्रास व्हायला नको. (how to make mosquito proof lotion at home)

उन्हाळ्यात डासांचा खूप धोका असतो, त्यामुळे अनेक प्राणघातक आजार होतात. डास चावण्यापूर्वी खबरदारी घेतल्यास आपण या आजारांपासून दूर राहू शकतो. यासाठी बाजारात अनेक प्रकारचे मॉस्किटो रिपेलेंट (Mosquito Repellent) उपलब्ध आहेत. 

पण या बाजारातल्या वेगवेगळ्या क्रिम मुळे अनेक लोकांना खूप त्रास होतो. शिवाय हे आपल्या मुलांसाठी घातक ठरु शकते. अशा परिस्थितीत जर तुमच्या घरात खूप जास्त डास असतील तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही कारण डासांना दूर करण्यासाठी कोणती क्रीम लावावी हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

या Mosquito Repellent तुम्ही डासांना पळवू किंवा मारु शकता आणि त्याचा कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट तुमच्यावर होणार नाही. या वस्तू अगदी लहान मुलांसाठीही सुरक्षित आहेत.

Stay Safe From Mosquito
Health Care : गर्भधारणा टाळण्यासाठी Emergency Pills घेणे सुरक्षित आहे का? डॉक्टर सांगतात...

मॉस्किटो रिपेलेंट लोशन कसे बनवायचे? (how to make Mosquito Repellent lotion at home)

डास चावण्यापासून वाचण्यासाठी अनेक क्रीम आणि औषधे वापरली जातात. परंतु या सर्वांमध्ये रसायने आढळतात जी आपल्या त्वचेसाठी हानिकारक असतात. अशा परिस्थितीत, आम्ही येथे घरगुती क्रीमबद्दल सांगणार आहोत, ज्याचा वापर केल्याने डास तुम्हाला स्पर्श करु शकणार नाहीत आणि तुम्ही अनेक आजार टाळू शकता.

क्रिम बनवण्यासाठी लागणारे साहित्य: (ingredients to make Mosquito Repellent lotion at home)

डास टाळण्यासाठी, आपण मधमाशीच्या पोळ्यातील मधापासून नैसर्गिक क्रीम आणि लोशन बनवूयात

1. मध (Beeswax-1/4 कप)

2. खोबरेल तेल (coconut oil)

3. व्हिटॅमिन ई तेल (vitamin e oil) (1/4 कप)

4. स्टीरिक ऍसिड पावडर (Stearic acid powder) (1 टीस्पून)

5. बेकिंग सोडा (baking soda) (1/4 कप)

6. कोमट पाणी (3/4 कप)

7. निलगिरी तेल (Eucalyptus oil) 

8. सिट्रोनेला नैसर्गिक तेल (Citronella Natural Oil) 

Stay Safe From Mosquito
Mosquito Problem: धक्कादायक! कूलर लावू नका नाहीतर डासांची पार्टी सुरु होईल तुमच्या घरात...

लोशन कसे बनवायचे?

लोशन तयार करण्यासाठी, प्रथम मधमाशांच्या पोळ्यातून काढलेले मध, खोबरेल तेल आणि व्हिटॅमिन ई तेलात मिसळून गरम करा.

कोमट पाण्यात एक चमचा बेकिंग सोडा मिसळा, चमच्याने किंवा ब्लेंडरच्या मदतीने चांगले मिसळा.

आता खोबरेल तेल आणि मधाच्या मिश्रणात पाणी टाका, ते नीट मिसळत नाही, म्हणून ब्लेंडर वापरा.

आता हे संपूर्ण मिश्रण काही वेळ बर्फात ठेवा.

मिश्रणामध्ये निलगिरीचे 10 थेंब आणि सिट्रोनेला तेलाचे 10 थेंब मिसळा.

सुगंधासाठी तुम्ही क्रीममध्ये लैव्हेंडर किंवा मेहेंदी टाकू शकता, पण ते मिसळणे आवश्यक नाही.

लोशन व्यवस्थित थंड झाल्यावर ते बाटलीत किंवा हवाबंद डब्यात साठवा.

हे लोशन डासांपासून संरक्षण करेल तसेच त्वचा सुंदर करेल.

Stay Safe From Mosquito
Home Remedies For Mosquitos  : घरातून डासांची हाकालपट्टी करण्याचे देसी जुगाड; चौथ्या नंबरला आहे जालिम उपाय!

हे लोशन बनवण्याचे फायदे (Benefits of  Mosquito Repellent lotion at home)

यात वापरले जाणारे सर्व पदार्थ आपल्या स्किन केअर रुटीन मध्ये वापरले जाणारे पदार्थ आहेत. त्यामुळे याने फक्त आपले डासांपासून संरक्षण होत नाही तर यामुळे आपली त्वचा सुद्धा सुधारते.

बाहेरच्या मॉस्किटो रिपेलेंट लोशनमध्ये अनेक प्रकारचे रसायने मिक्स असतात जे तुमच्या लहान मुलांसाठी घातक ठरु शकतात, त्यापेक्षा जर हे घरचे लोशन लावले तर त्याचा कोणालाही त्रास होणार नाही. 

अनेकांना बाहेरचे स्किन प्रॉडक्ट लावल्याने त्वचेवर पुरळ येण्यासारखा त्रास होवू शकतो यालाच पर्याय म्हणून हे लोशन छान आहे. यामुळे तुम्हाला स्किन इन्फेक्शन पण होणार नाही. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()